
आज टीव्हीची प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री गौरी प्रधानचा वाढदिवस आहे. ती आज तिचा 44 वा वाढदिवस साजरा करत आहे. गौरी सुरुवातीपासूनच तिच्या लव्ह लाईफबद्दल बरीच चर्चेत आहे. तिने प्रसिद्ध टीव्ही अभिनेता हितेन तेजवानीशी लग्न केलं आहे. या टीव्ही जोडप्याची लव्हस्टोरी टीव्हीच्या प्रसिद्ध लव्हस्टोरींपैकी एक आहे.

गौरी प्रधान आणि हितेन तेजवानी या जोडीने 2004 मध्ये एकमेकांशी लग्न केलं. गौरी महाराष्ट्रीय कुटुंबातून आहे आणि हितेन हा सिंधी आहे. 2009 मध्ये, या जोडप्याला दोन जुळे झालेत, ज्यांचं नाव त्यांनी नेवान आणि कात्या ठेवलं.

खूप कमी लोकांना माहित आहे की हितेन आणि गौरी 1999 मध्ये विमानतळावर पहिल्यांदा भेटले होते. गौरी या पहिल्या भेटीतच हितेनच्या मनात बसली होती. या भेटीनंतर हे दोघं 6 महिन्यांपर्यंत एकमेकांशी बोलले नाहीत, त्यानंतर हे दोघं सिरियल ‘कुटुंब’च्या सेटवर एकमेकांना भेटले, मात्र इथे आल्यानंतर दोघांमध्ये काही वेगळेपणा निर्माण झाला. या दोघांची जाहिरात प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. त्यानंतर त्यांना टीव्ही मालिकांमध्ये काम करण्याची संधी मिळाली.

एकता कपूर सुरुवातीपासूनच नवीन चेहऱ्यांचा शोध घेत असते. ती या नवीन चेहऱ्यांना मालिकेत काम करण्याची संधी देखील देते. जेव्हा कुटुंब ही मालिका टीव्हीवर रिलीज झाली, तेव्हा ही जोडी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली. या मालिकेनंतर, आपण ही जोडी 'घर एक मंदिर' आणि 'क्यूंकी सास भी कभी बहू थी' यासह एकता कपूरच्या आणखी अनेक मालिकांमध्ये दिसली.

मालिकेत काम करत असताना या हे दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. हितेनचं हे दुसरं लग्न होतं. हितेननं गौरीच्या आधी एका मुलीशी लग्न केलं होतं. त्याचं पहिलं लग्न हे घरच्यांच्या बळजबरीनं झालं असं म्हंटल्या जातं. हितेननं त्या मुलीला 11 महिन्यांनंतरच घटस्फोट दिला.