Bigg Boss 19 च्या घरात मोठा धोका टळला, स्पर्धकांनी गमावले असते प्राण, बसीर याच्यामुळे…

Bigg Boss 19: 'बिग बॉस 19' च्या घरात पुढे काय होणार, टळला मोठा धोका... स्पर्धकांच्या बेतलं असतं जीवावर... झालं असतं मोठं नुकसान... बसीर याच्यामुळे..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त 'बिग बॉस 19' च्या घरात घडलेल्या घटनेची चर्चा...

Bigg Boss 19 च्या घरात मोठा धोका टळला, स्पर्धकांनी गमावले असते प्राण, बसीर याच्यामुळे...
फाईल फोटो
| Updated on: Sep 08, 2025 | 10:24 AM

Bigg Boss 19: अभिनेता सलमान खान याच्या वादग्रस्त ‘बिग बॉस 19’ शोची चर्चा सर्वत्र सुरु आहे. स्पर्धकांमध्ये होणारे वाद आता प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. विकेंड का वारमध्ये देखील अनेक खुलासे झाले असून वाइल्ड कार्ड एन्ट्री झाली. आचा येत्या एपिसोडमध्ये तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळत आहे. ज्यामुळे घरात खळबळ माजू शकते. खरंतर, येणाऱ्या एपिसोडमध्ये, घरात घडलेली एक मोठी आणि गंभीर चूक उघडकीस येईल आणि ती दुसऱ्या कोणी नाही तर बसीर अली याने शोधून काढली. सकाळी घराची तपासनी करताना रात्रभर गॅस सुरु होता… हे बसीर याच्या निर्दशनास आलं.

येणाऱ्या एपिसोड्समध्ये तुम्हाला दिसेल की या चुकीमुळे घरातील सर्व सदस्यांची सुरक्षितताच धोक्यात आली असती, एवढंच नाही तर, शोच्या व्यवस्थापन आणि देखरेखीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले. यावर बसीर संतापला आणि सदस्यांना कामं गांभीर्याने करण्याचा सल्ला दिला. यावर सदस्यांनी देखील संमिश्र प्रतिसाद दिला, तर काही स्पर्धकांनी चूक स्वीकार केली आणि काहींनी निष्काळजीपणाबद्दल माफी मागितली, तर काहींनी इशाऱ्याकडे दुर्लक्ष केलं आणि बसीरच्या चिंता फक्त अतिशयोक्तीपूर्ण असल्याचे म्हटलं. या मतभेदामुळे वादविवाद सुरू झाला.

वादविवादादरम्यान, अनेक आरोप-प्रत्यारोप होतील आणि प्रकरण वैयक्तिक पातळीवर पोहोचेल. बसीर काही घरातील सदस्यांवर जबाबदारीपासून पळून जाण्याचा आणि त्यांची चूक न स्वीकारण्याचा आरोप करेल, ज्यामुळे घरातील वातावरण आणखी बिघडेल.

या घटनेवरून बिग बॉसच्या घरात केवळ मनोरंजनच नाही तर सुरक्षितता आणि जबाबदारी किती महत्त्वाची आहे हे दिसून येतं. बसीरचे उत्कट आवाहन आणि त्याचा राग हे दर्शवितं की अशा निष्काळजीपणामुळे मोठा अपघात होऊ शकतो. अपघात झाला असता तर, स्पर्धकांचे प्राण देखील जाऊ शकले असते…

सांगायचं झालं तर, ‘बिग बॉस 19’ शोची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. शोचे काही फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, अभिनेत्री शहनाज गिल हिचा भाऊ शहबाज याची देखील शोमध्ये वाइल्डकार्ड एन्ट्री झाली आहे. त्यामुळे शोमध्ये आता पुढे काय होणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. जसजसा सीझन पुढे सरकत आहे तसतसं प्रेक्षकांना मनोरंजनासोबतच भावनिक आणि धोरणात्मक पातळीवर अनेक खोलवर गुंतलेल्या घटना पाहायला मिळत आहेत.