सलमानच्या चाहत्यांची उत्सुकता संपली, डांस विथ मी गाणं झालं रिलीज; गाणं प्रेक्षकांच्या पसंतीला

सलमानच्या चाहत्यांची उत्सुकता संपली, डांस विथ मी गाणं झालं रिलीज; गाणं प्रेक्षकांच्या पसंतीला
सलमानचं डांस विथ मी गाणं झालं रिलीज

तुम्हाला सांगायला आनंद होतो की, सलमान खान यांनी गायलेलं डांस विथ मी हे गाणं चक्क प्रसिध्द संगीतकार साजिद वाजिद यांनी तयार केलं आहे. सद्या जे सलमानने गाण गायलं आहे ते नृत्याचा भाग आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: महेश घोलप, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Jan 29, 2022 | 6:38 PM

मुंबई – बॉलिवुडचा सुपरस्टार सलमान खान (salman khan) अनेक गोष्टींनीसाठी प्रसिध्द आहे. त्याच्या चाहत्यांना अनेक गोष्टी आवडत असतात. तसेच त्यांची एखाद्या चित्रपटातील स्टाईल सुध्दा लगेच आपल्याला त्याचा चाहत्यांकडून पाहायला मिळते. नुकतचं सलमान खानचं एक गाणं रिलीज (song release) झालं आहे. त्याचं नाव डांस विथ मी (dance with me) असं आहे. हे गाणं रिलीज झाल्याचं सलमान खाननं त्याच्या इंन्स्टाग्रामच्या अकाऊंटवरून (instagram account) सांगितलं आहे. काही दिवसांपुर्वी सलमान खानने या गाण्याचा टीजर शेअर केला होता. सलमानचे चाहते या गाण्याला ट्रीट मानून मज्जा घेत आहेत. हे गाणं तयार करण्याचं सलमान खानने पहिलचं ठरवलं होतं. त्यामुळे तो आता म्युझिक फॅशनला सुध्दा फॉलो करेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे या गाण्याला सलमान खानने आपला आवाज दिला आहे.

या गाण्याला सुध्दा दिला होता आवाज

याच्या आगोदर सलमानने आपल्या आवाजातील जादू लोकांना अनेकदा दाखवली आहे. म्हणजेच याच्या आगोदर सलमान खान गाणं सुध्दा गायलेला आहे. हॅलो चित्रपटातलं टायटल साँग सुध्दा सलमाने गायलं होतं. त्याचबरोबर हँगओवर गाणं सुध्दा सलमानने गायल्यानंतर अधिक प्रसिध्द झालं होतं. या गाण्याच्या व्हिडीओमध्ये सलमानचे सगळे नातेवाईक दिसत असून हा व्हिडीओ सुध्दा त्याच्या चाहत्यांना अधिक आवडेल असं सलमानचं म्हणणं आहे.

या संगीतकारांनी बनवलं गाणं

तुम्हाला सांगायला आनंद होतो की, सलमान खान यांनी गायलेलं डांस विथ मी हे गाणं चक्क प्रसिध्द संगीतकार साजिद वाजिद यांनी तयार केलं आहे. सद्या जे सलमानने गाण गायलं आहे ते नृत्याचा भाग आहे. त्याच्यावर सुध्दा चाहत्यांच्या जबरदस्त कमेंट येत आहेत. नेहमी प्रमाणे सलमान या गाण्यात सुध्दा स्टाईलमध्ये दिसत आहे. हे गाणं प्रचंड व्हायरल होणार असून पुन्हा एकदा सलमान चाहत्यांचं मन जिंकणार आहे.

चाहत्यांच्या कमेंट

चाहता म्हणतोय भाई सूटमध्ये चांगला दिसतोय, दुसरा चाहता म्हणतोय आपकी आवाज में जादू है, तिसरा चाहाता म्हणतोय भाई आप मल्टीटॅलेन्टेड आहे. याच्या आगोदर सलमानचे अनेक गाणे रिलीज झाले आहेत. ते सुध्दा त्यांच्या चाहत्यांच्या चांगले पसंतीला पडले होते.

राणू मंडल यांनी सुरात गाण्याचा प्रयत्न केला Kacha Badam; पण यूझर्स उडवतायत खिल्ली, पाहा Video

कॅटरीनाचे मालदीवमधील फोटो पाहून मुंबईत थंडीने कुडकुडलेल्यांना घाम फुटू शकतो! एकदा बघाच

हृतिकच्या व्हायरल व्हिडीओची नेटक-यांमध्ये चर्चा, सोबत असलेली व्यक्ती जाणून घेण्यास चाहत्यांची उत्सुकता

 

 


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें