‘बिग बॉस 19’ विजेता गौरव खन्नाचं 16 वर्षांनी लहान अभिनेत्रीशी एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर? अखेर सत्य समोर
'बिग बॉस 19' विजेता आणि प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेता गौरव खन्ना याचं 'अनुपमा' फेम अभिनेत्रीशी एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असल्याच्या जोरदार चर्चा होत्या. या चर्चांवर आता संबंधित अभिनेत्रीची प्रतिक्रिया समोर आली आहे. तिची कमेंट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ऑगस्ट महिन्यात सुरू झालेला ‘बिग बॉस’चा एकोणिसावा सिझन अखेर रविवारी 7 डिसेंबर 2025 रोजी संपुष्टात आला. प्रसिद्ध टीव्ही अभिनेता गौरव खन्ना या सिझनचा विजेता ठरला. शोच्या सुरुवातीपासूनच गौरवला विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानलं जात होतं. आता ट्रॉफी जिंकल्यानंतर त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तर दुसरीकडे गौरवच्या खासगी आयुष्याबद्दलच्या एका चर्चेनंही नेटकऱ्यांचं लक्ष वेधलंय. विवाहित असूनही गौरवचं एका अभिनेत्रीशी अफेअर होतं, अशी ही चर्चा आहे. ‘अनुपमा’ या मालिकेत काम करत असताना गौरवचं सहअभिनेत्रीशी अफेअर होतं, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली. या कमेंटवर थेट त्या अभिनेत्रीनेच प्रतिक्रिया दिली आहे.
गौरवसोबत ज्या अभिनेत्रीचं नाव जोडलं गेलं, तिचं नाव निधी शाह आहे. ‘अनुपमा’मध्ये निधी शाह आणि गौरव खन्ना यांनी एकत्र काम केलं होतं. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका पोस्टवर युजरने या दोघांच्या अफेअरविषयी कमेंट केली. ‘अनुपमा मालिकेदरम्यान निधी शाह आणि गौरव खन्ना यांचं एकमेकांशी अफेअर होतं’, असं संबंधित युजरने लिहिलं. यावर आता खुद्द निधीनेच प्रतिक्रिया दिली आहे. ‘हा, तुम्हाला चांगलं माहीत आहे’, असं तिने लिहिलं. हा संवाद इथेच संपला नाही. युजरनेही निधीला प्रत्युत्तर दिलं. ‘निधी रेडिट, ट्विटरवाल्यांना चांगलंच माहीत असतं.. नेहमीच मॅडम’ असं त्याने म्हटलंय. या कमेंट्सचा स्क्रीनशॉट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

‘अनुपमा’ मालिकेत गौरवने अनुज कपाडियाची तर निधी शाहने किंजल शाहची भूमिका साकारली होती. दोघांनीही ही मालिका सोडली आहे. मालिकेत काम करताना दोघांनी एकत्र बरेच रील्ससुद्धा शेअर केले होते. आता गौरव बिग बॉसचा विजेता ठरल्यानंतर त्याची एक पोस्ट निधीने लाइक केली. त्यावरून पुन्हा दोघांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं आहे. गौरव विवाहित असून त्याच्या पत्नीचं नाव आकांक्षा चमोला आहे. आकांक्षा गौरवपेक्षा वयाने नऊ वर्षांनी लहान आहे. बिग बॉसच्या घरात फॅमिली वीकदरम्यान आकांक्षा गौरवला भेटायला आली होती. तेव्हा या दोघांच्या रोमँटिक केमिस्ट्रीने सर्वांचं लक्ष वेधलं होतं. दरम्यान निधीसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर अद्याप गौरवने कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही.
