बिग बॉसमधून जिंकलेल्या प्राईज मनीचे गौरव खन्ना काय करणार? म्हणाला “बायकोसोबत मिळून…”
बिग बॉस 19 चा विजेता गौरव खन्नाने 50 लाख रुपयांचे बक्षीस जिंकले आहे. या रकमेचं तो काय करणार आहे? त्याने काही नियोजन केलं आहे का? याबद्दल त्याने त्याचा प्लॅन सांगितला आहे. या प्लॅनमध्ये त्याच्यासोबत त्याची पत्नीदेखील सहभागी असणार आहे.

बिग बॉस 19 चा विजेता गौरव खन्ना सध्या चर्चेत आहे. त्याने या सीझनची ट्रॉफीच जिंकली नाही तर 50 लाख रुपयांचे बक्षीसही जिंकले आहे. गौरव सध्या त्याच्या विजयाचा आनंद घेत आहे. बिग बॉस 19 नंतर त्याचे काय प्लॅन आहेत हे त्याने सांगितले आहेत. सध्या गौरव त्याच्या विजयाचा आनंद घेताना दिसत आहे. गौरव खन्नाने शोमध्ये देखील नेहमीच आपली सभ्यता सांभाळूनच खेळ खेळला. त्याने शांत डोक्याने आणि त्याच्या डोक्यात नक्की काय स्ट्रॅटजी आहे याबद्दल कधीही कोणाला कल्पना न येऊ देता त्याने हा शो जिंकला आहे. पण शो जिंकल्यानंतर त्याला मिळालेल्या प्राइजमनीचं तो नक्की काय करणार आहे त्याबद्दल त्याने सांगितले आहे.
‘आम्ही काहीतरी छान प्लॅन करू’
एका वृत्ताशी बोलताना गौरव खन्ना म्हणाला, “मला अजून माहित नाही की मी पैशांचे काय करेन. पण मी हे पैसे नक्कीच चांगल्या योजनेत गुंतवेन, पण मी माझ्या पत्नीलाही कुठेतरी छान बाहेर घेऊन जाईन. आम्ही क्वचितच एकत्र प्रवास केला आहे, पण यावेळी आम्ही काहीतरी छान प्लॅन करू.” असं म्हणत त्याने ट्रव्हल करणार असल्याचं म्हटलं आहे.
View this post on Instagram
बनावट म्हटल्याबद्दल गौरवचे उत्तर
गौरव म्हणाला, ‘यादरम्यान गौरवला विचारण्यात आले की त्याच्या सह-स्पर्धकांनी त्याला ‘बिग बॉस 19’ मध्ये खोटे म्हटले होते. ज्यावर गौरवने उत्तर दिले, “त्याचा माझ्यावर खरोखर परिणाम झाला नाही. मी खूप चांगले काम केले आहे. मी पाहिले की बरेच लोक प्रश्न विचारत होते, परंतु जर मी प्रत्येकाचे उत्तर देण्याचा प्रयत्न केला असता तर मी पुढे कसे गेलो असतो. वेळ मर्यादित होता. त्या घरात माझे 15 आठवडे होते आणि त्या काळात 15 लोकांना उत्तर देणे माझ्यासाठी महत्त्वाचे नव्हते. माझ्यासाठी जे महत्त्वाचे होते ते म्हणजे शोच्या बाहेर असलेल्या 1.5 अब्ज लोकांशी जवळचे नाते निर्माण करणे. जर कोणी मला खोटे म्हटले तर त्यांना ते म्हणू द्या. मला काही फरक पडत नाही. प्रेक्षक काय विचार करतात हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे.”
सलमान खानबद्दल गौरव काय म्हणाला?
गौरव म्हणाला, “मी याआधी अनेक मुलाखतींमध्ये सांगितले आहे की मी सलमान खानमुळे या शोमध्ये गेलो होतो. मी सलमान सरांचा खूप मोठा चाहता आहे. मी बिग बॉस 13 देखील पाहिला आहे. या शोवेळी देखील जेव्हा मी ऐकले की ते या सीझनचे सूत्रसंचालन करणार नाही, तेव्हा मी पूर्णपणे निराश झालो. पण टीमकडून सलमान सर सूत्रसंचालन करणार असल्याची पुष्टी होताच, मी लगेचच शो करण्यास होकार दिला. मला त्यांना भेटायचे होते आणि देवाच्या कृपेने मला प्रेक्षकांचे प्रेम मिळाले. आता मी फक्त सर्वोत्तमची आशा करत आहे. कोणताही ताण नाही.”
