“अंगावर नावालाच कपडे होते”, Lust Stories मधील इंटिमेट सीन कसं शूट केलं? भूमी पेडणेकरने सोडलं मौन

'लस्ट स्टोरीज'मधील इंटिमेट सीनबद्दल अखेर भूमी झाली व्यक्त; "मी खूप जास्त अस्वस्थ होते, कारण.."

अंगावर नावालाच कपडे होते, Lust Stories मधील इंटिमेट सीन कसं शूट केलं? भूमी पेडणेकरने सोडलं मौन
Bhumi Pednekar
Image Credit source: Instagram
| Updated on: Dec 29, 2022 | 11:34 AM

मुंबई: अभिनेत्री भूमी पेडणेकर ‘लस्ट स्टोरीज’ या अँथॉलॉजी चित्रपटातील इंटिमेट सीनमुळे चर्चेत आली होती. या सीनबद्दल आता तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मौन सोडलं आहे. ‘लस्ट स्टोरीज’ हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता. यामध्ये चार वेगवेगळ्या दिग्दर्शकांनी चार कथा दिग्दर्शित केल्या होत्या. त्यापैकी दिग्दर्शिका झोया अख्तरच्या कथेत भूमी पेडणेकर आणि नील भूपलमने मुख्य भूमिका साकारल्या होत्या. या कथेची सुरुवातच या दोघांच्या इंटिमेट सीनने होते.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत भूमी म्हणाली, “लस्ट स्टोरीजची शूटिंग करताना मी खूपच अस्वस्थ होते. ते दृश्य अत्यंत बोल्ड होतं आणि त्यावेळी इंटिमसी को-ऑर्डिनेटर म्हणून कोणीच नव्हतं. पण झोयाने अत्यंत संवेदनशीलपणे परिस्थिती हाताळली होती.”

“रुममध्ये बरीच लोकं होती आणि त्यांच्यासमोर मला तो सीन शूट करायचा होता. माझ्या अंगावर फारच कमी कपडे होते. त्यामुळे मी खूप जास्त अस्वस्थ होते. अंगावर फार कमी कपडे असताना मला तो इंटिमेट सीन बऱ्याच लोकांसमोर शूट करायचा होता. सीनच्या आधी दिग्दर्शक आणि सहअभिनेत्यासोबत झालेल्या चर्चेमुळे माझी खूप मदत झाली”, असं तिने पुढे सांगितलं.

लस्ट स्टोरीजमधील चार कथांचं दिग्दर्शन अनुराग कश्यप, झोया अख्तर, दिबाकर बॅनर्जी आणि करण जोहर यांनी केल्या होत्या. झोयाच्या कथेत भूमीने घरकाम करणाऱ्या महिलेची भूमिका साकारली होती. तर नील भूपलम घरमालकाच्या भूमिकेत होता.

लस्ट स्टोरीजमधील इतर कथांमध्ये कियारा अडवाणी, विकी कौशल, राधिका आपटे, मनिषा कोईराला, नेहा धुपिया यांसारख्या कलाकारांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. 2018 मध्ये हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता.