तुला असं घट्ट मिठीत धरताना… रुचिता जामदार घरी परतताच जवळच्या व्यक्तीची पहिली पोस्ट, फोटोही समोर

बिग बॉस मराठी ६ मधील चर्चेत असलेली स्पर्धक रुचिता जामदार हिचे धक्कादायक एलिमिनेशन झाले आहे. तिच्या एक्झिटनंतर तिचा भाऊ अक्षय महानंदा याने सोशल मीडियावर एक अत्यंत भावूक पोस्ट शेअर केली असून, यामध्ये त्याने रुचिताच्या खेळाचे आणि तिच्या खंबीरपणाचे कौतुक केले आहे.

तुला असं घट्ट मिठीत धरताना... रुचिता जामदार घरी परतताच जवळच्या व्यक्तीची पहिली पोस्ट, फोटोही समोर
ruchita jamdar
| Updated on: Mar 09, 2026 | 11:25 AM

बिग बॉस मराठी सिझन ६ यंदा चांगलाच चर्चेत आहे. बिग बॉस मराठीच्या ६ व्या सिझनमधील सर्वात धक्कादायक एलिमिनेशन नुकतंच पार पडलं. रुचिता जामदार हिने या आठवड्यात बिग बॉसचा निरोप घेतला. तिने घरातून एक्झिट घेतल्यानंतर आता सर्वत्र तिची चर्चा रंगली आहे. तिच्यासाठी आणि तिने बिग बॉसच्या घरात खेळलेल्या गेमसाठी तिचे सातत्याने कौतुक होत आहेत. आता रुचिताच्या भावाने तिच्यासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.

रुचिता जामदारने पहिल्या दिवसांपासून बिग बॉसच्या घरात वेगळे स्थान निर्माण केले होते. विशालबरोबरची तिची मैत्री चर्चेचा विषय ठरली. अनेकदा तिने वापरलेल्या शब्दांवरून ऐकून घ्यावे लागले. इतर स्पर्धकांबरोबरच्या तिच्या भांडणांनी लक्ष वेधून घेतले. आता रुचिता बाहेर पडल्यानंतर प्रेक्षकांनी त्यावर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. रुचिता घराबाहेर पडल्यानंतर तिच्या जवळच्या एका व्यक्तीने तिच्यासाठी एक खास पोस्ट लिहिली आहे. रुचिताचा भाऊ अक्षय महानंदा याने एक पोस्ट शेअर करत तिच्या संपूर्ण प्रवासाचे वर्णन केले आहे.

अक्षय महानंदाची पोस्ट

Welcome Back My Brave Little Lady !
तुला असं घट्ट मिठीत धरताना आज मनावरचं एक खूप मोठं ओझं उतरल्यासारखं वाटतंय. तू त्या घराबाहेर आलीस आणि तुला असं उचलून घेतलं, तेव्हा मला जाणवलं की जगासाठी तू एखादी ‘कंटेस्टंट’ असशील, पण माझ्यासाठी तू आजही तीच छोटी रुचिता आहेस जी लहानपणी गोष्टी सांगायची,नाचायची,गावातल्या मातीत खेळण्यात रामायचीच,दरवर्षी वर्गात पहिली यायची.

त्या बंद खोलीत तू एकटी झुंज देत होतीस, पण बाहेर मी प्रत्येक क्षणी तुझ्यासाठी श्वास रोखून धरत होतो. आज तुला सुखरूप आणि इतक्या खंबीरपणे माझ्या समोर उभं पाहिलं, यातच माझं सगळं जग जिंकल्यासारखं वाटतंय! आज सोशल मीडिया बघताना, लोकांचं तुझ्यावरचं ते भरभरून प्रेम पाहून डोळे भरून येतात. तू फक्त एक स्पर्धक म्हणून तिथे गेली नव्हतीस, तर तू त्या शोची एक ‘ओळख’ बनून बाहेर आलीस. अनेक जण येतात आणि जातात, पण काही लोक आपला ठसा उमटवून जातात. हा सिझन कदाचित कोणा एकाच्या नावावर संपेल, पण प्रेक्षकांच्या मनात मात्र हा ‘रुचिताचा सिझन’ म्हणूनच ओळखला जाईल, याची मला खात्री आहे!

तू तिथे कोणासमोर झुकली नाहीस,स्वतःचा खरेपणा कुठेही compromise केला नाहीस आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे – तू ‘रुचिता’ म्हणून जगलीस. लोकांच्या मनात घर करण्यासाठी कोणत्याही ट्रॉफीची गरज नसते, हे तू तुझ्या वागण्यातून सिद्ध केलंस. तू रडणारी मुलगी कधीच नव्हतीस, तू संकटांना भिडणारी मुलगी आहेस आणि आज तुला असं हसताना पाहिलं की वाटतं, आपण जिंकलो!

आज सोशल मीडिया उघडला की तुझ्यासाठी लोकांच्या कमेंट्सचा जणू पूर आलाय! लोक अक्षरशः रडतानाचे व्हिडिओ शेअर करतायत आणि एकच सूर उमटतोय की, “रुचिता नाही तर आता शो बघण्यात अर्थच उरला नाही!” हे जे काही घडतंय ना, हे कमावलेले पैसे किंवा ट्रॉफीपेक्षा खूप मोठं आहे. तुझं तिथलं सत्य, तुझा तो प्रामाणिकपणा आज लोकांच्या काळजाला भिडलाय. हे असं निस्वार्थ प्रेम नशिबात असल्याशिवाय मिळत नाही आणि हेच तुझं खरं यश आहे! तुला मिळालेलं हे प्रेम, हे आशीर्वाद आणि तुझा हा स्वाभिमानी चेहरा… यापेक्षा मोठं यश दुसरं कोणतं असू शकतं? तू आमची शान आहेस आणि कायम राहशील. तुझ्या या प्रवासात तू जे काही कमावलंस, ते कोणत्याही सोन्याच्या ट्रॉफीपेक्षा लाख पटीने अनमोल आहे.घरात आणि तुझ्या हक्काच्या माणसांच्या गर्दीत तुझं मनापासून स्वागत, माझ्या वाघिणी! तुझा प्रचंड अभिमान मला आधीही वाटत होता,आजही वाटतो आणि कायम वाटत राहिल. लडकी समझ के फ्लॉवर समजा क्या ? Fire है ये !, असे अक्षयने म्हटले आहे.

दरम्यान रुचिता जमादारने पहिल्या दिवसापासूनच बिग बॉसच्या घरात गेम खेळायला सुरुवात केली होती. पण, त्यावेळी तिच्याकडून अनेक चुका झाल्या, ज्यामुळे तिला भाऊच्या धक्क्यावर रितेशकडून सुनावण्यातही आलं होतं. रितेशने वारंवार सांगूनही रुचिता ऐकली नाही. त्यामुळे तिला घरातून एक्झिट घ्यावी लागल्याचे बोललं जात आहे. सध्या रुचिताच्या एक्झिटमुळे चाहते नाराज आहेत. स्ट्राँग स्पर्धक असूनही रुचिताला घराबाहेर काढल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us