
मुंबई : ‘बिग बॉस १६’ (Bigg Boss 16) फेम अभिनेता शालीन भनोट कायम त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतो. अनेक मालिकांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांच्या मनात राज्य केलेल्या शालीन भनोट याची चर्चा सध्या तुफान रंगलेली आहे. पण आता अभिनेत्याच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. शालीन सध्या ‘बेकाबू’ मालिकेच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. मालिकेच्या शुटिंग दरम्यान सेटवर अभिनेता जखमी झाला आहे. सध्या सर्वत्र शालीन याच्या अपघाताची चर्चा आहे. अभिनेता शुटिंगच्या सेटवर जखमी झाल्याचं कळताच चाहत्यांनी चिंता व्यक्त केली. शालीनच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. मालिकेत एका ॲक्शन सीनचं शूटिंग करत असताना अभिनेता जखमी झाला असल्याची माहिती समोर येत आहे.
महत्त्वाचं म्हणजे जखमी झाल्यानंतर देखील शालीन याने मालिकेची शुटींग सुरु ठेवली. जखमी अवस्थेत देखील अभिनेता शूट करत राहिला. शालिन सध्या दिवस-रात्र या मालिकेचं शुटिंग करत असल्याची माहिती मिळत आहे. शालीन आवश्यक तेवढी विश्रांती घेत मालिकेचं शुटिंग करत आहे. महत्त्वाचं म्हणजे सेट झालेल्या घटनेबद्दल शालीन किंवा मालिकेच्या टीमने काहीही सांगितलं नाही. त्यामुळे चाहते अधिक चिंता व्यक्त करत आहेत.
दरम्यान एका मुलाखतीत अभिनेता म्हणाला, ‘मी पहिल्यांदा जेव्हा बेकाबू मालिकेच्या सेटवर पोहोचलो, तेव्हा प्रचंड घाबरलो होते.. थोडं दडपण होतं… मालिका वेगळी आहे. शिवाय मालिकेतील भूमिका देखील वेगळ्या आहेत. म्हणून मालिकेत रावणाची भूमिका साकारण्यासाठी मला वेगळं वाटत आहे. मालिकेसाठी मी खूप मेहनत घेत आहे. म्हणून प्रेक्षकांनी भरभरून प्रेम द्यावं.. अशी इच्छा आहे…’ असं देखील अभिनेता म्हणाला.
प्रोफेशन आयुष्यासोबत अभिनेता खासगी आयुष्यामुळे देखील कायम चर्चेत असतो. नुकताचं शालीन याची पहिली पत्नी दलजीत कौर हिने दुसरं लग्न केलं आहे. रविवारी अभिनेत्रीने बॉयफ्रेंड निखिल पटेल याच्यासोबत लग्न केलं. दलजीत आणि निखिल यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. सध्या सोशल मीडियावर दलजीत आणि निखिल यांच्या लग्नाची चर्चा रंगली आहे.
काही दिवसांपूर्वी दलजीत हिला शुभेच्छा देत शालीन म्हणाला, ‘मी तिच्यासाठी उत्तम आयुष्याची प्रार्थना करतो. तिच्या आयुष्यात भरपूर प्रेम राहवं यासाठी मी शुभेच्छा करतो. मी तिच्या नव्या आयुष्यासाठी आणि नव्या सुरुवातीसाठी आनंदी आहे…’ असं अभिनेता म्हणाला.
दलजीद हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत नव्या आयुष्याला लवकरच सुरुवात करणार असल्याची माहिती चाहत्यांना दिली होती, आता अभिनेत्रीचे लग्नाचे फोटो व्हायरल होत आहेत. दलजीत आणि निखिल यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी दोघांना नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.