शेफाली जरीवालाच्या मृत्यूबद्दल मोठी अपडेट अखेर समोर, 10 जणांचा नोंदवला जबाब, पोलिसांना संशय ‘या’ गोष्टीचा

Shefali Jariwala Death Update: ठणठणीत असलेल्या शेफाली जरीवाला हिचा अचानक कसं झालं निधन? मृत्यूबद्दल मोठी अपडेट आलीये समोर, पोलिसांना संशय नक्की कोणत्या गोष्टीचा, 10 जणांचा जबाब नोंदवल्यानंतर...

शेफाली जरीवालाच्या मृत्यूबद्दल मोठी अपडेट अखेर समोर, 10 जणांचा नोंदवला जबाब, पोलिसांना संशय या गोष्टीचा
फाईल फोटो
| Updated on: Jun 30, 2025 | 10:45 AM

Shefali Jariwala Death Update: कांटा लगा गर्ल शेफाली जरीवाला हिचं निधन 27 जून रोजी झालं. अभिनेत्रीच्या निधनाचं कारण हार्ट अटॅक सांगितलं जात आहे. पण खरं कारण तर शवविच्छेदनाचे रिपोर्ट समोर आल्यानंतर समोर येईल. सध्या पोलीस शेफालाच्या मृत्यू प्रकरणी कसून तपास करत असून अनेक संशय देखील पोलिसांना येत आहेत. पोलिसांना प्राप्त झालेल्या प्राथमिक अहवालात रक्तदाब कमी झाल्याने शेफाली बेशुद्ध पडली आणि त्यानंतर तिचा मृत्यू झाला अशी माहिती समोर येत आहे.

शेफाली मागील काही दिवसापासून सुंदर दिसण्यासाठी तसेच तरुण दिसण्यासाठी उपचार घेत होती. तिच्या घरात पोलिसांना व्हिटॅमिन सी आणि ग्लुथाथिओन ही औषध सापडली होती. पोलिसांना प्राप्त झालेल्या प्राथमिक अहवालानुसार शेफालीचा मृत्यूपूर्वी रक्तदाब कमी झाला होता अशी माहिती आहे. मृत्यूच्या एक दिवस आधी शेफालीच्या घरी पूजा होती आणि त्यानुळे तिने उपवासही ठेवला होता अशी माहिती समोर आलीय.

 

 

पोलिसांनी नोंदवले आहेत अनेकांचे जबाब

शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत मुंबई पोलिसांनी अपडेट दिले आहे. मुंबईच्या अंबोली पोलिसांनी आतापर्यंत 10 जणांचे जबाब नोंदवले आहेत. शवविच्छेदन रिपोर्टनंतर मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होईल, जो एक-दोन दिवसांत येण्याची अपेक्षा आहे. पोलिसांनी संपूर्ण बिल्डिंग परिसरातील सीसीटीव्ही फुटेज देखील पाहिल्या आहे. ज्यामध्ये संशयास्पद असं काहीही पोलिसांच्या नजरेत आलं नाही. आतापर्यंतच्या तपासात कोणतील वादग्रस्त गोष्ट पोलिसांच्या हाली लागलेली नाही.

सुरक्षित ठेवण्यात आले आहेत शवविच्छेदनाचे रिपोर्ट

पोलिसांनी ज्या लोकांचे जबाब नोंदवले आहेत त्यात अभिनेत्रीचा पती पराग त्यागी आणि तिच्या घरातील स्वयंपाकी यांचा समावेश आहे. यापूर्वी मनी कंट्रोलने मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ’42 वर्षीय शेफाली जरीवाला हिचा मृतदेह शविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. तिच्या मृत्यूचं कारण अद्याप सुरक्षित ठेवण्यात आलं आहे. सुरुवातीच्या माहितीनुसार, हा नैसर्गिक मृत्यू असल्याचं दिसून येतं आणि त्यात कोणताही गैरप्रकार झालेला नाही.’ सध्या सर्वत्र शेफाली जरीवाला हिच्या मृत्यीची चर्चा सुरु आहे.

शेफाली जरीवाला हिच्या निधनानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. शुक्रवारी रात्री अभिनेत्रीच्या छातीत वेदना होऊ लागल्या. त्यानंतर पती पराग त्यागी आणि अन्य तिघांनी शेफाली हिला जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केलं. पण तोपर्यंत उशीर झाला होता.  रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी शेफाली हिला मृत घोषित केलं.