AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बिग बॉसची ट्रॉफी कोण जिंकणार?, शमिता शेट्टीला नेटकऱ्यांची पसंती; शमिताकडे अनुभव असल्याचं म्हणणं ?

काल या शोमधून रश्मी देसाई बाहेर पडल्यानंतर ग्रेड फिनाले आणखी चांगला होणार असल्याचं चित्र आहे. आत्तापर्यंत वादग्रस्त ठरलेल्या या शोमध्ये नेमकं कोण बाजी मारणार याकडे सगळ्याचं लक्ष लागलेलं आहे. आता निशांत भट्ट, प्रतीक सहजपाल, करण कुंद्रा, शमिता शेट्टी आणि तेजस्वी प्रकाश हे विजेतेपदाच्या लढाईत आमनेसामने असतील.

बिग बॉसची ट्रॉफी कोण जिंकणार?, शमिता शेट्टीला नेटकऱ्यांची पसंती; शमिताकडे अनुभव असल्याचं म्हणणं ?
शमिता शेट्टी
| Edited By: | Updated on: Jan 30, 2022 | 11:42 AM
Share

मुंबई – आज बिगबॉसच्या सगळ्या चाहत्यांच्या नजर फक्त ग्रॅड फिनालेवरती आहेत, कारण आत्तापर्यंत हा शो वादग्रस्त आणि स्पर्धेकांसाठी चुरशीचा ठरलेला आहे. त्यामुळं आज नेमकं ट्रॉफी कोण जिंकणार याकडे सगळ्यांचे डोळे लागले आहेत. काल रश्मी देसाई या खेळातून बाहेर पडल्यानंतर ही चुरस आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या शमिता शेट्टी (Shamita Shetty), करण कुंद्रा (Karan Kundra), निशांत भट्ट (Nishant Bhatt), प्रतीक सहजपाल (Prateek Sahajpal), तेजस्वी प्रकाश (Tejaswi Prakash) यांच्यात मोठी चुरस होण्याची शक्यता आहे. बिग बॉस 15 सीजनला प्रत्येकाने आपला खेळ आणि टास्क उत्तम दाखवल्याचं पाहायला मिळालं. तसेच अभिजीत बिचुकले हा शोमधून बाहेर पडल्यानंतर त्याने सलमान खानला बघून घेईन असं म्हणाला होता. त्याला प्रत्युत्तर देताना राखी म्हणाली त्याने समाधी घेतली आहे. अधिक वादग्रस्त ठरलेल्या या शोमध्ये नेमकी ट्रॉपी कोणाला मिळणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

चमकणारी ट्रॉफी कोणाची असेल ?

आता उरलेल्या पाच स्पर्धेकांपैकी नेमकी ट्रॉफी कोण जिंकेल याकडे सगळ्यांचे डोळे लागले आहेत. अधिकतर लोकांना असे वाटतं आहे की, शमिता शेट्टी ही ट्रॉफी जिकेंल, कारण सुरूवातीपासून शमिताने आपला खेळ उत्तम ठेवला आहे. तसेच दिलेल्या टास्कमध्ये सुध्दा ती वेगळ्या पध्दतीनं खेळली आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांना असं वाटतंय की तीच या चमकत्या ट्रॉफीची दावेदार आहे. तसेच सोशल मीडियादरम्यान होणा-या चर्चेत सुध्दा शमिता शेट्टीचं नाव घेतलं जातं आहे. सोशल मीडियावर उरलेल्या 5 स्पर्धेकांची सुध्दा चर्चा असल्याचं म्हटलं जातंय. त्याचे सुध्दा सोशल मीडियावर चाहते असून ते सुध्दा चर्चा करीत आहेत.

शमिता शेट्टीला बिग बॉसचा अनुभव

शमिता शेट्टी याच्या आगोदर सुध्दा बिग बॉस 3 मध्ये सुध्दा दिसली होती. तो अनुभव तिच्या उराशी असल्याचे तिच्या चाहत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे शमिता या खेळातील सर्व खेळाडूंपेक्षा मजबूत स्पर्धेत असल्याचं चाहत्याचं मत आहे. याच्या आगोदर ओटीटी बीबी या करण जोहर यांच्या कार्यक्रमात दुसरा क्रमांकावर होती. तसेच बिग बॉस 3, 2009 मध्ये झालं होतं. त्यावेळी ती या स्पर्धेत सहभागी झाली होती. त्यावेळी तिनं तिथं चांगला खेळ करू शकली नव्हती. त्यामुळे ती तिथून लगेच बाहेर पडली होती.

अंतिम स्पर्धेक

काल या शोमधून रश्मी देसाई बाहेर पडल्यानंतर ग्रेड फिनाले आणखी चांगला होणार असल्याचं चित्र आहे. आत्तापर्यंत वादग्रस्त ठरलेल्या या शोमध्ये नेमकं कोण बाजी मारणार याकडे सगळ्याचं लक्ष लागलेलं आहे. आता निशांत भट्ट, प्रतीक सहजपाल, करण कुंद्रा, शमिता शेट्टी आणि तेजस्वी प्रकाश हे विजेतेपदाच्या लढाईत आमनेसामने असतील.

‘दे दना दन’! डेव्हिड धवननंतर सर्वाधिक सिनेमांचं दिग्दर्शन करणारा अवलिया; वाचा प्रियदर्शनचा फिल्मी प्रवास!

Happy Birthday Ramesh Deo | अनेक चित्रपटांत सोबत काम, दोघांनीही आपला काळ गाजवला; रमेश देव- सीमा देव यांची प्रेमकहाणी कशी फुलली ?

Rudra: The Edge of Darkness ट्रेलर झाला रिलीज, अजय देवगणमुळे प्रेषकांमध्ये उत्सुकता

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.