AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cooking Tips : स्ट्रीट फूडलाही मागे टाकेल! घरच्या घरी बनवा कुरकुरीत बटाटा-कांदा पॅटीस

Cooking Tips : संध्याकाळी चहासोबत काही तरी चमचमीत खायला अनेकांना आवडतं. पण सतत बाहेरचे पदार्थ खाणं देखील योग्य नाही. अशात बटाटा-कांदा पॅटीस घरीच बनवा... तर जाणून घ्या खाास रेसिपी...

Cooking Tips : स्ट्रीट फूडलाही मागे टाकेल! घरच्या घरी बनवा कुरकुरीत बटाटा-कांदा पॅटीस
| Updated on: Nov 27, 2026 | 3:25 PM
Share

संध्याकाळच्या चहासोबत काहीतरी कुरकुरीत आणि चविष्ट खाण्याची इच्छा अनेकांना होते. अशावेळी समोसा, वडापाव किंवा इतर पदार्थ खाण्यासाठी अनेकजण रस्त्यावरील खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सकडे धाव घेतात. मात्र, बाहेरच्या पदार्थांच्या स्वच्छतेबाबत आणि वारंवार वापरल्या जाणाऱ्या तेलाबाबत मनात शंका निर्माण होते. अशावेळी घरच्या घरी तयार केलेल्या बटाटा पॅटीज हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. विशेष म्हणजे, यासाठी फारसे साहित्यही लागत नाही.

पॅटीजची कृती

सर्वप्रथम दोन कांदे आणि आवश्यकतेनुसार बटाटे सोलून जाड किसणीने किसून घ्या. एका मोठ्या भांड्यात दोन्ही एकत्र करून त्यात पाणी घाला. हाताने हलकेच ढवळून पाणी काढून टाका. ही प्रक्रिया एकदा पुन्हा करा. त्यानंतर बटाटा आणि कांद्याचे मिश्रण हाताने दाबून त्यातील अतिरिक्त पाणी पूर्णपणे काढून घ्या.

आता पॅनमध्ये थोडे ऑलिव्ह तेल गरम करून त्यात हे मिश्रण घाला. मधूनमधून ढवळत साधारण ५ ते ७ मिनिटे शिजवा. मिश्रण थोडे मऊ झाल्यानंतर प्लेटमध्ये काढून थंड होऊ द्या. त्यात चवीनुसार मीठ, काळी मिरी आणि चार मोठे चमचे कॉर्नस्टार्च किंवा मैदा घालून व्यवस्थित मिसळा. या मिश्रणाचे छोटे गोळे करून त्यांना पॅटीजचा आकार द्या. कढईत तेल गरम करून दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.

चीज सॉस आणि गार्लिक डिपची जोडी

पॅटीजची चव वाढवण्यासाठी चीज सॉस तयार करा. यासाठी ३० ग्रॅम बटर गरम करून त्यात एक चमचा मैदा घाला. एक मिनिट ढवळल्यानंतर हळूहळू १५० मिलीलीटर क्रीम मिसळा. त्यात मीठ, काळी मिरी आणि किसलेले चेडर चीज घालून चीज वितळेपर्यंत शिजवा. याशिवाय गार्लिक डिल डिपसाठी एक चमचा केचप, एक मोठा चमचा मेयोनीज, बारीक चिरलेला लसूण आणि शेपूची पाने एकत्र मिसळा.

अशा प्रकारे तयार झालेल्या गरमागरम कुरकुरीत पॅटीज चीज सॉस किंवा गार्लिक डिपसोबत सर्व्ह करा. बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ असलेल्या या पॅटीज संध्याकाळच्या चहासाठी एक उत्तम आणि चविष्ट पर्याय ठरतील.

Follow Us
वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक
Washim : वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक
पुण्यात 15 ऑगस्ट चौकात संशयित बॅग आढळली; तृप्ती देसाई काय म्हणाल्या?
Pune Bag Spoted : पुण्यात 15 ऑगस्ट चौकात संशयित बॅग आढळली; तृप्ती देसाई काय म्हणाल्या?
पुण्यातील गोळीबारानंतर पालकमंत्री सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये....
Sunetra Pawar Meeting : पुण्यातील गोळीबारानंतर पालकमंत्री सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बोलवली तातडीची बैठक
क्या बोलती पब्लिक? अभिजीत दिपकेंच्या सीजेपीचं नवं अभियान सुरू; थेट....
Abhijeet Dipke : क्या बोलती पब्लिक? अभिजीत दिपकेंच्या सीजेपीचं नवं अभियान सुरू; थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन जाणून घेतल्या समस्या
माझं विधान पुणे शहरापुरतं होतं, जिल्ह्याबद्दल नव्हतं; सुप्रिया सुळे...
Supriya Sule : माझं विधान पुणे शहरापुरतं होतं, जिल्ह्याबद्दल नव्हतं; सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?
रोहित पवार यांचं सुनेत्रा पवार यांच्याबद्दल ते वक्तव्य; सुप्रिया सुळे
Supriya Sule : रोहित पवार यांचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबद्दल ते वक्तव्य; सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया
ऑपरेशन 3.0 होणार की नाही? उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं; पक्षप्रवेश..
Uday Samant : Shivsena : ऑपरेशन 3.0 होणार की नाही? उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं; पक्षप्रवेशाच्या चर्चांवरही दिलं उत्तर, म्हणाले...
सोलापूर जिल्हा बँकेत भाजपचा एकहाती विजय; 19 पैकी 18 जागांवर सहकार....
Solapur DCC Bank Result : सोलापूर जिल्हा बँकेत भाजपचा एकहाती विजय; 19 पैकी 18 जागांवर भाजप प्रणित सहकार विकास पॅनलचा झेंडा
सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मोहिते पाटील गटाचा पहिला विजय....
Solapur DCC Bank Result : सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मोहिते पाटील गटाचा पहिला विजय; अर्जुनसिंह मोहिते पाटील यांची बाजी
संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या NCP कडून व्हिप जारी..
NCP : संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या NCP कडून व्हिप जारी; नेमका काय आहे पक्षाचा निर्देश?