
टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय आणि वादग्रस्त रिॲलिटी शो ‘बिग बॉस 19’ची सुरुवात रविवारी 24 ऑगस्टपासून झाली. बिग बॉसच्या घरात 16 सदस्य सहभागी झाले आणि शोच्या पहिल्याच दिवशी त्यांच्यात बाचाबाची झाल्याचं पहायला मिळालं. तर या दिवसाची सुरुवात मजेशीर ट्विस्टने झाली. बिग बॉसच्या पहिल्याच दिवशी एविक्शन झाल्याने प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का बसला. जम्मू-काश्मीरच्या फरहाना भट्टला वीकेंड का वारच्या आधीच बिग बॉसने बेघर केलं. परंतु यातही मोठा ट्विस्ट आहे. विशेष म्हणजे सूत्रसंचालक सलमान खानसोबतच ‘बिग बॉस 19’मध्ये यावेळी ज्या स्पर्धकांकडे पॉवर आहे, त्यात आधी मृदुल तिवारीला निवडलं गेलं होतं. कारण तो बेडरुममध्ये झोपत नव्हता. परंतु त्यानंतर फरहानाला थेट बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.
यंदाच्या सिझनची थीमच ‘घरवालों की सरकार’ आहे. याअंतर्गत घरातून बेघर कोणाला करायचं हे स्पर्धकांनाच ठरवायचं आहे. त्यानुसार फरहाना भट्टचं घरातील इतर स्पर्धकांशी फारसं पटलं नाही आणि तिच्याविरोधात जोरदार वोटिंग झाली. या वोटिंगनुसार तिला बाहेर काढण्यात आलं. परंतु, नंतर निर्मात्यांनी त्यात मोठा ट्विस्ट आणला आणि फरहानाला सिक्रेट रुममध्ये पाठवलं. जिथून तिला घरातील इतर सदस्यांच्या हालचालींवर नजर ठेवता येईल.
They tried to silence Farhana with nominations, but fearless souls can’t be dimmed 🔥
From the Secret Room, she’s watching every face, every word 👁️
And when she returns, the house better be ready for her reply 💯#BB19 | #BigBoss19 | #colorstv #BiggBoss19OnJioHotstar… pic.twitter.com/CEMRfbTai7— Farrhana Bhatt (@Farrhana_bhatt) August 25, 2025
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (ट्विटर) अकाऊंटवर फरहानाने ट्विट करत लिहिलं, ‘घरातल्यांनी फरहानाला नॉमिनेशनने गप्प करण्याचा प्रयत्न केला, परंतु निडर व्यक्तीवर दबाव आणला जाऊ शकत नाही. सिक्रेट रुममधून ती प्रत्येक चेहऱ्यावर, प्रत्येक शब्दावर नजर ठेवून आहे. त्यामुळे जेव्हा ती परत येईल, तेव्हा घरातल्यांना तिच्या उत्तरासाठी तयार राहावं लागेल.’ त्यामुळे फरहाना ‘बिग बॉस 19’मधून अद्याप बाहेर गेली नाही. तिला सिक्रेट रुममध्ये ठेवलं जाणार असून तिथून ती इतर स्पर्धकांच्या हालचालींवर नजर ठेवून असणार आहे. इतकंच नव्हे तर यामुळे ती इतर स्पर्धकांच्या खेळीला समजून पुन्हा घरात वापसी केल्यानंतर तिच्या खेळीत सुधारणा करू शकते.
सिक्रेट रुममध्ये जाण्याआधी किचनमध्ये नाश्ता बनवताना कुनिका आणि फरहाना यांच्यात भांडणं होतात. फरहाना किचनमध्ये नाश्ता बनवताना खूप कचरा करते, ते पाहून कुनिका तिच्यावर चिडते. ती फरहानाला किचनचा ओटा स्वच्छ करायला सांगते. परंतु फरहाना तिचं ऐकत नाही. उलट चिडून तिला प्रत्युत्तर देते. इथूनच दोघांमधील भांडणाला सुरुवात होते.