
‘बिग बॉस 19’ चा तीन महिन्यांचा प्रवास संपायला आता चार दिवसच बाकी आहे. ‘बिग बॉस 19’ चा ग्रँड फिनाले रविवारी 7 डिसेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे आता टॉप 5 आणि टॉप थ्रीमध्ये नक्की कोण असणार तसेच, विजेता कोण असणार असे अनेक प्रश्न आणि त्यांचे अंदाजे उत्तरांची सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. यातून एक नाव वारंवार समोर येत आहे. तोच स्पर्धक या शोचा विजेता ठरणार असल्याचं म्हटलं जात आहे.
‘बिग बॉस 19’ च्या विजेत्याचं नाव जाहीर?
‘बिग बॉस’ च्या आतापर्यंतच्या सीझनच्या अंतिम फेरीतील अंदाज बहुतेक अचूक ठरत असल्याची ओखळ असलेल्या ‘द खबरी’ने आता त्यांच्या पेजवर ‘बिग बॉस 19’ च्या विजेता आणि उपविजेत्याची घोषणा केली आहे. ‘द खबरी’च्या मते ‘बिग बॉस 19’ चा विजेता गौरव खन्ना असेल, तर फरहाना भट्ट दुसऱ्या क्रमांकावर राहण्याची अपेक्षा आहे. मात्र लोक असा अंदाज लावत होते की अमाल तिसऱ्या क्रमांकावर येईल, परंतु द खबरीच्या मते तिसऱ्या क्रमांकावर प्रणीत मोरे असेल.
‘द खबरी’ने केलेल्या ट्विटनुसार, ट्रॉफी जिंकणारा स्पर्धक हा गौरव खन्नाच असणार आहे.
या स्पर्धकाचे नाव आहे ट्रेंडमध्ये
‘बिग बॉस 19’ च्या विजेत्याचे नाव अधिकृतपणे जाहीर झालेले नसले तरी देखील सोशल मीडियावर आणि काही माध्यमांनुसार गौरव खन्ना हाच विजेता ठरू शकतो असे म्हटले जात आहे. एवढंच नाही तर सोशल मीडियावर गौरवच्याच नावाचा ट्रेंडही सुरु आहे. विजेता म्हणून त्याच्याच नावाचा ट्रेंड सुरु आहे.सोशल मीडिया ट्रेंडनुसार त्याचे नाव पहिलं दिसत आहे. मात्र, याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही आणि अंतिम निकाल 7 डिसेंबर रोजी जाहीर होईलच.
#BiggBoss19 Final Prediction and Rankings#GauravKhanna winner#FarrhanaBhatt Runner Up#PranitMore 2nd Runn#TanyaMittal 3rd Runner-up#AmaalMalik last position
This is just prediction and not the final results
— The Khabri (@TheKhabriTweets) December 2, 2025
टॉप थ्रीमध्ये कोण असेल?
प्रथम, अशनूर आणि नंतर शाहबाज यांना वीकेंड का वार या शोमधून बाहेर काढण्यात आले. आता, मालती चहरला आठवड्याच्या मध्यातील एलिमिनेशनमध्ये बाहेर काढण्यात आले आहे. हे आजच्या भागात दाखवले जाईल. यानंतर, शोमध्ये उरलेले टॉप पाच स्पर्धक म्हणजे गौरव खन्ना, अमाल मलिक, तान्या मित्तल, फरहाना भट्ट आणि प्रणित मोरे असतील. पण एकंदरीतच कोणाला बाहेर काढले जाईल आणि कोण टॉप तीन असेल याबद्दल मात्र नक्कीच लोकांना उत्सुकता आहे.
द खबरीच्या मते, गौरव खन्ना विजेता असेल, तर फरहाना भट्ट दुसऱ्या क्रमांकावर राहण्याची अपेक्षा आहे. लोक असा अंदाज लावत होते की अमाल तिसऱ्या क्रमांकावर येईल, परंतु द खबरीच्या मते, प्रणीत मोरे असेल.
टॉप 5 ची रँकिंग काय असू शकते?
गौरव खन्ना – विजेता
फरहाना भट्ट – उपविजेती
प्रणित मोरे – दुसरा उपविजेता
तान्या मित्तल – तिसरी उपविजेती
अमाल मलिक – पाचव्या स्थानावर असेल. अशी रँकिंग सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे.