Janhavi Killekar : जान्हवी किल्लेकरचा धमाकेदार डान्स पाहिला का ? शाहरुख काजोलच्या गाण्यावर बेफाम नृत्य

बिग बॉसच्या घराबाहेर आल्यावर जान्हवी सोशल मीडियावर खूपच ॲक्टिव्ह आहे. तिच्या अकाऊंटवर विविध पोस्ट, व्हिडीओ टाकत असते. त्यातच आता तिने शेअर केलेल्या एका नव्या व्हिडीओची खूप चर्चा आहे.

Janhavi Killekar : जान्हवी किल्लेकरचा धमाकेदार डान्स पाहिला का  ? शाहरुख काजोलच्या गाण्यावर बेफाम नृत्य
जान्हवी किल्लेकर
Image Credit source: social media
| Updated on: Oct 16, 2024 | 3:49 PM

बिग बॉस मराठीचा 5 वा सीझन नुकताच संपला. सर्व स्पर्धकांना मागे टाकत सूकज चव्हाणने विजेतेपदावर नाव करोत बिग बॉसची ट्रॉफी जिंकली. पण त्याच्यासोबतच घरातले इतर स्पर्धकही चर्चेत होते. त्यापैकीच म्हणजे जान्हवी किल्लेकर. हा शो गाजवणाऱ्या स्पर्धकांमध्ये जान्हवी किल्लेकरचं नाव अग्रस्थानी आहे. बिग बॉस मराठी मध्ये तिच्या वागण्यामुळे चर्चेत असलेली जान्हवी किल्लेकर ग्रँड फिनालेमध्येही भाव खाऊन गेली. सुपर 6 मध्ये असलेली जान्हवी ग्रँड फिनालेमध्ये सर्वात पहिले बाहेर पडली. पण जाताना चक्क 1-2 नव्हे तर तब्बल 9 लाख रुपये घेऊन गेली. बिग बॉसनं दिलेली 9 लाखांची बॅग तिने उचलली आणि ती शोच्या बाहेर आली. ग्रँड फिनालेमध्ये 9 लाखांची बॅग घेण्याचं कारण जान्हवीने एका मुलाखतीत सांगितलं होतं. जर मी ते पैसे उचलले नसते, तर मी बाहेर जाताना काय घेऊन गेले असते ? शून्य ! हातात काहीच आलं नसतं. ते पैसेही मिळाले नसते, असं जान्हवीने नमूद केलं. तिच्या या निर्णयाचं लोक आजही कौतुक करत असतात.

दरम्यान बिग बॉसच्या घराबाहेर आल्यावर जान्हवी सोशल मीडियावर खूपच ॲक्टिव्ह आहे. तिच्या अकाऊंटवर विविध पोस्ट, व्हिडीओ टाकत असते. त्यातच आता तिने शेअर केलेल्या एका नव्या व्हिडीओची खूप चर्चा आहे. बिग बॉसमध्ये टास्क क्वीन म्हणून प्रसिद्ध असलेली जान्हवी, या व्हिडीओमध्ये शाहरूख काजोलच्या ‘ दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ चित्रपटातील ‘जरा सा झूम लूं मैं’ या गाण्यावर नृत्य करताना दिसत आहे. गुलाबी साडी आणि काळ्या रंगाचा स्लीव्हलेस ब्लाऊज घातलेल्या जान्हवीने या गाण्यावर ठेका धरत संदुर नृत्य केलंय. तिचा हा डान्स व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.

 

चाहत्यांच्या कमेंट्सचा पाऊस

जान्हवीचा व्हिडीओ आत्तापर्यंत हजारो लोकांनी पाहिला असून त्यावर चाहत्यांच्या कमेंट्सचा अक्षरश: पाऊस पडला आहे. 9 लाख भेटले म्हणून नाचून राहिली का , असा मेजशील प्रश्न एका चाहत्याने विचारला. तर बिग बॉस नंतर जान्हवी तुला वाईट कमेंट येतील असे वाटले होते ,पण असे नाही झाले छान❤️अशी सुंदर कमेंट एकाने केली. एकदम मस्त, नेक्स्ट हॉलीवूड क्वीन असे म्हणत अनेक चाहत्यांनी जान्हवीचा डान्स आणि एकंदरच तिचं भरभरून कौतुक केलं आहे.