AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बलात्कारप्रकरणी प्रसिद्ध अभिनेत्याला पुण्यातून अटक, ‘ती’ टेस्ट केल्यानंतर 15 मिनिटांत समोर येईल मोठं सत्य

बलात्कार, शारीरिक क्षमता आणि 'ती' टेस्ट..., 15 मिनिटांत समोर येईल अभिनेत्याचं मोठं सत्य, पुण्यातून अभिनेत्याला करण्यात आलीये अटक..... पार्टीत अभिनेता आणि मित्राने बलात्कार केल्याचे आरोप..., अभिनेत्रीच्या अडचणीत मोठी वाढ

बलात्कारप्रकरणी प्रसिद्ध अभिनेत्याला पुण्यातून अटक, 'ती' टेस्ट केल्यानंतर 15 मिनिटांत समोर येईल मोठं सत्य
फाईल फोटो
| Updated on: Sep 07, 2025 | 1:54 PM
Share

Ashish Kapoor: प्रसिद्ध टीव्ही अभिनेता आशीष कपूर याच्यावर एका महिलेने बलात्काराचे आरोप केले आहे. दिल्ली पोलिसांनी अभिनेत्याला बुधवारी अटक केली आहे. आता समोर येत असलेल्या माहितीनुसार अभिनेत्याती पोटेंसी टेस्ट केली जाणार आहे. सांगायचं झालं तर, एका महिलेने आशिष कपूरवर आरोप केला आहे की, 2 ऑगस्ट रोजी दिल्लीत एका घरात पार्टी आयोजित करण्यात आली होती. या दरम्यान, अभिनेत्याने वॉशरूममध्ये तिच्यावर बलात्कार केला. आता आशीष याची पोटेंसी टेस्ट करणार असल्याची माहिती समोर येत आहे…

काय आहे संपूर्ण प्रकरण?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला आणि अशिष कपूर यांची इन्स्टाग्रामवर ओळख झाली होती. त्यानंतर दोघांची मैत्री झाली आणि पर्टीची योजना आखण्यात आली… या पार्टीत पीडित महिला देखील सामिल होती. सुरुवातीला पीडितेने आशिष कपूर, त्याचा मित्र आणि दोन अज्ञात व्यक्तींनी तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला होता. एवढंच नाही तर, एका महिलेने तिला मारहाण देखील केली. नंतर, पीडितेने तिचे म्हणणं बदललं आणि सांगितलं की, फक्त आशिषनेच तिच्यावर बलात्कार केला.

यापूर्वी, घटनेचा व्हिडीओ देखील शूट करण्यात आल्याचा दावा पीडितेने केला होता. पण पोलिसांना अद्याप असा कोणताही व्हिडिओ सापडलेला नाही. सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या जबाबांच्या तपासणीत असं दिसून आलं आहे की आशिष कपूर आणि ती महिला पार्टी दरम्यान एकत्र वॉशरूमला गेले होते.

कोण आहे आशीष कपूर?

आशीष कपूर प्रसिद्ध आणि लोकप्रिय टीव्ही अभिनेता आहे. अभिनेत्याने ‘ये रिश्ता क्या कहलाता है’, ‘देखा एक ख्वाब’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं. शिवाय त्याने सिनेमांमध्ये देखील काम केलं आहे. ‘कुर्बान’, ‘टेबल नंबर 21’ आणि ‘इनकार’ यांसारख्या सिनेमांमध्ये काम केलं.

पॉन्टेंसी टेस्ट म्हणजे काय?

लैंगिक शोषणाच्या प्रकरणांमध्ये, पॉन्टेंसी टेस्ट केली जाते. खरं तर, अशी अनेक प्रकरणं आहेत ज्यात आरोपी शारीरिक क्षमतेचा हवाला देऊन म्हणतो की त्याच्यात शारीरिक संबंध ठेवण्याची ताकद नाही. ही क्षमता वैद्यकीय तपासणीद्वारे निश्चित केली जाते. ही चाचणी 10 ते 15 मिनिटांत व्यक्तीच्या लैंगिक संबंध ठेवण्याच्या क्षमतेबद्दल सहजपणे सांगते. त्यामुळे आता याप्रकरणात काय होणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
संजय राऊतांनी आधी उबाठा गट काँग्रेसमध्ये विलीन करावा; नवनाथ बन यांचा..
संजय राऊतांनी आधी उबाठा गट काँग्रेसमध्ये विलीन करावा; नवनाथ बन यांचा खोचक टोला!
आनंदाचा शिधा घेण्यासाठी महिलांची तुफान गर्दी; खासदार संजय देशमुख....
Washim : आनंदाचा शिधा घेण्यासाठी महिलांची तुफान गर्दी; खासदार संजय देशमुख यांच्या कार्यालयाबाहेर मोठी झुंबड
दिवाळीच्या फटाक्यांनी मुंबईची हवा बिघडवली; BKC मध्ये AQI 170 वर....
Mumbai Air Pollution : दिवाळीच्या फटाक्यांनी मुंबईची हवा बिघडवली; BKC मध्ये AQI 170 वर, निर्बंध झुगारून आतषबाजी सुरूच
युतीतच डावललं जात असेल तर फायदा काय? शिंदे गटाच्या नेत्यांची एकनाथ....
Shinde Group Vs BJP : युतीतच डावललं जात असेल तर फायदा काय? शिंदे गटाच्या नेत्यांची एकनाथ शिंदेंकडे भाजपविरोधात तक्रार, नेमकं काय घडतंय?
E20 पेट्रोलमध्ये इथेनॉलचं प्रमाण 30 टक्क्यांपार? कर्नाटकच्या अहवालाने
Rahul Gandhi : E20 Petrol : E20 पेट्रोलमध्ये इथेनॉलचं प्रमाण 30 टक्क्यांपार? कर्नाटकच्या अहवालाने खळबळ; राहुल गांधींचा केंद्र सरकारवर निशाणा
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत तटकरे यांचं ते वक्तव्य; रुपाली ठोंबरे..
NCP : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत सुनील तटकरे यांचं ते वक्तव्य; रुपाली ठोंबरे पाटील काय म्हणाल्या?
निमंत्रण असूनही आशिष म्हात्रेंची दिवाळी पहाट कार्यक्रमाकडे पाठ
Thane Diwali Pahat : Meenakshi Shinde : निमंत्रण असूनही आशिष म्हात्रेंची मीनाक्षी शिंदेंच्या दिवाळी पहाट कार्यक्रमाकडे पाठ; नेमकं कारण काय?
आत्ताच्या 3 महत्त्वाच्या घडामोडी; शरद पवारांना रुग्णालयातून डिस्चार्ज
Sharad Pawar Health Update : आत्ताच्या 3 महत्त्वाच्या घडामोडी; शरद पवारांना रुग्णालयातून डिस्चार्ज, तर....
रणवीर सिंगकडे 20 कोटींची खंडणी मागणारा हॅरी बॉक्सर अमेरिकेत अटकेत.....
Lawrence Bishnoi Gang : रणवीर सिंगकडे 20 कोटींची खंडणी मागणारा हॅरी बॉक्सर अमेरिकेत अटकेत; रोहित शेट्टीच्या टीमलाही....
मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष का फोडला? मोदींच्या विधानावर राऊतांचा थेट
Sanjay Raut : मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष का फोडला? मोदींच्या विधानावर संजय राऊतांचा थेट सवाल; 36 खासदारांचा आकडाही सांगितला