Anushka Shetty | ‘बाहुबली’ची ‘देवसेना’ इतकी बदलली; फोटो पाहून नेटकऱ्यांना बसला आश्चर्याचा धक्का!

चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या सहा वर्षांनंतर आता अनुष्काचा वेगळाच लूक सोशल मीडियावर पहायला मिळतोय. यामध्ये ती अत्यंत वेगळी दिसतेय. अनुष्काचे हे फोटो व्हायरल झाल्यापासून तिच्या बदललेल्या लूकची खूप चर्चा होतेय.

Anushka Shetty | बाहुबलीची देवसेना इतकी बदलली; फोटो पाहून नेटकऱ्यांना बसला आश्चर्याचा धक्का!
Anushka Shetty
Image Credit source: Instagram
| Updated on: Feb 22, 2023 | 1:33 PM

हैदराबाद : राजामौलींच्या ‘बाहुबली’ या चित्रपटातील देवसेना हे नाव जरी घेतलं तरी डोळ्यांसमोर तिचं निळ्या साडीतील तलबाजीचं दृश्य येतं. ‘बाहुबली : द कन्क्लुजन’ या चित्रपटातील तिच्या एण्ट्री सीनवर थिएटरमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला होता. तिच्या या दृश्याने चाहत्यांना घायाळ केलं होतं. फक्त हेच नाही तर ‘बाहुबली 2’मध्ये अभिनेत्री अनुष्का शेट्टीची अशी अनेक दृष्ये आहेत, ज्यामध्ये ती जणू महाराणीच दिसते. चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या सहा वर्षांनंतर आता अनुष्काचा वेगळाच लूक सोशल मीडियावर पहायला मिळतोय. यामध्ये ती अत्यंत वेगळी दिसतेय. अनुष्काचे हे फोटो व्हायरल झाल्यापासून तिच्या बदललेल्या लूकची खूप चर्चा होतेय.

अनुष्का शेट्टी गेल्या बऱ्याच काळापासून लाइमलाइटपासून दूर आहे. मोठ्या ब्रेकनंतर तिला महाशिवरात्रीनिमित्त एका मंदिरात पाहिलं गेलं. यावेळी तिला पाहून चाहत्यांना फार आनंद झाला. मात्र सोशल मीडियावर काहीजण तिला बॉडी शेमिंग करू लागले.

पांढऱ्या साडीतील अनुष्काचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. तिचं वाढलेलं वजन पाहून नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. ‘असं पाहून खूप वाईट वाटतंय. आम्हाला तुला अधिकाधिक चित्रपटांमध्ये पहायचंय. कृपया वजन कमी कर’, असं एका युजरने लिहिलं आहे. तर अनुष्का ही स्वत: योग प्रशिक्षक आहे, तिला फिटनेस आणि आरोग्याविषयी शिकवू नका, असा सल्ला तिच्या चाहत्यांनी ट्रोलर्सना दिला.

‘बाहुबली’ चित्रपटातील अनुष्का शेट्टी आणि प्रभासच्या जोडीला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं होतं. इतकंच नव्हे तर हे दोघं लवकरच लग्न करणार असल्याचंही म्हटलं जात होतं. मात्र दोघांनीही वारंवार या चर्चा नाकारल्या आहेत. आम्ही एकमेकांचे चांगले मित्र आहोत, असं त्यांनी स्पष्ट केलं.

एस. एस. राजामौली यांच्या ‘बाहुबली’ या चित्रपटामुळे अनुष्का शेट्टीला खूप लोकप्रियता मिळाली. या चित्रपटात तिने साकारलेल्या देवसेना या भूमिकेला चाहत्यांकडून भरपूर प्रेम मिळालं. रिपोर्ट्सनुसार, अनुष्का शेट्टी एका चित्रपटासाठी जवळपास सहा कोटी रुपये मानधन घेते. ती 120 कोटी रुपयांच्या संपत्तीची मालकीण असल्याचं म्हटलं जातं.