
Barack Obama Speak Shah Rukh Khan Dialogue: अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्याचे ९० च्या दशकातील सिनेमांमधील डायलॉग आजही चाहत्यांच्या तोंडावर असतात. रोमांसच्या बादशाहा, चाहत्यांचा किंग खान आजही त्याच्या अभिनयाने सर्वांना चक्क करतो. सध्या अभिनेता ‘पठान’ सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर ‘बेशर्म रंग’ गाणं प्रदर्शित करण्यात आलं, पण गाण्यातील अभिनेत्री दीपिका पादुकोनच्या भगव्या बिकीनीमुळे सिनेमा वादाच्या भोवऱ्यात असताना किंग खान आणि अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
व्हिडीओमध्ये बराक ओबामा चक्क शाहरुख खानच्या ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ सिनेमातील प्रसिद्ध डायलॉग बोलताना दिसत आहेत. बराक ओबामा यांचा भरसभेतील फिल्मी अंदाज सोशल मीडियावर आता तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये ओबामा किंग खानचा ‘बडे बडे देशो में…’ हा डायलॉग बोलताना दिसत आहेत.
PROUD OF SHAH RUKH KHAN Number 4 par hain lot’s of love SRKain
— ????.????(@imkhansaab07) January 8, 2023
बराक ओबामा म्हणतात, ‘सेनॉरिटा… बडे बडे देशो में…’ते सिनेमातील पूर्ण डायलॉग बोलत नाहीत, पण पुढे म्हणतात, ‘तुम्हाला माहिती आहे, माझं बोलण्यामागे काय अर्थ आहे…’ असं ओबामा म्हणतात. सांगायचं झालं तर हा व्हिडीओ २०१५ सालचा आहे जेव्हा ओबामा तीन दिवसांसाठी भारत दौऱ्यावर आले होते. दिल्लीच्या सीरी फॉर्ट ऑडिटोरियम ओबामा यांनी भाषण केलं होतं.
Proud 2 b part of the gender & religion equality speech of Pres. Obama. Sad he couldn’t do the Bhangra…next time Chaiyya Chaiyya for sure
— Shah Rukh Khan (@iamsrk) January 27, 2015
बराक ओबामा यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शाहरुख खानने देखील त्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. ओबामा यांचा व्हिडीओ पाहिल्यानंतर शाहरुख म्हणाला, ‘राष्ट्राध्यक्ष ओबामा यांच्या लिंग आणि धर्म समानता भाषणाचा भाग झाल्याने मला आनंद होत आहे. फक्त खंत एवढ्याच गोष्टीची आहे, की ते भांगडा करु शकले नाहीत. पुढच्या वेळी छैय्या छैय्या नक्की…’ अशी भावना शाहरुखने ओबामा यांचा व्हिडीओ पाहिल्यानंतर व्यक्त केल्या.
अभिनेत्याचा ‘पठाण’ सिनेमा वादाच्या भोवऱ्यात
मीडियारिपोर्ट्स नुसार, ‘पठाण’ सिनेमातील ‘बेशर्म रंग’ गाण्यावर होणारा विरोध पाहता सेंसर बोर्डाने सिनेमातील काही सिनवर कात्री चालवली असून सिनेमात महत्त्वाचे बदल केले आहेत. दरम्यान, सिनेमाच्या ट्रेलरची चाहत्यांना प्रतीक्षा आहे. सिनेमाचा ट्रेलर १० जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. सिनेमा २५ जानेवारी रोजी मोठ्या पडद्यावर दाखल होणार आहे.