बिग बॉस 19 चा विजेता होताच गाैरव खन्ना याला सर्वात मोठा धक्का, थेट 24 तासांच्या आत…

काही दिवसांपूर्वीच बिग बॉस 19 चा फिनाले झाला असून गाैरव खन्ना हा बिग बॉसचा विजेता ठरला आहे. गाैरव खन्ना धमाकेदार गेम खेळताना दिसला. आता बिग बॉसचा विजेता झाल्यानंतर गाैरव खन्ना याला मोठा झटका बसला आहे.

बिग बॉस 19 चा विजेता होताच गाैरव खन्ना याला सर्वात मोठा धक्का, थेट 24 तासांच्या आत...
Bigg Boss 19 winner Gaurav Khanna
| Updated on: Dec 18, 2025 | 10:44 AM

बिग बॉस 19 च्या विजेत्याची घोषणा झाली असून अभिनेता गाैरव खन्ना बिग बॉस 19 चा विजेता ठरला. विशेष म्हणजे बिग बॉस 19 च्या घरात सुरूवातीपासूनच गाैरव खन्ना हा धमाकेदार गेम खेळताना दिसला. सलमान खान याने गाैरव खन्ना याच्या नावाची घोषणा केली. मात्र, त्यापूर्वीच सोशल मीडियावर गाैरव खन्ना याचे नाव चर्चेत होते. गाैरव खन्ना हाच बिग बॉस 19 चा विजेता होईल, असे सांगितले जात होते. गाैरव खन्नाने अनुपमा मालिकेतील भूमिकेतून खास ओळख मिळवली. त्याची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. मात्र, बिग बॉस 19 चा विजेता बनल्यानंतर गाैरव खन्नाला अत्यंत मोठा झटका बसला आहे. अभिनेत्याने स्वतःचे यूट्यूब चॅनल सुरू केले. मात्र, हे चॅनल सुरू केल्यानंतर अवघ्या काही तासात त्याला झटका बसला. अवघ्या 24 तासांत त्याच्या यूट्यूब चॅनलवरून त्याचा व्हिडीओ हटवण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्याचे चॅनल बंद करण्यात आले आहे. गौरव खन्नाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून आपल्या चाहत्यांना त्याच्या नवीन यूट्यूब चॅनलबद्दल माहिती दिली होती आणि चॅनल लॉंन्च करत असल्याचे म्हटले होते. यावेळी आपल्या यूट्यूब चॅनलचे श्रेय गाैरव खन्ना याने प्रणित मोरे आणि मृदुल तिवारी यांना दिले होते.

यावेळी गाैरव खन्ना याने म्हटले होते की, जर मला यातील कळाल नाही किंवा मला कोणत्याही प्रश्न असेल तर मी याबद्दल विचारण्यासाठी लगेचच या दोघांपैकी एकाला फोन करतो. हेच नाही तर बिग बॉस 19 च्या घरातही याबद्दल बोलताना गाैरव खन्ना दिसला होता. यावेळी अभिनेत्याने म्हटले होते की, बिग बॉसच्या घरात वाद, भांडणे केली जातात. मात्र, त्यांनी असे काहीही केले नाही.

गाैरव खन्ना याचा व्हिडीओ यूट्यूबने काढून टाकला आहे. फक्त हेच नाही तर हे गाैरव खन्ना याचे चॅनल उपलब्ध नसल्याचेही दिसत आहे. थेट चॅनलच डिलीट झाल्याचे सांगितेल जाते. अनेकांनी म्हटले की, गाैरव खन्ना याच्या चॅनलने मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्यामुळे यूट्यूबनेच त्याचे चॅनल काढून टाकले आहे. आता गाैरव खन्ना यावर काय भाष्य करतो, याकडे लोकांच्या नजरा लागल्या आहेत.