AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rahul Gandhi: राहुल गांधी यांचा मास्टरस्ट्रोक, घराणेशाहीला मोठा ब्रेक, काँग्रेसमध्ये एंट्रीसाठी आता…

Rahul Gandhi AICC Secretaries: काँग्रेसवर भाजप नेहमी घराणेशाहीचा आरोप करते. आता काँग्रेसने एक मोठा निर्णय घेतला आहे. ऑल इंडिया काँग्रेस कमेटीने सचिव पद नियुक्तीसाठी हा बदल केला आहे. त्याची एकच चर्चा सुरू झाली आहे.

Rahul Gandhi: राहुल गांधी यांचा मास्टरस्ट्रोक, घराणेशाहीला मोठा ब्रेक, काँग्रेसमध्ये एंट्रीसाठी आता...
राहुल गांधी
| Updated on: Sep 08, 2026 | 11:26 AM
Share

काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय संघटनेत आता आमुलाग्र बदलाची नांदी दिसून येत आहे. भाजप काँग्रेसवर नेहमी घराणेशाहीचा आरोप करते. त्याला छेद देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एक वेगळा प्रयोग राबवण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे (AICC) नवीन सचिवांची निवड करण्यासाठी मुलाखतीचा मार्ग निवडला आहे. राहुल गांधी आणि संघटना सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी थेट उमेदवारांच्या मुलाखत प्रक्रियेला सुरुवात केली आहे.

उमेदवारांची थेट मुलाखत

सोमवारी दिल्लीत बैठक घेण्यात आली. त्यात संभाव्य 30-40 उमेदवारांचे गट तयार करण्यात आले. त्यानंतर उमेदवारांची थेट मुलाखत घेण्यात आली. त्यांचे वन टू वन इंटरव्ह्यू घेण्यात आला. पक्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच वरिष्ठ पदांच्या निवडीसाठी अशा प्रकारे मुलाखत कार्यक्रम पार पडला. दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेशासह इतर राज्यातील 100 हून अधिक संभाव्य उमेदवारांनी त्यासाठी हजेरी लावली. या मुलाखत प्रक्रियेत 120 सचिव नियुक्त करण्यात येणार आहे.

ज्येष्ठता नाही, कामगिरीवर फोकस

ड्रॉईंग रूम पॉलिटिक्स नेत्यांच्या जबर पकडीतून पक्ष सोडवण्यासाठी राहुल गांधी यांनी हे मोठे पाऊल टाकल्याचे म्हटले जात आहे. पक्षासाठी रस्त्यावर उतरणारे, आक्रमक आणि मुद्देसुद भूमिका मांडणाऱ्या तरुणांना या मुलाखतीत अधिक प्राधान्य देण्यात आले आहे. राहुल गांधी यांनी शिफारशींचा जुना फॉर्म्युला बदलला आहे. त्यांनी जुन्या नेत्यांऐवजी धडाडीच्या नेतृत्वाला प्राधान्य दिले आहे. राजकीय नेत्यांचा गाऊंड परफॉर्मन्स, पक्षासाठी केलेले कार्य, सोशल मीडिया आणि स्थानिक पातळीवरील त्याची पकड या गोष्टींना प्राधान्य दिले जात आहे.

बहुजन वर्गातील तरुणाईला संधी

काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी काही दिवसांपूर्वी 6 राज्यांचे प्रभारी बदलले. निष्ठावंतांना बढती दिली. त्यानंतर AICC मध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. या सचिवांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग प्रवर्ग आणि खुल्या वर्गातील नेत्यांना, तरुण कार्यकर्त्यांना संधी देण्याचे धोरण ठरवले गेले आहे. भारत जोडो यात्रेदरम्यान युवक काँग्रेस आणि एनएसयूआय मध्ये जबरदस्त कामगिरी बजावणाऱ्या उमद्या नेतृत्वाला पक्षाने संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी लोकसभा आणि विविध राज्यातील निवडणुकीपूर्वी हा बदल करण्यात आला आहे.

Follow Us
श्वेता महालेंना प्रत्युत्तर देताना संजय गायकवाडांची जीभ घसरली! म्हणाले
Sanjay Gaikwad | श्वेता महालेंना प्रत्युत्तर देताना संजय गायकवाडांची जीभ घसरली! म्हणाले...
रात्री 2 वाजेपर्यंत वर्षा बंगल्यावर खलबतं! मराठा आरक्षणावर सरकारची...
Maratha Reservation | रात्री 2 वाजेपर्यंत वर्षा बंगल्यावर खलबतं! मराठा आरक्षणावर सरकारची महत्त्वाची बैठक; फडणवीसांसह...
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं