Kangana Ranaut: तोंडावरच आपटली कंगना! करायला गेली एक झालं एक, नेटकऱ्यांनी बरोबर पकडलं

Kangana Ranaut: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये भाजप खासदार आणि कंगना रणौत यांची एक चूक नेटकऱ्यांनी चांगलीच पकडली आहे. सध्या या व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

Kangana Ranaut: तोंडावरच आपटली कंगना! करायला गेली एक झालं एक, नेटकऱ्यांनी बरोबर पकडलं
Kangana Ranut
Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Sep 08, 2026 | 10:51 AM

भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगणा रणौत कायमच त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी चर्चेत असतात. सोशल मीडियावर देखील कंगणा प्रचंड सक्रिय असतात. त्यांनी जन्माष्टमीच्या दिवशी एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये कंगना बाळकृष्णासाठी नैवेद्य बनवताना दिसत होत्या. पण त्यांच्या एका चुकीमुळे नेटकऱ्यांनी त्यांना चांगलेच सुनावले आहे. आता हा व्हिडीओ काय होता? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

काय आहे व्हायरल व्हिडीओ?

सध्या सोशल मीडियावर कंगना रणौत यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये कंगना बोलताना दिसत आहे की त्या लहानपणापासून जिथे जन्माष्टमी साजरी करत होत्या तिथेच पुन्हा कित्येक वर्षांपासून नंतर आल्या आहेत. त्यामुळे त्यांनी तेथे जन्माष्टमी साजरी केली आहे. बाळ कृष्णासाठी नैवेद्य बनवताना कंगना यांनी हा व्हिडीओ शूट केला होता. त्या घरातील स्वयंपाक घरात हा नैवेद्य तयार करताना दिसत होत्या. मात्र, त्यांनी हा पदार्थ बनवताना गॅसच सुरु केला नव्हता. ही गोष्ट नेटकऱ्यांच्या लक्षात आली आणि त्यानंतर कंगणा यांना ट्रोल करण्यात आले.

नेटकऱ्यांनी केल्या कमेंट्स

सोशल मीडियावर कंगना रणौत यांचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी कंगना यांना ट्रोल करण्यात आले आहे. काहींनी हे टॅलेंट मोदीजींनी शिकवले असेल असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने पूर्णच ग्रूप अॅक्टर आहे अशी कमेंट केली आहे. तिसऱ्या एका यूजरने प्रसाद मिळून येण्यासाठी तिने ग्रॅस बंद केला असावा असे म्हटले आहे. सोशल मीडियावर कंगना रणौत यांच्या व्हिडीओने धुमाकूळ घातला आहे. अनेकांनी रिल्स बनवून ते व्हायरल केले आहेत.

हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघाच्या भाजप खासदार, अभिनेत्री कंगना रणौत यांनी, सध्या काँग्रेस सत्तेत असलेल्या हिमाचल प्रदेशात आपल्या पक्षाचे सरकार स्थापन झाल्यास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाद्वारे (आरएसएस) चालवल्या जाणाऱ्या शाळा सुरू करण्याची मागणी केली आहे. पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी आपल्या राज्यात किमान १,००० विद्या भारती संस्था स्थापन करण्याच्या अलीकडील प्रस्तावानंतर कंगनाने ही टिप्पणी केली आहे. विरोधी पक्षांनी अधिकारी यांच्या वक्तव्यावर टीका केली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us