AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rudra: The Edge of Darkness ट्रेलर झाला रिलीज, अजय देवगणमुळे प्रेषकांमध्ये उत्सुकता

अजय देवगण याची ही वेब सिरिज ब्रिटीश मानसिक गुन्हेगारीवर असणाऱ्यांचे नाट्य यामध्ये आहे. या डेब्यूमध्ये अजय देवगण यांनी एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहेत. ओटीटी प्लॅट फॉर्मवरही अजय देवगणसाठी प्रेषकांमध्ये मोठी उत्सुकता ताणली गेली आहे.

Rudra: The Edge of Darkness ट्रेलर झाला रिलीज, अजय देवगणमुळे प्रेषकांमध्ये उत्सुकता
rudra ajay devgan
| Edited By: सिद्धेश सावंत | Updated on: Jan 29, 2022 | 10:05 PM
Share

मुंबईः अभिनेता अजय देवगणचा Rudra:The Edge Of Darkness चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर Rudra या वेबसिरिजचा डेब्यू अजय देवगण (Ajay Devgan) घेऊन येत आहे. अजय देवगणची ही वेबसिरिज ब्रिटीश सायकॉलॉजिकल ड्रामा आहे. रुद्र या वेबसिरिजमध्ये (Web series) अजय देवगण मुख्य भूमिकेत असून तो पुन्हा एकदा पोलीस (Police Officer) अधिकाऱ्याच्या भूमिकेत प्रेषकांसमोर येत आहे. या वेबसिरिजची खास गोष्ट ही आहे की, त्याच्या भू्मिकेत अचानक बदल होतो. त्यामध्ये तो एका पोलीस अधिकाऱ्याला मानसिक गुन्हेगार बनवणार आहे. अजयच्या वेबसिरिजची निर्मिती ही बीबीसी स्टुडिओ आणि एप्लॉईज एंटरटेनमेंटने बनविली आहे. ही सिरिज डिझ्नी प्लस हॉटस्टारवरही दिसणार आहे.

रुद्राच्या या ट्रेलरला प्रेषकांतूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. ट्रेलर पाहून प्रेषक म्हणताहेत की, ट्रेलरच जर एवढा धमाकेदार आहे तर सिरिज काय मग धुमाकूळ घालणार आहे. तर कुणीतरी म्हटले आहे की, अजय देवगणचा लूक म्हणजे इंटेस लूक किलर आहे तर कुणी अजय देवगण सुपरहिट आहे, तर लोक म्हणताहेत की, हा ट्रेलर म्हणजे एक मास्टरपीस झाला आहे.

काही वेगळे आणि काही हटके

अभिनेता अजय देवगणने रुद्रबाबत बोलताना सांगितले की, डिजिटल मीडियावर डेब्यू का बनवत आहे, तो म्हणतो माझा नेहमीच प्रयत्न राहिला आहे की, काही वेगळं आणि प्रेषकांना हटके देण्याचा. नव्या आणि पॅशेनट लोकांबरोबर काम करण्याचा प्रयत्न राहिला आहे. यामुळे भारतातील सांस्कृतिक क्षेत्रात मोठी क्रांती होत आहे. डिजिटलचे जग मला वेगवेगळ्या कारणांमुळे खुणावत आहे.

बडेबडे सेलिब्रेटी आता ओटीटीवर

कोरोनाच्या महामारीमुळे देशातील अनेक चित्रपटगृहे बंदच होती. त्यामुळे चित्रपट प्रदर्शनावरही बंदी होती. त्यामुळे ओटीटीवर चित्रपट आणि वेबसिरिज प्रदर्शित झाल्या आहे. यामध्ये मोठमोठे अभिनेत्यांचेही चित्रपट होते. आता यामध्ये आहे अजय देवगणच्या रुद्र हाही आहे. काही काळापूर्वी अजय देवगणची भूज हा सिनेमाही ओटीटीवर रिलिज झाला होता. अजय देवगणच्या या वेबसिरिजमुळे प्रेषकांची कमालीची उत्सुकता ताणली गेली आहे. तो साकारत असलेली भूमिका प्रेषकांना नक्कीच आवडेल असंही तो बोलताना सांगितले आहे.

संबंधित बातम्या

Follow Us
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चे सुरुच1.
आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
नेपाळमधील पूरस्थिती गंभीर; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी हेल्पलाईन
नेपाळमधील पूरस्थिती गंभीर, बिहारला सतर्कतेचा इशारा; महाराष्ट्राच्या नागरिकांसाठी मदत क्रमांक जारी
नेपाळमध्ये महापूर; राहुल गांधींचे भारत सरकारला महत्त्वाचे आवाहन...
नेपाळमधील महापुरात एक हजारहून अधिक बेपत्ता; राहुल गांधींचे भारत सरकारला महत्त्वाचे आवाहन...
नेपाळमधील महाप्रलयाचा बिहारला धोका; एनडीआरएफचे पथक बचावासाठी सज्ज
नेपाळमधील महाप्रलयाचा बिहारला धोका; एनडीआरएफचे पथक बचावासाठी सज्ज
मराठा आणि ओबीसी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर निदर्शनांसाठी नवे निर्बंध
मराठा आणि ओबीसी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत निदर्शनांसाठी नवे निर्बंध
मुळशी पॅटर्न 2 सिनेमाच्या नावाला विरोध!
मुळशी पॅटर्न 2 सिनेमाच्या नावाला मुळशीकरांचा तीव्र विरोध
नेपाळमधील महाप्रलयात भारताची साथ, केंद्रीय गृहमंत्र्यांची ग्वाही
नेपाळमधील महाप्रलयात भारताची साथ, केंद्रीय गृहमंत्र्यांची ग्वाही
मराठा आरक्षणावर तोडगा काढण्याचा सरकारचा प्रयत्न
प्रसाद लाड पुन्हा मनोज जरांगे पाटलांशी संवाद साधणार