काही वेळातच प्रीमियरला होणार सुरूवात, अनिल कपूर धमाका करण्यास तयार, जाणून घ्या बिग बॉस OTT 3 बद्दल सर्व काही

Bigg Boss OTT 3 Premiere : बिग बॉस OTT 3 च्या प्रीमियरकडे सर्वांच्या नजरा आहेत. अगदी काही वेळातच बिग बॉस OTT 3 च्या प्रीमियरला सुरूवात होईल. विशेष म्हणजे यावेळी अनिल कपूर हे बिग बॉस OTT ला होस्ट करताना दिसणार आहेत. या सीजनकडून चाहत्यांना मोठ्या अपेक्षा आहेत.

काही वेळातच प्रीमियरला होणार सुरूवात, अनिल कपूर धमाका करण्यास तयार, जाणून घ्या बिग बॉस OTT 3 बद्दल सर्व काही
bigg boss ott season
| Updated on: Jun 21, 2024 | 8:30 PM

बिग बॉस OTT 3 ची प्रेक्षक गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाट पाहताना दिसले. विशेष म्हणजे यंदाचे बिग बॉस OTT 3 धमाल करणार असल्याचे स्पष्ट आहे. शुक्रवार म्हणजे आज 21 जूनपासून रात्री 9 वाजता बिग बॉस OTT 3 ची सुरूवात होतंय. करण जोहर नव्हे तर प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते अनिल कपूर यंदा बिग बॉस OTT ला होस्ट करताना दिसणार आहेत. आज रात्री जिओ सिनेमा ॲपवर प्रीमियर होईल. या सीजनमध्ये अनेक फेमस चेहरे सहभागी होणार असल्याची देखील चर्चा आहे. अगदी काही वेळातच आता बिग बॉस OTT 3 च्या प्रीमियरला सुरूवात होईल.

जिओ सिनेमाच्या अधिकृत इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करण्यात आलीये. या पोस्टमध्ये अनिल कपूर यांचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. यावेळी अनिल कपूर कोट पँट आणि स्टायलिश चष्म्यावर दिसत आहेत. आता ही पोस्ट चांगलीच व्हायरल होताना दिसतंय. बिग बॉस OTT 3 चे अनेक प्रोमोचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

बिग बॉस OTT 3 मध्ये सहभागी होणारे पहिले नाव सई केतन राव आहे. अभिनेत्याने अनेक मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका या केल्या आहेत. पॉलमी पोलो दास देखील बिग बॉस OTT 3 मध्ये धमाका करताना दिसले. यासोबत अरमान मलिक हा आपल्या दोन्ही पत्नींसोबत बिग बॉस OTT 3 मध्ये सहभागी होणार असल्याची जोरदार चर्चा आहे.

TikTok कंटेंट क्रिएटर आणि मॉडेल सना सुलतानचे जी पंजाबी म्युझिक व्हिडिओमध्ये दिसली आहे, ती देखील बिग बॉस ओटीटी 3 मध्ये दिसेल. उत्तर प्रदेशातील शिवानी कुमारी हिचे इंस्टाग्रामवर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते, ती देखील बिग बॉस OTT 3 मध्ये धमाका करताना दिसणार आहे.

आता अगदी काही वेळातच बिग बॉस OTT 3 ला सुरूवात होईल. यापूर्वीचे बिग बॉस OTT चे सर्व सीजन धमाल करताना दिसले आहेत. यामुळेच या देखील सीजनकडून चाहत्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. अगदी थोड्याच वेळात नेमके कोण बिग बॉस OTT 3 मध्ये सहभागी होईल हे कळेल. चंद्रिका गेरा दीक्षित वडापाव गर्ल बिग बॉस ओटीटी 3 मध्ये सहभागी होणार आहे.