बॉलिवूडचा खतरनाक व्हिलन डॅनी विकतोय दारू, बनला बियर किंग; विजय मल्ल्यालाही पछाडलं

एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता तब्बल 11 बिअर ब्रँडचा मालक आहे. हा अभिनेता दारू व्यवसायातून करोडो कमावतोय. या अभिनेत्याची कंपनी भारतातील तिसऱ्या क्रमांकाची बिअर कंपनी असल्याचेही म्हटले जाते.

बॉलिवूडचा खतरनाक व्हिलन डॅनी विकतोय दारू, बनला बियर किंग; विजय मल्ल्यालाही पछाडलं
| Updated on: Jan 10, 2025 | 6:17 PM

बॉलिवूडचे असे अनेक अभिनेते, अभिनेत्री आहेत ज्यांचे या क्षेत्राव्यतिरिक्त स्वत:चे असे अनेक बिझनेस आहेत. त्यापैकी बऱ्याच कलाकारांच्या व्यवसायाबदद्ल चाहत्यांना माहित नसतं. अनेक सेलिब्रिटींचे कपड्यांचा व्यवसाय आहे. बरेच मोठे ब्रॅंड आहेत. तर अनेकांचे हॉटेल व्यवसाय आहेत.पण एक असा अभिनेता आहे ज्याचा चक्क बिअरचा व्यवसाय.

बॉलिवूड अभिनेता 11 बिअर ब्रँडचा मालक

बॉलिवूडधील एक अभिनेता एवढा मोठा व्यावसायिक आहे की तो चक्क 11 बिअर ब्रँडचा मालक आहे. या अभिनेत्याचा हा भारतातील तिसरा सर्वात मोठा बिअर ब्रँड म्हणून त्याची ओळख आहे. हा बॉलिवूड अभिनेता चित्रपटांमध्ये खलनायक म्हणूनच नावारुपाला आला आहे. या प्रसिद्ध खलनायकाचं नाव आहे डॅनी डेन्झोंगपा.

डॅनी यांनी 80 आणि 90 चा काळ अक्षरश: गाजवला. त्यांची दिसण्याच्या डॅशिंग स्टाइलपासून ते त्यांच्या अभिनयापर्यंत सर्वच गोष्टी चाहत्यांच्या मनावर राज्य करायच्या. आजही डॅनी यांचे चित्रपट तेवढ्याच प्रेमाने लोक पाहतात. अभिनयापेक्षाही डॅनी दारूच्या व्यवसायातून भरपूर कमाई करतात. त्यांची कंपनी 11 प्रकारच्या बिअरचे उत्पादन करते जी ईशान्य भारतातमध्ये खूप प्रसिद्ध आहे.

 

दारूच्या व्यवसायातून मोठी कमाई

बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार्स आहेत जे दारूच्या व्यवसायातून मोठी कमाई करतात. एका रिपोर्टनुसार संजय दत्त व्यतिरिक्त शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान देखील दारूच्या व्यवसायातून मोठी कमाई करतो असं म्हटलं जातं. दरम्यान डॅनी यांची सिक्कीममध्ये युक्सॉम बेव्हरेजेस नावाची दारू कंपनी आहे.

डॅनी डेन्झोंगपाचे युक्सम बेव्हरेज दरवर्षी तीन दशलक्ष बिअर विकते. हा भारतातील तिसरा सर्वात मोठा बिअर ब्रँड असल्याचे म्हटले जाते. या कंपनीला डॅनी डेन्झोंगपा आणि त्याचे कुटुंबीय चालवतात.ओडिशासह आसाममध्ये राइनो ब्रुअरी नावाने ही कंपनी आहे. डॅनी डेन्झोंगपा यांचा हा बिअर ब्रँड भारतातील ईशान्येकडील राज्यांमध्ये खूप प्रसिद्ध आहे.

युक्सम व ब्रुअरीज प्रमाणे, तब्बल 11 प्रकारचे बिअर ब्रँड

त्यांनी युक्सम व ब्रुअरीज प्रमाणे, तब्बल 11 प्रकारचे बिअर ब्रँड तयार केले आहेत. दरम्यान ही कंपनी हिट अँड इंडिया स्पेशल बीअरचे उत्पादनही करते. या कंपनीअंतर्गत बनवलेल्या बिअरची नावे आहेत Dansberg Diaet, Denzong 9000, Jhoom, Himalayan Blue, India Special, Dansberg 16000, Heman 9000, YETI, Dansberg Red. ओडिशात या बिअरची सुरुवातीची किंमत 105 रुपये आहे. अनेक बिअरची किंमत 115 रुपये आणि त्याहूनही अधिक आहे.

डॅनीने मल्ल्याची ही योजना उद्ध्वस्त केली

2009 हे वर्ष भारताच्या बिअर उद्योगासाठी बदलाचे वर्ष ठरले. विजय मल्ल्याच्या युनायटेड ब्रुअरीजने जवळपास संपूर्ण देशात आपली पकड प्रस्थापित केली होती परंतु ईशान्य बाजारपेठ त्यांच्यासाठी अद्याप अस्पर्शित होती. दरम्यान, मल्ल्याची नजर आसामच्या गैंडा एजन्सीवर पडली. ही दारूभट्टी खरेदी करून ईशान्येकडील बाजारपेठ काबीज करण्याचा मल्ल्याचा हेतू होता.

पण डॅनीने मल्ल्याची ही योजना उद्ध्वस्त केली. MSN च्या रिपोर्टनुसार, मल्ल्याचा हेतू कळताच त्याने स्वतः राईनो एजन्सीज विकत घेतल्या. या निर्णयामुळे ईशान्येकडील युक्सम ब्रुअरीजचे स्थान केवळ मजबूत झाले नाही तर मल्ल्याला त्या बाजारातून पूर्णपणे बाहेर काढले. आजही, युनायटेड ब्रुअरीज ईशान्येत उत्पादन करत नाही आणि ही बाजारपेठ डॅनीच्या प्रभावक्षेत्रात आहे.