Video : फक्त 2 फुटांची म्हैस अन् किंमत तब्बल 1 कोटी! महाराष्ट्राच्या पिंकीची पुष्कर मेळ्यात चर्चा
साधारणपणे म्हैस म्हटलं की डोळ्यांसमोर येते की काळीकुट्ट म्हैस,धिप्पाड शरीर, मजबूत बांधा आणि आकार. पण महाराष्ट्रातील एका म्हशीची गोष्टच निराळी. कारण ही म्हैस अवघी दोन फूटांची आहे. तिचं नाव पिकीं असून तिची किंमत 1 कोटी रूपये इतकी आहे

साधारणपणे म्हैस म्हटलं की डोळ्यांसमोर येते की काळीकुट्ट म्हैस,धिप्पाड शरीर, मजबूत बांधा आणि आकार. पण महाराष्ट्रातील एका म्हशीची गोष्टच निराळी. कारण ही म्हैस अवघी दोन फूटांची आहे. तिचं नाव पिकीं असून तिची किंमत 1 कोटी रूपये इतकी आहे. तिचा छोटा आकार पाहण्यासाठी राजस्थानच्या पुष्कर मेळ्यात लोकांची गर्दि जमली होती. विशेष म्हणजे या चिमुकल्या म्हशीची किंमत तब्बल एक कोटी असल्याचा दावा केला जात आहे.
ठाण्याहून 1100 किमी प्रवास करत पुष्करमध्ये दाखल
राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यात दरवर्षी पुष्कर पशूमेळा भरतो. या मेळ्यात मोठमोठे घोडे, सजवलेले उंट आणि वजनदार म्हशी पाहायला मिळतात. मात्र यंदा सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं ते पिकिंने. महाराष्ट्रातील ठाणे येथील पशूपालक सोहिल शकील यांनी या म्हशीला पुष्कर मेळ्यात आणलं होतं. त्यासाठी त्यांनी जवळपास 1100 किलोमीटरचा प्रवास केला.
पिंकीची उंची फक्त दोन फूट असल्याचं सांगितलं जात आहे. तिचा आकार पाहून मेळ्यात येणारे लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सगळेच आश्चर्यचकित होत आहेत. अनेक जण तिच्यासोबत फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी गर्दी करत आहेत. मोठमोठ्या जनावरांच्या गर्दीत ही छोटीशी म्हैस सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
View this post on Instagram
छोटी उंची हि वेगळ्या जातीमुळे नाही
पिंकीच्या शरीराची ठेवण पाहून अनेकांना ती एखाद्या खास लहान आकाराच्या जातीची म्हैस वाटू शकते. मात्र तिच्या मालकाच्या म्हणण्यांनुसार, तिची कमी उंची ही कोणत्याही विशिष्ट जातीमुळे नाही, तिच्या शरीराची वाढ नैसर्गिकरित्या इतर म्हशींसारखी झालेली नाही. तिच्या आईची उंचीही साधारण तीन फूट होती. पिकीं ही पूर्णपणे प्रौढ आहे पण तिने कोणत्याही पिल्लाला जन्म दिलेला नाही. अशी माहिती तिच्या मालकाने दिली.
पिंकी ही जगातील सर्वात छोटी म्हैस असल्याचा दावाही केला जात आहे. मात्र गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड किंवा कोणत्याही अधिकृत संस्थेने अद्याप या दाव्याला मान्यता दिलेली नाही. त्यामुळे सध्या पिकिंची दोन फुटांची उंची आणि तिच्या अनोख्या रूपामुळेच तिची चर्चा रंगली आहे.
