100 कोटींहून अधिक व्ह्यूज, या गाण्याने रचला इतिहास, ऐकूताच लोक थेट गुनगुनतात

इंडस्ट्रीमधील सर्वात सुपरहिट गाणं. ज्याला मिळाले 100 कोटींहून अधिक व्ह्यूज. यूट्यूबवर धुमाकूळ घालत आहेत हे गाणं.

100 कोटींहून अधिक व्ह्यूज, या गाण्याने रचला इतिहास, ऐकूताच लोक थेट गुनगुनतात
Image Credit source: Social media
| Updated on: May 29, 2026 | 2:01 PM

भोजपुरी संगीतविश्वासाठी अभिमानाची बातमी समोर आली आहे. ‘हॅलो कौन’ या सुपरहिट भोजपुरी गाण्याने यूट्यूबवर तब्बल 1 अब्ज म्हणजेच 100 कोटी व्ह्यूजचा ऐतिहासिक टप्पा पार केला आहे. विशेष म्हणजे, हा विक्रम करणारे हे पहिलेच भोजपुरी गाणे ठरले आहे.

त्यामुळे भोजपुरी म्युझिक इंडस्ट्रीमध्ये आनंदाचे वातावरण आहे. हे गाणे 10 डिसेंबर 2019 रोजी रिलीज करण्यात आले होते. हे गाणे रिलीज होताच सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. सहा वर्षांनंतरही या गाण्याची लोकप्रियता कायम असून आजही हे गाणे पार्ट्या, लग्नसमारंभ आणि सोशल मीडिया रील्समध्ये मोठ्या प्रमाणावर ऐकले जाते.

‘हॅलो कौन… बोलो कौन?’ हा संवाद आणि गाण्याची कॅची धून लोकांच्या आवडीची ठरली. गाण्यातील मजेशीर शब्दरचना, जबरदस्त बीट्स आणि दोन्ही कलाकारांची एनर्जी यामुळे हे गाणे अल्पावधीतच सुपरहिट ठरले.

भोजपुरी इंडस्ट्रीसाठी मोठी उपलब्धी

भोजपुरी गाणी सामान्यतः 10 ते 20 कोटी व्ह्यूजपर्यंत पोहोचतात. मात्र ‘हॅलो कौन’ने थेट 100 कोटींचा टप्पा पार करत नवा इतिहास घडवला आहे. भारतातील 1 अब्ज व्ह्यूज मिळवणारे हे 29 वे गाणे ठरले आहे. विशेष म्हणजे, या गाण्याला इंस्टाग्राम रील्स आणि यूट्यूब शॉर्ट्समुळे मोठी लोकप्रियता मिळाली. लग्नसमारंभ, डीजे पार्टी आणि विविध फंक्शन्समध्ये हे गाणे आजही मोठ्या उत्साहात वाजवले जाते.

‘हॅलो कौन’ इतके लोकप्रिय का झाले?

कॅची हुक लाइन: ‘हॅलो कौन… बोलो कौन?’ ऐकताच लगेच लक्षात राहते. तरुणांमध्ये प्रचंड क्रेझ: गाण्यातील मजेशीर लव्ह-फ्रेंडशिप कॉन्सेप्ट Gen Z ला भावले.
सोशल मीडिया व्हायरल फॅक्टर: रील्स आणि शॉर्ट व्हिडिओंमध्ये मोठ्या प्रमाणावर वापर. परफेक्ट पार्टी साँग: लग्न, बारात आणि फंक्शन्समध्ये आजही डीजेवर हमखास वाजते.

या ऐतिहासिक यशाबद्दल आनंद व्यक्त करताना रितेश पांडे यांनी ही उपलब्धी संपूर्ण भोजपुरी संगीतसृष्टीसाठी अभिमानाची असल्याचे म्हटले आहे. भोजपुरी संगीताला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळवून देण्यात ‘हॅलो कौन’चा मोठा वाटा असल्याचेही चाहत्यांकडून सांगितले जात आहे.

Follow Us