AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune News: पुण्यात बेकायदा होर्डिंगची भाईगिरी बंद! CM फडणवीसांचे थेट आदेश; म्हणाले, ‘उद्या माझेही नाव…’,

पुणे शहरात नाक्यावर, चौका-चौकावर फ्लेक्स लावणाऱ्यांना महापालिकेकडून शहर विद्रुपीकरण पुरस्कार देण्यात येत आहे. पुणे महानगरपालिकेच्या या खास मोहिमेचे पुणेकरांकडून स्वागत होत आहे. अशातच आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या मोहिमेचे कौतुक केले आहे.

Pune News: पुण्यात बेकायदा होर्डिंगची भाईगिरी बंद! CM फडणवीसांचे थेट आदेश; म्हणाले, 'उद्या माझेही नाव...',
CM Devendra Fadnavis
| Updated on: Nov 27, 2026 | 3:16 PM
Share

PMC Illegal Hoardings Campaign:  पुणे महानगरपालिकेने रस्त्यांवरील अतिक्रमण काढून रस्ते मोकळे केल्यानंतर आता शहराला विद्रुप करणाऱ्या होर्डिंग्सविरोधात कारवाई सुरु केली आहे. यासाठी पुणे महानगरपालिकेने खास मोहिम सुरु केली आहे. पुणे शहरात नाक्यावर, चौका-चौकावर फ्लेक्स लावणाऱ्यांना महापालिकेकडून शहर विद्रुपीकरण पुरस्कार देण्यात येत आहे. पुणे महानगरपालिकेच्या या खास मोहिमेचे पुणेकरांकडून स्वागत होत आहे. अशातच आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या मोहिमेचे कौतुक केले आहे.

काय म्हणालेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?

“पुण्यात सध्या अतिक्रमणाविरोधात आणि विशेषत: अवैध होर्डिंगविरोधात कारवाई सुरु आहे. मी पुणे महापालिका प्रशासनाचे अतिशय मनापासून कौतूक आणि अभिनंदन करतो. शहरातील पायाभूत सुविधांचा नागरिकांना योग्य वापर करता आला पाहिजे. वाहनांसाठी, पायी चालण्यासाठी जागा असल्या पाहिजेत. शेवटी नियम हे काही केवळ जीआर किंवा शासकीय दस्तावेजात प्रकाशित करण्यासाठी नसतात, ते पाळायचे सुद्धा असतात. याचा हेतू सर्वसामान्यांचे जीवन सुखकारक करणे हाच असतो, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

तसेच बेकायदेशीर होर्डिंग ही केवळ पुण्यात नाही, सर्वत्रच मोठी समस्या आहे. यावर सातत्याने आणि नियमितपणे कारवाई झालीच पाहिजे. त्यातही पुण्याने जी अभिनव आणि अस्सल ‘पुणेरी’ धाटणीतील संकल्पना स्वीकारली, त्याचे कौतूक करावे तितके कमी आहे. पुणे प्रशासनाला मी सांगेन…. उद्या माझ्या नावाचे बेकायदा होर्डिंग लागले, तर तुमच्या त्या पुरस्कारांच्या यादीत माझेही नाव जाहीर करा, असं आवाहनही त्यांनी केले आहे.

नागपुरमध्येही बेकायदेशीर होर्डिंग्सविरोधात मोहिम! 

त्याचबरोबर, आता येणार्‍या काळात नागपूर येथे विधिमंडळाचे अधिवेशन आहे, तेथेही आता बेकायदेशीर होर्डिंग्जचा धडाका सुरु होईल. नागपूर प्रशासनाने आतापासून जनजागृती करावी आणि शहर विद्रुप होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. नेते असोत की कार्यकर्ते, ते कायम जनतेतच दिसले पाहिजे, बेकायदा होर्डिंग्जवर नाही, असा थेट इशाराही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

Follow Us
वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक
Washim : वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक
पुण्यात 15 ऑगस्ट चौकात संशयित बॅग आढळली; तृप्ती देसाई काय म्हणाल्या?
Pune Bag Spoted : पुण्यात 15 ऑगस्ट चौकात संशयित बॅग आढळली; तृप्ती देसाई काय म्हणाल्या?
पुण्यातील गोळीबारानंतर पालकमंत्री सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये....
Sunetra Pawar Meeting : पुण्यातील गोळीबारानंतर पालकमंत्री सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बोलवली तातडीची बैठक
क्या बोलती पब्लिक? अभिजीत दिपकेंच्या सीजेपीचं नवं अभियान सुरू; थेट....
Abhijeet Dipke : क्या बोलती पब्लिक? अभिजीत दिपकेंच्या सीजेपीचं नवं अभियान सुरू; थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन जाणून घेतल्या समस्या
माझं विधान पुणे शहरापुरतं होतं, जिल्ह्याबद्दल नव्हतं; सुप्रिया सुळे...
Supriya Sule : माझं विधान पुणे शहरापुरतं होतं, जिल्ह्याबद्दल नव्हतं; सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?
रोहित पवार यांचं सुनेत्रा पवार यांच्याबद्दल ते वक्तव्य; सुप्रिया सुळे
Supriya Sule : रोहित पवार यांचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबद्दल ते वक्तव्य; सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया
ऑपरेशन 3.0 होणार की नाही? उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं; पक्षप्रवेश..
Uday Samant : Shivsena : ऑपरेशन 3.0 होणार की नाही? उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं; पक्षप्रवेशाच्या चर्चांवरही दिलं उत्तर, म्हणाले...
सोलापूर जिल्हा बँकेत भाजपचा एकहाती विजय; 19 पैकी 18 जागांवर सहकार....
Solapur DCC Bank Result : सोलापूर जिल्हा बँकेत भाजपचा एकहाती विजय; 19 पैकी 18 जागांवर भाजप प्रणित सहकार विकास पॅनलचा झेंडा
सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मोहिते पाटील गटाचा पहिला विजय....
Solapur DCC Bank Result : सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मोहिते पाटील गटाचा पहिला विजय; अर्जुनसिंह मोहिते पाटील यांची बाजी
संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या NCP कडून व्हिप जारी..
NCP : संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या NCP कडून व्हिप जारी; नेमका काय आहे पक्षाचा निर्देश?