Rain Update : मुंबईत पावसाने केलं नववर्षाचं स्वागत, ऐन थंडीत पावसाची जोरदार बॅटिंग; पुढचे 4 दिवस..
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबईत 2026 मध्ये पहाटे जोरदार पावसाने हजेरी लावली. ऐन थंडीत आलेल्या या अनपेक्षित पावसामुळे सीएसएमटी, दादरसह अनेक भागांत नागरिकांची तारांबळ उडाली. नवीन वर्षाचे स्वागत उत्साहात करणाऱ्या मुंबईकरांना पहाटेच्या या पावसाने चक्क चक्रावून टाकले. हे वातावरणातील बदल अनेकांना आश्चर्यचकित करणारे ठरले.

सरत्या वर्षाला निरोप देऊन सर्वांनीच थाटात 2026 या नववर्षाच स्वागत केलं. मात्र नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबईमध्ये जोरदार पावसान हजेरी लावली आहे. सीएसएमटीसह दादर परिररात जोरदार पावसाची बॅटिंग सुरू होती. अचानक आलेल्या या पावसामुळे नागिरकांची मात्र मोठी तारांबळ उडाल्याचे पहाला मिळालं. नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी गुरूवारी पहाटे मुंबईत जोरदार पावसाचे आगमन झाले. न्यू ईअर सेलिब्रिशेन करून अनेक जण मध्यरात्री घरी निवांत झोपले, तर काही उत्साही वीर पहाटेपर्यंत पार्टी करत होते. मात्र तेवढ्यात पहाटे पहाटेच ऐन थंडीत पावसाचे आगमन झाले आणि जोरदार पाऊस कोसळू लागली.
मुंबईतील सीएसएमटी परिसरात पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या. तसेच दादर, प्रभदेवी, लोअर परळ या भागातही पावसाची रिपरिप सुरू होती. ऐन थंडीत आलेल्या या पावसाने सगळेच चक्रावले. हवाहवासा गारवा असतानाच अचानक पाऊसही आल्याने मुंबईकरांची मात्र काही वेळासाठी त्रेधातिरपीट उडाल्याचं पहायला मिळालं.
तापमानात घट
गेल्या काही दिवसांत राज्यातील अनेक भागांमध्ये किमान तापमानात लक्षणीय घट झाली असून काही ठिकाणी तर तापमानाचा पार 10 अंशांच्याही खाली गेल्याचं दिसलं. थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला नसला तरी पहाटे आणि रात्रीनंतर गारवा वाढत चालला आहे. मुंबई, कोकण आणि किनारी भागांमध्ये रात्री व पहाटे थंड वारे वाहत असून थंडीची चाहूल कायम आहे. त्यामुळे नागरिक ठिकठिकाणी शेकोट्या वगैरे पेटवून ऊब मिळवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. असं असलं तरी सूर्य डोक्यावर आल्यावर दुपारी वातावरणातील उष्मा वाढत आहे, त्यामुळे दिवसा व रात्रीच्या तापमानात जमीन-अस्मानाचा फरक दिसून येत आहे.
पुढचे 4 दिवस गारठणार महाराष्ट्र
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस उत्तर महाराष्ट्रात थंडीचा प्रभाव चांगलाच जाणवणार आहे. तिथे तापमान एक अंकी म्हणजे 7 ते 8 अंशांच्या दरम्यान राहू शकतं. तसेच मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांसाठी पुढील चार दिवस थंडी कायम राहण्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. वाढतं धुकं दाट होत असल्याने नागरिकांनी वाहन चालवताना काळजी घ्यावी असे आवाहनही करण्यात आले आहे.
बातमी अपडेट होत आहे.
