Eetha : लावणी, तमाशा आणि भोजपुरी तडका! ‘ईठा’मध्ये अक्षरा सिंहची नेमकी भूमिका काय?

Eetha : अभिनेत्री श्रद्ध कपूर स्टारर 'ईठा' सिनेमाची चर्चा सध्या सर्वत्र रंगली आहे. सिनेमात श्रद्धा मुख्य भूमिकेत झळकणार असून तिच्यासोबत भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंह देखील दिसणार आहे. याचा खुलासा खुद्द अक्षरा हिनेच केला आहे. सोशल मीडियाावर अक्षरा हिची पोस्ट व्हायरल होत आहे.

Eetha : लावणी, तमाशा आणि भोजपुरी तडका! ईठामध्ये अक्षरा सिंहची नेमकी भूमिका काय?
| Updated on: Nov 27, 2026 | 2:39 PM

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या तिच्या आगामी ‘ईठा’ या सिनेमामुळे सर्वत्र चर्चेत आहे. या सिनेमाबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली असून, भोजपुरी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री अक्षरा सिंह हिची या सिनेमात एन्ट्री झाली आहे. अक्षरा सिंहने स्वतः सोशल मीडियावर श्रद्धा कपूरसोबतचे काही फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. त्यामुळे सिनेमाविषयी प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. अक्षरा सिंहने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या. गेल्या अनेक दिवसांपासून ही गोष्ट मनात ठेवली होती. मात्र, आता अखेर ही आनंदाची बातमी सांगू शकते की, ‘ईठा’ हा सिनेमा 4 डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे, असं तिने म्हटलं आहे.

श्रद्धा कपूरसोबत काम करण्याचा अनुभव खास

Loading...

या सिनेमाच्या निमित्ताने अक्षरा सिंहला श्रद्धा कपूरसोबत स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळाली आहे. श्रद्धा ही एक उत्तम अभिनेत्री असून तिच्यासोबत काम करताना तिला जवळून जाणून घेण्याची संधी मिळाली, असे अक्षराने सांगितलं. मात्र, सिनेमातील आपल्या भूमिकेबाबत तिने अद्याप कोणताही खुलासा केलेला नाही. त्यामुळे तिची भूमिका नेमकी काय असणार, याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.

 

 

दरम्यान, लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘ईठा’ हा सिनेमा महाराष्ट्राच्या समृद्ध तमाशा आणि लावणी परंपरेवर आधारित आहे. या सिनेमात श्रद्धा कपूर तमाशा कलावंत विठाबाई नारायणगावकर यांच्यापासून प्रेरित भूमिका साकारत आहे. तसेच अभिनेता रणदीप हुड्डा याच्यासह अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. त्यामुळे या चित्रपटाकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

सलमान खान आणि श्रद्धा कपूर यांच्यात ‘कांटे की टक्कर’

सलमान खान कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. सध्या अभिनेता ‘मातृभूमी’ सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमा 4 डिसेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. तर 4 डिसेंबर रोजीच अभिनेत्री श्रद्धा कपूर स्टारर ‘ईठा’ सिनेमा देखील प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे ‘मातृभूमी’ आणि ‘ईठा’ हे दोन सिनेमे एकाच दिवशी आमने – सामने येणार आहेत. त्यामुळेस कोणता सिनेमा बॉक्स ऑफिसवर बाजी मारेल हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us