
बॉलिवूड अभिनेता आमिर खान याने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. अनेक हीट चित्रपट आमिर खानने त्याच्या करिअरमध्ये दिली आहेत. आमिर खान याचा लाल सिंह चड्ढा हा चित्रपट रिलीज झाला. मात्र, हा चित्रपट फ्लॉप गेला. लाल सिंह चड्ढा चित्रपट फ्लॉप गेल्यानंतर आमिर खान इतका जास्त निराश झाला की, त्याने चित्रपटांपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. मुळात म्हणजे आमिर खान याला लाल सिंह चड्ढा या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा होत्या, या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. आमिर खान याने जाहीर केले की, अनेक वर्षे सतत चित्रपट करत असल्याने कुटुंबियांना अजिबात वेळ दिला नसल्याने पुढील काही वर्षे फक्त कुटुंबाला वेळ देणार.
आमिर खान हा चित्रपटांमधून निवृत्ती घेणार असल्याची जोरदार चर्चा देखील रंगताना दिसली. आता आमिर खान याच्या निवृत्तीवर त्याचा मुलगा जुनैद खान याने मोठा खुलासा केलाय. जुनैद खान हा म्हणाला की, वडील (आमिर खान) यांनी निवृत्तीचा विचार केला होता. महाराजचे शूटिंग पूर्ण झाल्यानंतर आमिर खान प्रॉडक्शनच्या आणखीन एका चित्रपटावर काम करत होता.
मला त्यांनी सेटवर थेट म्हटले होते की, मी निवृत्त होत आहे, तू सर्वकाम का स्वीकारत नाहीस. पुढे जुनैद म्हणाला की, माझे वडील निवृत्तीच्या टप्प्यातून गेले. जुनैद म्हणाला की, मला वाटते की सर्वात जास्त चित्रपट बनवणे अवघड काम आहे. मुळात म्हणजे माझ्या पहिल्या चित्रपटाचे अजिबात टेन्शन आई वडिलांना नव्हते.
विशेष म्हणजे माझे वडील खूप जास्त आनंदी होते आणि त्यांना माझा चित्रपटही आवडला. चित्रपटाच्या शूटिंगच्या दिवशी ते सेटवर आले आणि त्यानंतर त्यांनी थेट माझा चित्रपट बघितला. आमिर खान याचा लेक जुनैद खान हा सध्या चांगलाच चर्चेत दिसतोय. विशेष म्हणजे जुनैद सोशल मीडियावरही सक्रिय दिसतोय.
काही दिवसांपूर्वीच चर्चा होती की, आमिर खान हा मुंबई सोडून आता चेन्नईला शिफ्ट होणार आहे. तो मुंबई कायमची सोडेल. मात्र, आमिर खान हा फक्त त्याच्या आईच्या उपचाऱ्यांसाठी चेन्नईला जाणार असल्याचे स्पष्ट झाले. काही दिवसांपूर्वीच आमिर खान याची लेक इरा खान हिचे लग्न नुपूर शिखरे याच्यासोबत अत्यंत खास पद्धतीने पार पडले.