Bigg Boss 18: ग्रँड फिनालेमधून शॉकिंग एलिमिनेशन; टॉप 6 स्पर्धकांपैकी 2 जणांना थेट घरचा रस्ता

बिग बॉस 18 च्या ग्रँड फिनालेमधून मोठी अपडेट समोर आली आहे. प्रेक्षकांना थक्क करणारी ही माहिती आहे. टॉप 6 जणांपैकी 2 जणांना थेट घरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. बिग बॉसकडून X हँडलवर तशी नावांची यादीच जाहीर करण्यात आली आहे.

Bigg Boss 18: ग्रँड फिनालेमधून शॉकिंग एलिमिनेशन; टॉप 6 स्पर्धकांपैकी 2 जणांना थेट घरचा रस्ता
| Updated on: Jan 19, 2025 | 8:20 PM

सलमान खानचा शो बिग बॉसचा ग्रँड फिनाले सुरू होण्याला आता काहीच तास बाकी आहेत. आज (19 जानेवारी 2025) ‘बिग बॉस 18’ चा ग्रँड फिनाले आहे. 15 आठवडे चाललेल्या या शोमध्ये आता फक्त 6 स्पर्धक उरले आहे. पण आता आलेल्या सर्वात मोठ्या बातमीनुसार 6 पैकी आता 2 स्पर्धक बाहेर पडले आहेत. प्रेक्षकांना थक्क करणारी ही बातमी आहे.

ग्रँड फिनालेमधून मोठी अपडेट

सलमान खान होस्ट करत असलेल्या या शोचा ग्रँड फिनाले आज रविवारी (19 जानेवारी 2025) ला आहे. काही वेळातच ग्रँड फिनालेला सुरुवात होईल. ऑक्टोबरमध्ये सुरू झालेल्या या शोमध्ये अनेक स्पर्धक सहभागी झाली आणि अनेक एलिमिनेट झाले. शोला टॉप सहा फायनलिस्ट मिळाले.

मात्र शोच्या स्पर्धकांबाबत अशी बातमी आली आहे जी चाहत्यांना आश्चर्यचकित करू शकते. 6 स्पर्धकांपैकी दोन स्पर्धक बाहेर पडले असून टॉप 4 स्पर्धकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. आता या टॉप 4 मधून कोण विजेता होणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

आता उरले फक्त 4 स्पर्धक

बिग बॉसने जाहीर केलेल्या लिस्टवर विश्वास ठेवला तर शोच्या ग्रँड फिनालेमधून ही नक्कीच मोठी बातमी आहे. शोच्या सहा स्पर्धकांपैकी दोन स्पर्धकांना बाहेर काढण्यात आले आहे. चुम दरंग आणि ईशा सिंग यांना शोमध्ये कमी मते मिळाली असून त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

आता शोमध्ये फक्त 4 स्पर्धक उरले आहेत. या स्पर्धकांच्या नावांमध्ये रजत दलाल, विवियन डिसेना, करणवीर मेहरा आणि अविनाश मिश्रा यांचा समावेश आहे. त्यामुळे आता शेवटी काय होणार यासाठी प्रेक्षकांनाही आतुरता लागली आहे.

Bigg Boss 18 चा ग्रँड फिनाले कधी, कुठे पाहायचा?

बिग बॉस 18 चा ग्रँड फिनाले आज रविवारी रात्री 9.30 वाजता कलर्स चॅनलवर पाहता येईल. तसेच बिग बॉसचा ग्रँड फिनाले जिओ सिनेमावर प्रेक्षकांना लाइव्ह पाहता येणार आहे.तसेच फिनालेमध्ये आधीचे देखील स्पर्धक हजेरी लावणार असून धम्माल पाहायला मिळणार आहे.

विजेत्याला किती रक्कम मिळणार?

या पर्वातील विजेत्याला बिग बॉसच्या ट्रॉफीसह बक्षीस म्हणून 50 लाख रुपये मिळणार आहेत. तसेच स्पॉन्सर्सकडून इतरही काही भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. निर्मात्यांनी ठराविक पैसे घेऊन शो सोडण्याचा पर्याय फिनालेमध्ये ठेवल्यास ती रक्कम विजेत्याच्या रकमेतून वजा होऊ शकते.