‘बायको मला कंट्रोल करते’, करण सिंग ग्रोव्हरचा आरोप; तर बिपाशा म्हणाली, ‘माझं नाव बदनाम केलं याने…’

अभिनेता करण सिंग ग्रोव्हरचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात तो सांगताना दिसत आहे की त्याची पत्नी बिपाशा बासू त्याला फार कंट्रोल करते. त्यावर बिपाशाने देखील त्यावर खुलासा केला आहे.

बायको मला कंट्रोल करते, करण सिंग ग्रोव्हरचा आरोप; तर बिपाशा म्हणाली, माझं नाव बदनाम केलं याने...
Bipasha Basu Controls Karan Singh Grover
Image Credit source: instagram
| Updated on: May 26, 2025 | 6:48 PM

बॉलिवूडधील एक जोडी जी चित्रपटांपासून तर सध्या दूरच असली तरी नेहमी चर्चेत असते ती जोडी म्हणजे करण सिंग ग्रोव्हर आणि बिपाशा बासू. बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हर पडद्यावर कमी दिसतात परंतु ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात. सध्या सोशल मीडियावर करणचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो बिपाशाच्यासमोरच खुलासा करताना दिसत आहे की ती त्याला कंट्रोल करते. तो म्हणाला की,”ती मला कुठेही बाहेर जाऊ देत नाही”

‘बिपाशा मला कंट्रोल करते…’

करण सिंग ग्रोव्हर आणि बिपाशा बसू एकदा कपिल शर्माच्या शोमध्ये आले होते. जिथे दोघांनीही त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल अनेक मोठे खुलासे केले. यावेळी करणने पत्नी बिपाशाबद्दल एक मोठा आणि धक्कादायक खुलासा केला. करणने सांगितले की बिपाशा ही त्याची ओनर म्हणजे मालकीण आहे. ती त्याला फार कंट्रोल करते.

‘बाहेर जाण्यासाठी मी बिपाशाची परवानगी घेतो’

करण म्हणाला की “माझे मित्र मला सांगतात की तू आमच्यासोबत का येत नाही, बिपाशा तुला कंट्रोल करत का? ती मला कुठेही जाऊ देत नाही का? त्यावेळेस मी त्यांना म्हणतो हो ती मला पाठवत नाही. आणि जेव्हा माझे मित्र मला फोन करतात तेव्हा मी त्यांना सांगतो की, आधी माझ्या ओनरची परवानगी घ्या.” असं म्हणत त्याने बिपाशासमोरचं हा खुलासा केल्याने सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं.


‘करण नेहमीच माझी बदनामी करतो’

पण करणच्या या आरोपानंतर बिपाशानेही समर्पक असं उत्तर दिलं आहे. तिने करणचे सर्व आरोप खोटे ठरवले आणि तो मुद्दाम तिच्या नावाची बदनामी करतो असंही तिने म्हटलं आहे. बिपाशा म्हणाली की, “हा माणूस माझी बदनामी करतो. मी असं अजिबात करत नाही. खरं तर, जेव्हा काम नसतं तेव्हा तो स्वत: घराबाहेर पडायला मागत नाही. तेव्हा कोणीही त्याला घराबाहेर काढू शकत नाही.आणि याने त्याच्या मित्रांना खोटं सांगितलं आहे की मी त्याला कंट्रोल करते.”

पण सध्या ही जोडी बॉलिवूडपासून दूर असून मुलगी देवीसोबत आणि कौटुंबिक वेळ घालवताना दिसतात.