व्हॅलेन्टाईन डे आणि जोडी जुळली! बिग बॉसच्या घरात अनोखा क्षण

राहुल वैद्यने बिग बॉसच्या घरात दिशाला लग्नाची मागणी घातली. विशेष म्हणजे त्यावर दिशाने होकारही कळवला (Bigg Boss 14 Disha Parmar accepted Rahul Vaidyas proposal).

व्हॅलेन्टाईन डे आणि जोडी जुळली! बिग बॉसच्या घरात अनोखा क्षण
| Updated on: Feb 14, 2021 | 11:57 PM

मुंबई : जगभरात आज व्हॅलेन्टाईन दिवस साजरा करण्यात आला. बिग बॉसच्या घरातही व्हॅलेन्टाईन डेच्या दिवशी फार गुलाबी असं वातावरण होतं. बिग बॉसचा आजचा एपिसोड हा प्रत्येक स्पर्धक विशेषत: गायक राहुल वैद्य आणि त्याची गर्लफ्रेंड दिशा परमार यांच्यासाठी अविस्मरणीय राहील. कारण राहुलने आज बिग बॉसच्या घरात दिशाला लग्नाची मागणी घातली. विशेष म्हणजे त्यावर दिशाने होकारही कळवला (Bigg Boss 14 Disha Parmar accepted Rahul Vaidyas proposal).

बिग बॉसच्या घरात आज राहुल वैद्यची मैत्रीण दिशा परमार आली. लाल रंगाच्या साडीत दिशा फार सुंदर दिसत होती. दिशा बिग बॉसच्या घरात शिरताच राहुलला आनंदाचा सुखद धक्का बसला. सुरुवातीला दोघं एकमेकांकडे बघतच राहीले. त्यांना हे सगळं स्वप्नवत वाटत होतं. थोड्या क्षणासाठी ते त्यांच्या दुनियेतच हरवले. त्यानंतर राहुलच्या डोळ्यांमधून अश्रू आले.

दिशाने राहुलच्या चेहऱ्यावर स्मितहास्य आणण्याचा प्रयत्न केला. या पेक्षा आणखी सुंदर दिवस कुठला होऊ शकत नाही, असं दिशा म्हणाली. दोघांनी एकमेकांना काचेच्या भिंतीवर लिप किसही केलं (Bigg Boss 14 Disha Parmar accepted Rahul Vaidyas proposal).

राहुल आणि दिशाच्या लग्नाची तयारी सुरु

राहुल वैद्यने दिशाला तिच्या वाढदिवशी 8 नोव्हेंबरला नॅशनल टेलिव्हिजनवर प्रपोज केलं होतं. त्यानंतर त्याने आज पुन्हा एकदा दिशापुढे आपल्या मनातील प्रेम व्यक्त करत लग्नासाठी मागणी घातली. राहुलने जमिनीवर गुडघा टेकत दिशाला माझ्यासोबत लग्न करशील का? असं विचारलं. दिशाने त्याची मागणी स्वीकार केली. ती सोबत बॅनर घेऊन आली होती. त्या बॅनरवर ‘आय विल मॅरी यू’ असं लिहिलं होतं. दरम्यान, राहुल आणि दिशा लवकरच लग्नबंधनात अडकण्याची शक्यता आहे. कारण त्यांच्या लग्नाची आता तयारीदेखील सुरु झाली आहे. राहुलची आई गीता वैद्यने एका मुलाखतीत दोघांचं लग्न जूनमध्ये होईल, असं म्हटलं होतं.

हेही वाचा : केंद्र सरकारच्या सर्व कर्मचाऱ्यांना आता कार्यालयातून काम करावं लागणार, सरकारचा नवा आदेश