AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss 15 Finale: आज बिग बॉसची फायनल, ट्रॉफी कोण जिंकणार?; हे आहेत दावेदार

करण कुंद्रा हा शोमधील सर्वात मजबूत आणि विजयाचा प्रबळ दावेदार मानला जातो. त्याचवेळी शोमध्ये फायनलमध्ये पोहोचलेला प्रतीक सहजपालही सगळ्यांना टक्कर देत इथपर्यंत पोहोचला आहे.

Bigg Boss 15 Finale: आज बिग बॉसची फायनल, ट्रॉफी कोण जिंकणार?; हे आहेत दावेदार
बिग बॉस 15
| Edited By: | Updated on: Jan 30, 2022 | 10:53 AM
Share

मुंबई – नेहमी वादग्रस्त असणार कलर्स टिव्हीचा बिग बॉस 15 (Bigg Boss 15) शो आता अंतिम टप्प्यात आला आहे. यंदाच्या बिग बॉसमध्ये कोण बाजी मारणार अशी उत्सुकता शो चाहत्यांना लागली आहे. शनिवारपासून शोच्या अंतिम आठवड्याला सुरूवात झाली होती. तसेच होणा-या अंतिम सोहळ्यात काही जुने स्पर्धेक आणि सेलिब्रिटीही सहभागी होणार आहेत. प्रत्येकवेळी बिगबॉसचा हा शो नेहमी वादग्रस्त ठरला जातो, तसा तो याहीवेळी वादग्रस्त ठरला आहे. त्यामुळे आज नेमकं काय होणार याकडे बिग बॉस चाहत्याचे डोळे लागले आहेत. जिथं अंतिम सोहळा होणार आहे, तिथं रंगमंच जोरदार सजवला असून अनेक कलाकारांची हजेरी लागणार असल्याचं समजतंय. सद्या सुरू असलेल्या बिग बॉसमध्ये राखी सावंतच्या (rakhi sawant) येण्याने वातावरण अगदी सकारात्मक झालं आहे. काल या शोमधून रश्मी देसाई (rashmi desai) बाहेर पडल्याचं वृत्त आहे. त्यांच्या जाण्यानंतर आता निशांत भट्ट, प्रतीक सहजपाल, करण कुंद्रा, शमिता शेट्टी आणि तेजस्वी प्रकाश हे विजेतेपदाच्या लढाईत आमनेसामने असतील.

शमिता आणि तेजस्वीमध्ये जोरदार टक्कर होण्याची शक्यता

बिग बॉसचा शो सुरू झाल्यापासून शमिता आणि तेजस्वी दोघेही विजेते पदाचे दावेदार असल्याचे म्हणटले जात आहे. दोघांकडून प्रत्येकवेळी खेळा दरम्यान वेगळेपण दिसून आलंय तसंच एखादं दिलेलं काम सुध्दा त्यांनी मन लावून व्यवस्थित केलं आहे. ज्यावेळी दोन्ही स्पर्धेक एकामेकांच्या समोर आले त्यावेळी त्यांनी आपला खेळ पुर्णपणे ताकतीने खेळल्याचं पाहावयास मिळालं आहे. शेवटच्या अंतिम टप्प्यात दोघांकडून चुरशीचा खेळ पाहायला मिळत आहे.

करण कुंद्रा, प्रतीक, निशांत भट्ट यांची जोरदार टक्कर करण कुंद्रा हा शोमधील सर्वात मजबूत आणि विजयाचा प्रबळ दावेदार मानला जातो. त्याचवेळी शोमध्ये फायनलमध्ये पोहोचलेला प्रतीक सहजपालही सगळ्यांना टक्कर देत इथपर्यंत पोहोचला आहे. त्याचबरोबर निशांत भट्टनेही या दोघांना बरोबरीची स्पर्धा दिली आहे. करण कुंद्रा हा सर्वात लोकप्रिय आणि प्रबळ स्पर्धक मानला जात असला तरी त्याच्यासोबत उपस्थित असलेल्या बाकी स्पर्धकांनी आता आपल्या खेळाने आपली छाप पाडली आहे. गेल्या एपिसोडमध्ये करण पुन्हा एकदा तेजस्वीमुळे चर्चेत आला होता, जेव्हा तेजस्वी आणि शमिता यांच्यात भांडण सुरू होते तेव्हा करणने तेजस्वीची बाजू घेतली. दोघांमधील जवळीक सर्वांनाच माहीत आहे.

अंतिम स्पर्धेक काल या शोमधून रश्मी देसाई बाहेर पडल्यानंतर ग्रेड फिनाले आणखी चांगला होणार असल्याचं चित्र आहे. आत्तापर्यंत वादग्रस्त ठरलेल्या या शोमध्ये नेमकं कोण बाजी मारणार याकडे सगळ्याचं लक्ष लागलेलं आहे. आता निशांत भट्ट, प्रतीक सहजपाल, करण कुंद्रा, शमिता शेट्टी आणि तेजस्वी प्रकाश हे विजेतेपदाच्या लढाईत आमनेसामने असतील.

‘दे दना दन’! डेव्हिड धवननंतर सर्वाधिक सिनेमांचं दिग्दर्शन करणारा अवलिया; वाचा प्रियदर्शनचा फिल्मी प्रवास!

Happy Birthday Ramesh Deo | अनेक चित्रपटांत सोबत काम, दोघांनीही आपला काळ गाजवला; रमेश देव- सीमा देव यांची प्रेमकहाणी कशी फुलली ?

सलमानच्या चाहत्यांची उत्सुकता संपली, डांस विथ मी गाणं झालं रिलीज; गाणं प्रेक्षकांच्या पसंतीला

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.