AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राखी सावंतचं विनर रुबिकाला ओपन चॅलेंज, सलमान म्हणाला, जास्त कॉन्फिडन्स दाखवू नको, पुढे मंचावर १ मिनिट धिंगाणा!

अभिनेत्री राखी सावंत ने बिग बॉसच्या 14 सिझनची विनर रूबिका दिलैकला ओपन चॅलेंज दिलं.

राखी सावंतचं विनर रुबिकाला ओपन चॅलेंज, सलमान म्हणाला, जास्त कॉन्फिडन्स दाखवू नको, पुढे मंचावर १ मिनिट धिंगाणा!
रूबिका दिलैक, राखी सावंत,सलमान खान
| Edited By: | Updated on: Jan 30, 2022 | 1:49 PM
Share

मुंबई : सध्या बिग बॉसच्या 15 व्या सिझनच्या ग्रॅण्ड फिनालेचा (Big Boss 15 Grand Finale) बोलबाला आहे. सर्वत्र या ग्रॅण्ड फिनालेचीच चर्चा आहे. या कार्यक्रमाचे काही प्रोमो कलर्स टीव्हीकडून शेअर करण्यात आले आहेत. यात कार्यक्रमातले लक्षवेधी क्षण दाखवण्यात आले आहेत. अश्याच एका प्रोमोमध्ये अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) ने बिग बॉसच्या 14 सिझनची (Big Boss 14) विनर रूबिका दिलैकला (Rubika Dilaik) ओपन चॅलेंज दिल्याचं पहायला मिळतंय. सलमान खाननं ( Salman Khan) राखीला सांगितलं की जास्त कॉन्फिडन्स दाखवू नकोस. तरीही राखीने रूबिकाला चॅलेंज दिलं रूबिकानेही ते स्विकारलं आणि मग त्यानंतर मंचावर एकच धुमाकूळ झाला.

राखी सावंतचं रूबिका दिलैकला ओपन चॅलेंज

कलर्स टीव्हीने शेअर केलेल्या व्हीडिओत राखी म्हणाली की, ‘हे सगळे प्रेक्षकांचं मनोरंजन करून जिंकलेत पण आम्हालाही बघायचंय की यांच्यात किती टॅलेंट आहे.’ त्यावर सलमान म्हणाला जास्त कॉन्फिडन्स दाखवू नकोस हे बिग बॉसचे विनर आहेत. तू आधीच घराबाहेर आलीये. त्यामुळे तू त्यांना चॅलेंज देऊ नको.’ त्यानंतरही तिने रूबिकाला डान्सचं चॅलेंज दिलंच. आणि मग दोघींनी मिळून बिग बॉसचा मंच गाजवला. अग्निपथ या चित्रपटातील ‘चिकनी चकेली’ गाण्यावर दोघी थिरकल्या. अन् मग या सगळ्यात राखीने सलमानलाही आमं६िक केलं अन् मग तिघेही या गाण्यावर मनसोक्त नाचले.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

आज बिग बॉसचा ग्रॅण्ड फिनाले

आज बिग बॉसच्या चाहत्यांसाठी सगळ्यात मोठा दिवस आहे कारण आज बिग बॉसच्या 15 व्या सिझनचा ग्रॅण्ड फिनाले आहे. त्यामुळे बिग बॉसच्या या सिझनचा विजेता कोण होणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. हा सिझन गाजला तो यातल्या वादामुळे, यातल्या प्रेमप्रकरणामुळे आणि खेळासाठी खेळल्या गेलेल्या खेळीमुळे. त्यामुळे या सिझनचा विजेता कोण होणार आणि बिग बॉसची ट्रॉफी कोण घरी घेऊन जाणार हे पाहणं प्रचंड उत्सुकतेचं आहे. आजच्या या कार्यक्रमात बिग बॉस 13 चा विजेता आणि दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लाला ट्रिब्यूट दिला जाणार आहे.

विजेत्यांची हजेरी

आज बिग बॉसचा ग्रँड फिनाले आहे. या ग्रॅण्ड फिनालेच्या या ग्रॅण्ड इव्हेंटला ग्रॅण्ड गेस्ट हजेरी लावणार आहे. बिग बॉस 14 ची विनर रुबिका दिलैक, गौहर खान, गौतम गुलाटी, उर्वशी ढोलकिया, श्वेता तिवारी हजेरी लावणार आहेत. त्यामुळे या सिझनचा ग्रॅण्ड फिनाले खास होणार हे निश्चित.

संबंधित बातम्या

काजोल कोरोना पॉझिटिव्ह, मुलगी न्यासाचं गोड हास्य; प्रियंका चोप्राकडून न्यासाचं कौतुक

एका तपानंतर संजय दत्त आणि सुनील शेट्टी करणार एकत्र काम, ‘नो प्रॉब्लेम’नंतर आता लवकरच नव्या सिनेमात एकत्र दिसणार

बिग बॉसची ट्रॉफी कोण जिंकणार?, शमिता शेट्टीला नेटकऱ्यांची पसंती; शमिताकडे अनुभव असल्याचं म्हणणं ?

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.