AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माजी सरन्यायाधीश बी आर गवाईंच्या पत्राने मोठी खळबळ, कोलेजियम प्रणालीवर गंभीर आक्षेप, राष्ट्रपतींकडे नवी मागणी!

2021 ते 2026 या काळात झालेल्या नियुक्त्यांपैकी 80 टक्के पदं हे समान्या प्रवर्गाच्या वाट्याला आलेले आहेत. यात ओबीसींना 14 टक्क्यांपेक्षा कमी प्रतिनिधीत्त्व मिळालेले आहे, असा दावा बी आर गवई यांनी केला.

माजी सरन्यायाधीश बी आर गवाईंच्या पत्राने मोठी खळबळ, कोलेजियम प्रणालीवर गंभीर आक्षेप, राष्ट्रपतींकडे नवी मागणी!
b r gavai Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 27, 2026 | 3:44 PM
Share

B R Gavai : भारताच्या न्याय प्रणालीवर अनेकदा वेगवेगळे प्रश्न उपस्थित करण्यात आले. न्यायाधीशांची निवड, त्यांची नियुक्ती करताना लावलेले निकष यांच्याविषयी अनेकदा आक्षेप घेण्यात आला. दरम्यान, आता देशाचे माजी सरन्यायाधीश बी आर गवई यांनी कोलेजियम म्हणजे न्यायवृंद प्रणालीवर गंभीर आक्षेप घेतले आहेत. त्यांनी थेट देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहिले असून कोलेजियम प्रणालीमध्ये नेमकं काय चुकतंय? हे सांगून आपले आक्षेप नोंदवले आहेत. त्यांनी या पत्राची प्रत पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच कायदेमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनाही पाठवली आहे.

आपल्या पत्रात बी आर गवई यांनी कोलेजियमने अलिकडे ज्या न्यायाधीशांशी शिफारस केलेली आहे, ते सर्व एकाच समूदायातून येतात, असा आक्षेप आपल्या पक्षात नोंदवला. तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्पसंख्याक, महिला तसेच योग्य उमेदवार यामुळे वंचित राहात आहेत. राष्ट्रपतींनी यात लवकरात लवकर हस्तक्षेप करावा, अशी मागणी गवई यांनी आपल्या पत्रात केलीय.

या पत्रात त्यांनी काही आकडेवारी सादर केलीय. संसदेत सादर करण्यात आलेली ही आकडेवारी आहे. पत्रात नमूद केल्यानुसार 2018 सालापासून आतापर्यंत देशातील वेगवेगळ्या उच्च न्यायालयांत नियुक्त केलेल्या एकूण 715 न्यायाधीशांपैकी फक्त 22 अनुसूचित जाती (एससी), 16 अनुसूचीत जमाती (एसटी), 89 अन्य मागास वर्ग (ओबीसी) आणि 37 अल्पसंख्याक समूदायातील आहे.

याच पत्रातील माहितीनुसार 2021 ते 2026 या काळात झालेल्या नियुक्त्यांपैकी 80 टक्के पदं हे समान्या प्रवर्गाच्या वाट्याला आलेले आहेत. यात ओबीसींना 14 टक्क्यांपेक्षा कमी प्रतिनिधीत्त्व मिळालेले आहे. देशातील एकूण लोकसंख्येत 5 टक्क्यांपेक्षाही कमी प्रमाण असलेल्या एका विशिष्ट समुदायाकडे सर्वोच्च न्यायालयाच्या 40 टक्क्यांहून अधिक जागा आहेत, असाही दावा बी आर गवई यांनी आपल्या पत्रात केलाय.

पदोन्नती, बदलीचे निकष यावरही आक्षेप नोंदवला

त्यांनी आपल्या पत्रात न्यायाधींशांची पदोन्नती, बदलीचे निकष यावरही आक्षेप नोंदवला आहे. विशेष म्हणजे मी कार्यरत असताना अशा कोलेजियमचा भाग होतो, अशी खंतही त्यांनी व्यक्त केलीय. त्यामुळे त्यांच्या पत्राची राष्ट्रपती, सरकार काय दखल घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
डिलिमीटेशन विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी
Delimitation Bill Update : डिलिमीटेशन विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी
वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक
Washim : वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक
पुण्यात 15 ऑगस्ट चौकात संशयित बॅग आढळली; तृप्ती देसाई काय म्हणाल्या?
Pune Bag Spoted : पुण्यात 15 ऑगस्ट चौकात संशयित बॅग आढळली; तृप्ती देसाई काय म्हणाल्या?
पुण्यातील गोळीबारानंतर पालकमंत्री सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये....
Sunetra Pawar Meeting : पुण्यातील गोळीबारानंतर पालकमंत्री सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बोलवली तातडीची बैठक
क्या बोलती पब्लिक? अभिजीत दिपकेंच्या सीजेपीचं नवं अभियान सुरू; थेट....
Abhijeet Dipke : क्या बोलती पब्लिक? अभिजीत दिपकेंच्या सीजेपीचं नवं अभियान सुरू; थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन जाणून घेतल्या समस्या
माझं विधान पुणे शहरापुरतं होतं, जिल्ह्याबद्दल नव्हतं; सुप्रिया सुळे...
Supriya Sule : माझं विधान पुणे शहरापुरतं होतं, जिल्ह्याबद्दल नव्हतं; सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?
रोहित पवार यांचं सुनेत्रा पवार यांच्याबद्दल ते वक्तव्य; सुप्रिया सुळे
Supriya Sule : रोहित पवार यांचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबद्दल ते वक्तव्य; सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया
ऑपरेशन 3.0 होणार की नाही? उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं; पक्षप्रवेश..
Uday Samant : Shivsena : ऑपरेशन 3.0 होणार की नाही? उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं; पक्षप्रवेशाच्या चर्चांवरही दिलं उत्तर, म्हणाले...
सोलापूर जिल्हा बँकेत भाजपचा एकहाती विजय; 19 पैकी 18 जागांवर सहकार....
Solapur DCC Bank Result : सोलापूर जिल्हा बँकेत भाजपचा एकहाती विजय; 19 पैकी 18 जागांवर भाजप प्रणित सहकार विकास पॅनलचा झेंडा
सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मोहिते पाटील गटाचा पहिला विजय....
Solapur DCC Bank Result : सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मोहिते पाटील गटाचा पहिला विजय; अर्जुनसिंह मोहिते पाटील यांची बाजी