मातृत्व की नोकरी: महिला आयोगानं टोचले कान, स्टेट बँकेचा निर्णय मागे

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: अजय देशपांडे

Updated on: Jan 29, 2022 | 9:56 PM

गर्भवती महिला उमेदवारांच्या नियुक्ती निकषावरुन स्टेट बँक ऑफ इंडियाला (State Bank of India) सोशल मीडियावर टीकेचं धनी व्हावं लागलं. तीन महिन्यांहून अधिक कालावधीच्या गर्भवती महिला उमेदवारांना स्टेट बँकेने नियुक्तीसाठी अपात्र ठरविले होते. त्यामुळे महिला उमेदवारांनी दिल्ली महिला आयोगाचे दार ठोठावले.

मातृत्व की नोकरी: महिला आयोगानं टोचले कान, स्टेट बँकेचा निर्णय मागे
स्टेट बँक ऑफ इंडिया

नवी दिल्ली :  गर्भवती महिला उमेदवारांच्या नियुक्ती निकषावरुन स्टेट बँक ऑफ इंडियाला (State Bank of India) सोशल मीडियावर टीकेचं धनी व्हावं लागलं. तीन महिन्यांहून अधिक कालावधीच्या गर्भवती महिला (Pregnant women) उमेदवारांना स्टेट बँकेने नियुक्तीसाठी अपात्र ठरविले होते. त्यामुळे महिला उमेदवारांनी दिल्ली महिला आयोगाचे दार ठोठावले. तसेच सोशल मीडियावर स्टेट बँकेच्या कथित निर्णयाविरोधात वाचा फोडली होती. अखेर स्टेट बँकेने बॅकफूटवर जात आपले निकष मागे घेतले आहेत. स्टेट बँकेत यापूर्वी नियुक्तीसाठी (Recruitment) सहा महिन्यांपर्यंतच्या गर्भवती महिलांना पात्र समजले जात होते. त्यासाठी डॉक्टरांचे प्रमाणपत्र सादर करण्याचे बंधन होते. मात्र, स्टेट बँकेने निकषात बदल करुन, तीन महिन्यांपेक्षा अधिक कालावधीच्या गर्भवती महिला उमेदवारांना नियुक्तीसाठी अपात्र ठरवले होते.

महिला आयोगाची नोटीस

दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी यावर बोलताना स्टेट बँकेचे सुधारित निकष कायदेबाह्य आणि भेदभाव करणारे असल्याचे मत व्यक्त केले आहे. याप्रकरणी महिला आयोगाकडून स्टेट बँकेला नोटीस पाठवून थेट विचारणा करण्यात आली आहे. हे प्रकरण महिलांच्या सामाजिक सुरक्षा अधिनियमनाच्या विरूद्ध असल्याचे नोटीसीत म्हटले आहे. तसेच संविधानाच्या समानतेच्या तत्वाचा भंग झाल्याचे सांगत स्टेट बँकेकडून याप्रकरणी उत्तर मागवण्यात आले होते.

मातृत्व की नोकरी ?

स्टेट बँक कर्मचारी संघाचे महासचिव के.एस.कृष्णा यांनी स्टेट बँकेला निर्णय मागे घेण्यासाठी पत्र लिहिले आहे. एखाद्या महिलेला मातृत्वाचा हक्क आणि रोजगार संबंधीचा निर्णय या दोघांपैकी निवड करण्यास परावृत्त करू नये. यामुळे मातृत्वाचा व रोजगार अधिकाराचा थेट भंग होतो. असे त्यांनी म्हटले आहे.

सर्वाधिक विस्ताराची बँक:

भारतीय स्टेट बँक सर्वात मोठी बँकिंग आणि वित्तीय सेवा कंपनी आहे.  157 परदेशी कार्यालयांसहित एकूण 15003 शाखा आहेत. मुंबई नंतर दिल्लीत सर्वात जास्त शाखा आहेत. स्टेट बँकेद्वारे भारतीयांनाच नव्हे तर अनिवासी भारतीयांना सेवा पुरविली जाते. भारतातील आणि भारताबाहेरील शाखांच्या नेटवर्कमधून बँकिंग सेवा पुरवते.

संबंधित बातम्या

सीमेवर धुसफूस मात्र चीनशी व्यापारी सख्य कायम; निर्यातीत 34 टक्क्यांची वाढ, आयात 28 टक्क्यांनी वाढली

सोन्याचा मोह सोडवेना; सोन्याची मागणी 50 टक्क्यांनी वाढली, भारतात सोन्याची मागणी 797.3 टनांवर

प्रचंड नुकसान! नववर्षात गर्भश्रीमंतांचे तब्बल 47.62 लाख कोटी बुडाले, शेअर बाजारातील अस्थिरतेचा फटका

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI