AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Local Train : चर्चगेट-विरार फास्ट लोकलमध्ये थरार, धावत्या ट्रेनमधून प्रवासी थेट खाली पडला, नेमकं काय घडलं?

Mumbai Local Train News : मुंबई लोकमध्ये धावत्या ट्रेनमध्ये दोन प्रवाशांमध्ये जोरदार हाणामारीची घटना घडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून या हाणामारीत एक प्रवासी थेट धावत्या ट्रेनमधूनच खाली पडला. नेमकं काय घडलं होतं?

Mumbai Local Train : चर्चगेट-विरार फास्ट लोकलमध्ये थरार, धावत्या ट्रेनमधून प्रवासी थेट खाली पडला, नेमकं काय घडलं?
Mumbai Local Train NewsImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 07, 2026 | 3:08 PM
Share

हिरा ढाकणे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी : मुंबई लोकलसंबंधी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबई लोकलमध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या हाणामारीमध्ये एक प्रवासी चक्क धावत्या ट्रेनमधून खाली पडला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे मुंबई लोकलमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. ही घटना चर्चगेट-विरार फास्ट लोकलमध्ये गुरुवारी रात्री १०.३० च्या सुमारास घटना घडली आहे.  ग्रँट रोड आणि मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान दरवाजात उभे राहण्यावरून वाद झाल्याची प्राथमिक माहिती आहे. याच वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आहे.

दरम्यान मारहाणीदरम्यान एक प्रवासी धावत्या लोकलमधून खाली पडला आहे. परंतू मुंबई सेंट्रल स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवरून ट्रेन जात असताना वेग कमी असल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दररोज ७५ लाखांहून अधिक तर काही अंदाजानुसार जवळपास १ कोटी नागरिक लोकलने प्रवास करतात. मुंबई लोकलमध्ये अशा प्रकारच्या घटना घडण्याची ही काही पहिली वेळ नाही. यापूर्वीही अनेकदा अशा हिंसक घटना घडल्या आहेत. धावत्या लोकलमध्ये असो वा मुंबईतील लोकल स्टेशन्स असो अनेक घटना समोर येतात. ज्यामध्ये हाणामारी, चोरी एवढंच नाही तर खुनाच्या घटनाही घडलेल्या आहे.

काहीच महिन्यांआधी चर्चगेट ते नालासोपारा या धावत्या लोकल ट्रेनमध्ये फर्स्ट क्लास डब्यामध्ये मयांक लोहार या युवकाची हत्या करण्यात आली होती. मुसळधार पावसामुळे लोकलचा दरवाजा बंद करण्यावरुन दोघांमध्ये वाद झाला होता. हा वाद पुढे विकोपाला गेला आणि रोशन सुवर्णा या अंधेरीतील रहिवासी तरुणाने मयांकवर धारदार शस्त्राने भयंकर हल्ला चढवला. यामध्ये मयांकचा दुर्देवी मृत्यू झाला होता.

मुंबईतील नागरिक लोकलने प्रवासाला प्राधान्य देण्याचं कारण म्हणजे मुंबईत रस्ते मार्गावरील वाहतूक कोंडीमुळे प्रवास वेळ जास्त लागतो, तर लोकल ट्रेन सर्वात वेगवान आणि खिशाला परवडणारी आहे. विरार, कल्याण, पनवेल, ठाणे यांसारख्या दूरच्या उपनगरांना मुंबईच्या मुख्य व्यापारी केंद्रांशी लोकल जोडून ठेवते. त्याचमुळे लोकलचा प्रवास अनेकांना सोपा वाटतो, पण त्याचवेळी सुरक्षित प्रवास हा मोठा मुद्दा तयार झाला आहे.

Follow Us
संजय राऊतांनी आधी उबाठा गट काँग्रेसमध्ये विलीन करावा; नवनाथ बन यांचा..
संजय राऊतांनी आधी उबाठा गट काँग्रेसमध्ये विलीन करावा; नवनाथ बन यांचा खोचक टोला!
आनंदाचा शिधा घेण्यासाठी महिलांची तुफान गर्दी; खासदार संजय देशमुख....
Washim : आनंदाचा शिधा घेण्यासाठी महिलांची तुफान गर्दी; खासदार संजय देशमुख यांच्या कार्यालयाबाहेर मोठी झुंबड
दिवाळीच्या फटाक्यांनी मुंबईची हवा बिघडवली; BKC मध्ये AQI 170 वर....
Mumbai Air Pollution : दिवाळीच्या फटाक्यांनी मुंबईची हवा बिघडवली; BKC मध्ये AQI 170 वर, निर्बंध झुगारून आतषबाजी सुरूच
युतीतच डावललं जात असेल तर फायदा काय? शिंदे गटाच्या नेत्यांची एकनाथ....
Shinde Group Vs BJP : युतीतच डावललं जात असेल तर फायदा काय? शिंदे गटाच्या नेत्यांची एकनाथ शिंदेंकडे भाजपविरोधात तक्रार, नेमकं काय घडतंय?
E20 पेट्रोलमध्ये इथेनॉलचं प्रमाण 30 टक्क्यांपार? कर्नाटकच्या अहवालाने
Rahul Gandhi : E20 Petrol : E20 पेट्रोलमध्ये इथेनॉलचं प्रमाण 30 टक्क्यांपार? कर्नाटकच्या अहवालाने खळबळ; राहुल गांधींचा केंद्र सरकारवर निशाणा
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत तटकरे यांचं ते वक्तव्य; रुपाली ठोंबरे..
NCP : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत सुनील तटकरे यांचं ते वक्तव्य; रुपाली ठोंबरे पाटील काय म्हणाल्या?
निमंत्रण असूनही आशिष म्हात्रेंची दिवाळी पहाट कार्यक्रमाकडे पाठ
Thane Diwali Pahat : Meenakshi Shinde : निमंत्रण असूनही आशिष म्हात्रेंची मीनाक्षी शिंदेंच्या दिवाळी पहाट कार्यक्रमाकडे पाठ; नेमकं कारण काय?
आत्ताच्या 3 महत्त्वाच्या घडामोडी; शरद पवारांना रुग्णालयातून डिस्चार्ज
Sharad Pawar Health Update : आत्ताच्या 3 महत्त्वाच्या घडामोडी; शरद पवारांना रुग्णालयातून डिस्चार्ज, तर....
रणवीर सिंगकडे 20 कोटींची खंडणी मागणारा हॅरी बॉक्सर अमेरिकेत अटकेत.....
Lawrence Bishnoi Gang : रणवीर सिंगकडे 20 कोटींची खंडणी मागणारा हॅरी बॉक्सर अमेरिकेत अटकेत; रोहित शेट्टीच्या टीमलाही....
मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष का फोडला? मोदींच्या विधानावर राऊतांचा थेट
Sanjay Raut : मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष का फोडला? मोदींच्या विधानावर संजय राऊतांचा थेट सवाल; 36 खासदारांचा आकडाही सांगितला