AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रुचिता जामदार ‘बिग बॉस मराठी 6’मधून बाद होताच चिमुकलीला कोसळलं रडू; पहा व्हिडीओ

बिग बॉस मराठीच्या घरातून रुचिता जामदार बाहेर पडल्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर एका चिमुकलीला अक्षरश: रडू कोसळलं आहे. चिमुकलीचा हा व्हिडीओ रुचिताने शेअर करत त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

रुचिता जामदार 'बिग बॉस मराठी 6'मधून बाद होताच चिमुकलीला कोसळलं रडू; पहा व्हिडीओ
Ruchita JamdarImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 09, 2026 | 10:31 AM
Share

‘बिग बॉस मराठी 6’च्या घरातून नुकत्यात झालेल्या एलिमिनेशननंतर सर्वांनाच आश्चर्याचा मोठा धक्का बसला आहे. जी टॉप 5 पर्यंत मजल गाठेल, असा अनेकांना विश्वास होता, त्याच रुचिता जामदार बिग बॉसच्या घरातून बाहेर पडावं लागलं आहे. रुचिताच्या एविक्शननंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. माजी स्पर्धक धनंजय पोवारनेही ‘मला हे काही पटलेलं नाही’ असं म्हणत या निर्णयावर निराशा व्यक्त केली आहे. त्यानंतर सोशल मीडियावर आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामुळे एक चिमुकली रडताना दिसत आहे. या चिमुकलीचा व्हिडीओ रुचिताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत ‘तुला खूप प्रेम बाळा’ अशी प्रतिक्रिया दिली आहे.

क्रिशा नावाच्या चिमुकलीचा हा व्हिडीओ असून त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘तुझी बिग बॉसच्या घरातील एक्झिट अगदी आमच्या क्रिशाच्या लहान मनालाही चटका लावून गेली आणि जिथे एखाद्या लहान मुलीच्या डोळ्यात पाणी येतं, तिथे समजून घ्यायचं… तू खऱ्या अर्थाने जिंकली आहेस. हो, आहेत तू.. बेफिकीर.. निडर.. स्पष्टवक्ती.. आत्मविश्वासू.. बोल्ड.. तडफदार.. बेधडक.. बिनधास्त.. खमकी.. खंबीर.. हजरजबाबी.. कधी फटकळ.. कधी कडक पण तितकीच मनाने संवेदनशील आणि काळजी घेणारी. एक अनस्टॉपेबल लेडी. तुझं स्क्रीन प्रेझेन्स, व्यक्तिमत्त्व इतकं प्रभावी आहे, की म्हणूनच क्रिशालाही तू खूप आवडते.’

‘कधी कधी चांगुलपणाच्या मुसक्या आवळल्या जातात आणि तेव्हा एका खंबीर स्त्रीला स्वत:साठी कठोर व्हावंच लागतं. कलियुगात प्रत्येक मुलीने थोडंसं तरी तुझ्यासारखं असावं. आरे ला का रे म्हणत अन्यायाला उत्तर देणारी. स्वत:वर प्रेम करणार, अपयशातून शिकणारी, स्वतःची ओळख जपणारी, स्वतंत्र विचारसरणी असलेली, मेहनती, स्पष्टवक्ती, निडर आणि धाडसी आणि वेळ पडली तर वाघिणीसारखी. स्वतःच्या तालावर जगणारी, गरज पडली तर घरही नाचवणारी! निडर.. स्पष्ट आणि ठाम.. ती म्हणजे रुचिता जामदार,’ अशा शब्दांत तिचं कौतुक केलं आहे.

बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर रुचिताने सोशल मीडियावर पोस्ट लिहित माफी मागितली आहे. ‘बिग बॉसच्या या घरात प्रत्येक गोष्ट मी मनापासून केली आणि खूप वेळा नॉमिनेट झाले, तरी माझ्यावर प्रेम करणाऱ्या रसिक प्रेक्षकांनी मला या खेळात लढायला बळ दिलं. मी घरात ज्या काही चुकीच्या गोष्टी केल्या असतील, त्याबद्दल तुमची मनापासून माफी मागते. आजचं एविक्शन माझ्यासाठी आश्चर्यकारक आहे, पण जनतेचा निर्णय मला मनापासून मान्य आहे. माझ्या या प्रवासात माझी साथ दिल्याबद्दल खूप खूप आभार,’ अशा शब्दांत ती व्यक्त झाली.

Follow Us
माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपके
Exclusive | माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपकेने सांगितलं जंतर-मंतरवर पहिल्या दिवशी काय घडलं?
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; देवस्थानात...
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; पाणी देवस्थानात शिरल्यानंतरही भक्तिभावाने महाआरती
भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात, नवी माहिती...
Ashok Kharat | भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात...नेमकी नवी माहिती काय?
धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले, तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने...
Rain Update | धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले तरी... तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने विसर्ग सुरु
मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन...; साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
Ameet Satam on Raj Thackeray | मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन म्हणत...; अमित साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
Raj Thackeray | NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच...
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच... भाजपच्या बड्या नेत्याने सांगितली खदखद
सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर
Sada Sarvankar On Raj Thackeray | 18 कोटींच्या चोरीचा दावा चुकीचा?; सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर
अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...
Abhijeet Dipake | अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...
आश्वासनं पूर्ण करा, आंदोलनाच्या मागण्या विसरलो नाही...
Sonam Wangchuk | आश्वासनं पूर्ण करा, आंदोलनाच्या मागण्या विसरलो नाही; सरकारला सोनम वांगचुक यांचा थेट इशारा