AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तर मग स्वत:चा चित्रपट बनवा..; आदिनाथ कोठारेच्या सिनेमावरून सुप्रीम कोर्टाने सुनावलं

Ramayana: रणबीर कपूरच्या 'रामायण' चित्रपटाविरोधात दाखल याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला. चित्रपटात पौराणिक तथ्यांचा विपर्यास केल्याचा आरोप करण्यात आला होता.

तर मग स्वत:चा चित्रपट बनवा..; आदिनाथ कोठारेच्या सिनेमावरून सुप्रीम कोर्टाने सुनावलं
आदिनाथ कोठारे, रामायणImage Credit source: Instagram
| Updated on: Nov 27, 2026 | 3:40 PM
Share

Ramayana: अभिनेता रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेल्या ‘रामायण’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याच्या कथानकातील काही गोष्टींवर आक्षेप घेत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. चित्रपटात रामायणातील पौराणिक तथ्यांचा विपर्यास करण्यात आल्याचा आरोप याचिकाकर्त्याने केला होता. या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी करण्यात आली. मात्र सुप्रीम कोर्टाने ही मागणी फेटाळून लावली. यावेळी न्यायालयाने केलेली टिप्पणी विशेष चर्चेत आली आहे.

शुक्रवारी, 27 नोव्हेंबर रोजी सुप्रीम कोर्टात या प्रकरणाची तातडीने सुनावणी घेण्याची मागणी करण्यात आली. भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर हा विषय उपस्थित करण्यात आला. याचिकाकर्त्याच्या वकिलांनी सांगितलं की, 23 नोव्हेंबर रोजी याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र, अद्याप ती सुनावणीसाठी सूचीबद्ध झालेली नाही. त्यामुळे या प्रकरणावर लवकर सुनावणी घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली. यावर सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी चित्रपट आधीच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाल्याचं निदर्शनास आणून दिलं. ज्यांना हा चित्रपट पाहायचा होता, त्यांनी तो पाहिला आहे. त्यामुळे तातडीने सुनावणी घेण्याची गरज काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

‘तुमचा वेगळा दृष्टिकोन असेल तर स्वतःचा चित्रपट बनवा’

याचिकाकर्त्याच्या वकिलांनी चित्रपटात रामायणातील अनेक तथ्यांचा विपर्यास करण्यात आल्याचा आरोप केला. तसंच नव्या पिढीवर त्याचा परिणाम होऊ शकतो, अशी चिंताही व्यक्त केली. मात्र, न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांनी चित्रपट निर्मात्यांनी त्यांच्या समजुतीनुसार चित्रपट बनवला आहे, असं स्पष्ट केलं. तुम्हाला रामायणाबद्दल वेगळा दृष्टिकोन मांडायचा असेल, तर तुम्हीही त्यावर चित्रपट बनवू शकता, अशी टिप्पणी न्यायालयाने केली.

सरन्यायाधीश सूर्यकांत यांनीही याचिकाकर्त्याला उद्देशून, ‘तुमचा या महाकाव्याबद्दल वेगळा दृष्टिकोन असेल, तर त्यावर स्वतःचा चित्रपट बनवा. न्यायालयाचा वेळ वाया घालवू नका,’ अशा शब्दांत सुनावलं. अखेर खंडपीठाने तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला. नितेश तिवारी दिग्दर्शित आणि नमित मल्होत्रा निर्मित ‘रामायण’ हा दोन भागांमध्ये सादर होणाऱ्या चित्रपटाचा पहिला भाग आहे. यामध्ये रणबीर कपूरने प्रभू श्रीरामांची, साई पल्लवीने सीतेची, तर यशने रावणाची भूमिका साकारली आहे. याशिवाय सनी देओल हनुमान, रवी दुबे लक्ष्मण आणि अरुण गोविल महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

Follow Us
डिलिमीटेशन विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी
Delimitation Bill Update : डिलिमीटेशन विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी
वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक
Washim : वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक
पुण्यात 15 ऑगस्ट चौकात संशयित बॅग आढळली; तृप्ती देसाई काय म्हणाल्या?
Pune Bag Spoted : पुण्यात 15 ऑगस्ट चौकात संशयित बॅग आढळली; तृप्ती देसाई काय म्हणाल्या?
पुण्यातील गोळीबारानंतर पालकमंत्री सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये....
Sunetra Pawar Meeting : पुण्यातील गोळीबारानंतर पालकमंत्री सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बोलवली तातडीची बैठक
क्या बोलती पब्लिक? अभिजीत दिपकेंच्या सीजेपीचं नवं अभियान सुरू; थेट....
Abhijeet Dipke : क्या बोलती पब्लिक? अभिजीत दिपकेंच्या सीजेपीचं नवं अभियान सुरू; थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन जाणून घेतल्या समस्या
माझं विधान पुणे शहरापुरतं होतं, जिल्ह्याबद्दल नव्हतं; सुप्रिया सुळे...
Supriya Sule : माझं विधान पुणे शहरापुरतं होतं, जिल्ह्याबद्दल नव्हतं; सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?
रोहित पवार यांचं सुनेत्रा पवार यांच्याबद्दल ते वक्तव्य; सुप्रिया सुळे
Supriya Sule : रोहित पवार यांचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबद्दल ते वक्तव्य; सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया
ऑपरेशन 3.0 होणार की नाही? उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं; पक्षप्रवेश..
Uday Samant : Shivsena : ऑपरेशन 3.0 होणार की नाही? उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं; पक्षप्रवेशाच्या चर्चांवरही दिलं उत्तर, म्हणाले...
सोलापूर जिल्हा बँकेत भाजपचा एकहाती विजय; 19 पैकी 18 जागांवर सहकार....
Solapur DCC Bank Result : सोलापूर जिल्हा बँकेत भाजपचा एकहाती विजय; 19 पैकी 18 जागांवर भाजप प्रणित सहकार विकास पॅनलचा झेंडा
सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मोहिते पाटील गटाचा पहिला विजय....
Solapur DCC Bank Result : सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मोहिते पाटील गटाचा पहिला विजय; अर्जुनसिंह मोहिते पाटील यांची बाजी