सीमेवर धुसफूस मात्र चीनशी व्यापारी सख्य कायम; निर्यातीत 34 टक्क्यांची वाढ, आयात 28 टक्क्यांनी वाढली

सीमेवर धुसफूस मात्र चीनशी व्यापारी सख्य कायम; निर्यातीत 34 टक्क्यांची वाढ, आयात 28 टक्क्यांनी वाढली
प्रातिनिधीक फोटो

India export to china: गेल्या वर्षी भारताची चीनला होणारी निर्यात 34 टक्क्यांनी वाढून 22.9 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. तर आयात 28 टक्क्यांनी वाढून 87.5 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: गोविंद हटवार, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Jan 29, 2022 | 3:38 PM

सीमेवर जगातील सर्वात मोठ्या सत्तेमध्ये जोरदार धुसफूस सुरू आहे. उखळ्या-पाखळ्या काढणे सुरू आहे. मात्र व्यावसायिक आणि व्यापारी पातळीवर दोन्ही देशांत कमालीचे सख्य दिसून येते. कोरोना संकट काळात (Corona Crisis) काळात गेल्या वर्षी चीनला होणाऱ्या निर्यातीत (India Export to China) वाढ झाली होती. वाणिज्य मंत्रालयाने (Ministry of Commerce) प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, गेल्या वर्षी भारताची चीनला होणारी निर्यात 34 टक्क्यांनी वाढून 22.9 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. 2019 मध्ये कोरोनापूर्वी ही निर्यात 17.1 अब्ज डॉलर होती. त्याचवेळी भारतात चिनी वस्तुंची आयात ही वाढली. आयात 28 टक्क्यांनी वाढून 87.5 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. 2019 मध्ये एकूण आयात 68.4 अब्ज डॉलर होती. या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी चीनसोबत व्यापार तूटही वाढली आहे. व्यापार तज्ञांचे म्हणणे आहे की, 2021 साली भारताची चीनला होणारी निर्यात चीनमधून होणाऱ्या आयातीपेक्षा जास्त वेगाने वाढली आहे. फेडरेशन ऑफ इंडियन एक्स्पोर्ट ऑर्गनायझेशन्सचे उपाध्यक्ष खालिद खान यांनी सांगितले की, निर्यातदारांना चीनला निर्यात वाढवण्याची खूप मोठी संधी आहे. या अहवालानुसार, चीनमधून कच्चा माल, इंटरमिजिएट गुड्स, कॅपिटल गुड्सच्या आयातीत वाढ नोंदवण्यात आली आहे. तर ग्राहकोपयोगी वस्तूंच्या आयातीत मात्र घट नोंदवण्यात आली आहे. 2019 च्या तुलनेत त्यात 14.7 टक्के घट झाली आहे.गेल्या वर्षी भारताचा सर्वाधिक व्यापार अमेरिकेसोबत झाला. 112.3 अब्ज डॉलरवर व्यापार पोहचला. अमेरिकेनंतर चीन (110.4 अब्ज डॉलर), यूएई (68.4 अब्ज डॉलर), सौदी अरेबिया (35.6 अब्ज डॉलर), स्वित्झर्लंड (30.8 अब्ज डॉलर) आणि हाँगकाँग (29.5 अब्ज डॉलर) यांचा क्रमांक लागतो.

एप्रिल-डिसेंबरच्या निर्यातीत जवळपास 50% वाढ

एप्रिल ते डिसेंबर 2021-22 दरम्यान चीनसोबतची निर्यात 49.66 टक्क्यांनी वाढून 301.38 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. आकडेवारीनुसार, या कालावधीत आयात 68.91 टक्क्यांनी वाढून 443.82 अब्ज डॉलरवर पोहोचली. व्यापार तूट 142.44 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. वाणिज्य मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, “डिसेंबर 2021 मध्ये मालाची निर्यात 37.81 अब्ज डॉलर झाली, तर डिसेंबर 2020 मध्ये निर्यातीचा आकडा 27.22 अब्ज डॉलर होता. त्यात 38.91 टक्के सकारात्मक वाढ दिसून आली.

500 बिलियन डॉलर निर्यातीचे लक्ष्य

पुढील आर्थिक वर्ष 2022-23 साठी भारताने 500 अब्ज डॉलर निर्यातीचे लक्ष्य ठेवले आहे. अतिरिक्त विदेश व्यापार महासंचालक (डीजीएफटी) अमिया चंद्रा यांनी ही माहिती दिली. कोरोनामुळे जागतिक पातळीवर व्यापार करण्याच्या पद्धतीत बदल करण्यात येत आहे. कोरोनाने बदल करण्याची प्रेरणा दिली. ‘चालू आर्थिक वर्षात आम्ही 400 अब्ज डॉलरच्या निर्यातीचे लक्ष्य गाठण्यास तयार आहोत. पहिल्या नऊ महिन्यांत देशाची निर्यात 301.38 अब्ज डॉलर इतकी झाली आहे. 2027 पर्यंत निर्यातीचे मोठे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.पाच वर्षांनी 1000 अब्ज डॉलर निर्यातीचे भारताचे लक्ष्य आहे.

सोन्याचा मोह सोडवेना; सोन्याची मागणी 50 टक्क्यांनी वाढली, भारतात सोन्याची मागणी 797.3 टनांवर

प्रचंड नुकसान! नववर्षात गर्भश्रीमंतांचे तब्बल 47.62 लाख कोटी बुडाले, शेअर बाजारातील अस्थिरतेचा फटका

Salary hike | पगारवाढीला अच्छे दिन! महामारीचा परिणाम ओसरला? कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

 

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें