
बिग बॉस मराठी 5 धमाका करत असतानाच आता बिग बॉसच्या मंचावर चित्रपटाच्या टीमसोबत अक्षय कुमार हा पोहोचला. विशेष म्हणजे यावेळी घरातील सदस्यांसोबत मस्ती आणि मजा करताना अक्षय कुमार हा दिसला. घरातील सदस्यांसोबत खास गेम खेळतानाही अक्षय कुमार दिसला. अक्षय कुमार याच्याबद्दल काही मोठे खुलासे करताना रितेश देशमुख हा दिसला आहे. घरातील सर्व सदस्यांची ओळख रितेश देशमुख याने अक्षयला करून दिली. सर्वात विशेष बाब म्हणजे अक्षय कुमार हा यावेळी घरातील सदस्यांसोबत मराठीमध्ये संवाद साधताना दिसला. अक्षय कुमार याच्या मराठीची चर्चा चांगलीच रंगताना दिसली.
अक्षय कुमार घरातील सदस्यांसोबत संवाद साधत असताना अचानकपणे अक्षय कुमार याची नजर ही छोटा पुढारी अर्थात घनश्याम दरोडे याच्यावर पडते. अक्षय कुमार हा लगेचच म्हणतो की, हा छोटा मुलगा कोण आहे? यावर रितेश देशमुख हा धनश्याम दरोडे याची ओळख अक्षय कुमार याच्यासोबत करून देतो.
विशेष म्हणजे यावेळी रितेश देशमुख हा अक्षय कुमार याला सांगतो की, हा लहान मुलगा नाहीये. याचसोबत काही प्रश्नही अक्षय कुमार घनश्याम दरोडेला विचारतो. घनश्याम दरोडेला अक्षय कुमार म्हणाला की, तू कोणत्या गावाचा आहे…घनश्याम दरोडेने याने उत्तर देत म्हटले की, मी नगर जिल्हामधील आहे.
सोबतच अक्षय कुमार याने घनश्याम दरोडेला तू काम काय करतो हे देखील विचारले. बऱ्याच वेळ घनश्याम दरोडे आणि अक्षय कुमार याच्यामध्ये संवाद हा सुरू होता. घनश्याम दरोडे हा बिग बॉसच्या घरातील सर्वाधिक चर्चेत असलेला स्पर्धेक आहे. विशेष म्हणजे तो बिग बॉसच्या घरात चांगला गेम खेळताना दिसत आहे.
एका टास्कनंतर थेट निकी तांबोळी ही घनश्याम दरोडे याची किस घेताना दिसली. ज्यानंतर विविध चर्चा या रंगताना दिसल्या. फक्त हेच नाही तर यावर अरबाज हा म्हणाला की, मला अजून हे कधी मिळाले नाही आणि तुला मिळत आहे. यावर धनश्याम दरोडे म्हणाला की, निकी तांबोळी आणि मी फक्त बहीण भाऊ आहोत. मला माझ्या बहिणीने किस दिली.