India Vs Bharat | ‘भारताचा भारत म्हणून उल्लेख होत असेल तर…’, जॅकी श्रॉफ यांची प्रतिक्रिया

India Vs Bharat वादावर सेलिब्रिटी देखील होत आहेत व्यक्त; भारत की इंडिया... जॅकी श्रॉफ यांची मोठी प्रतिक्रिया... सध्या सर्वत्र अभिनेत्याच्या वक्तव्याची चर्चा..

India Vs Bharat | भारताचा भारत म्हणून उल्लेख होत असेल तर..., जॅकी श्रॉफ यांची प्रतिक्रिया
| Updated on: Sep 06, 2023 | 12:18 PM

मुंबई : 6 सप्टेंबर 2023 | देशात सध्या एका विषयामुळे वातावरण तापलं आहे आणि तो विषय आहे देशाचं नाव.. देशाचं एकच नाव असू शकतं – भारत… या प्रकरणामुळे सध्या देशात वादग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर फक्त राजकीय व्यक्तीचं नाही तर, सेलिब्रिटी देखील स्वतःचं मत मांडत आहेत. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी देखील यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतःचं मत व्यक्त केलं आहे. आता अभिनेते जॅकी श्रॉफ यांची देखील याप्रकरणावर प्रतिक्रिया समोर येत आहे. सध्या सर्वत्र देशाचं नाव आणि जॅकी श्रॉफ यांच्या प्रतिक्रियेची चर्चा रंगत आहेत.

९ – १० सप्टेंबर रोजी दिल्लीत जी-20 शिखर परिषद होणार आहे. या समिटमध्ये अनेक सेलिब्रिटींना डिनरसाठी आमंत्रित करण्यात आलं आहे. जॅकी श्रॉफ यांना देखील आमंत्रण आहे . यावर जॅकी श्रॉफ म्हणाले, ‘ भारताचा भारत म्हणून उल्लेख होत असेल तर ती वाईट गोष्ट नाही. इंडिया असेल तर इंडिया, भारत असेल तर भारत… माझं नाव जॅकी आहे.. पण मला काही जण जॉकी बोलतात काही जण जेकी म्हणतात..’

पुढे जॅकी श्रॉफ म्हणाले, ‘माझ्या नावाचा उल्लेख अनेक प्रकारे करतात. पण मी स्वतःला कधीही बदललं नाही.. आपण कसे बदलू शकतो.. नाव बदलू शकतो पण आपण नाही…’ असं जॅकी श्रॉफ म्हणाले आहेत. सध्या सर्वत्र अभिनेत्याच्या वक्तव्याची चर्चा रंगत आहे.

 

 

फक्त जॅकी श्रॉफ यांनी नाही तर, दाक्षिणात्य अभिनेता विष्णू विशाल याने देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतःचं मत व्यक्त केलं आहे. विष्णू विशाल ट्विट करत म्हणाला, ‘शुटिंगच्या सेटवर याच विचारात होतो.. काय…? नाव बदललं…? पण का…? आपल्या देशाच्या प्रगतीला आणि अर्थव्यवस्थेला कशी मदत होवू शकते? गेल्या काही दिवसांपासून ऐकलेल्या सर्वात विचित्र बातम्यांपैकी एक आहे…’

‘इंडिया नेहमीच भारत होता. आपला देश नेहमीच इंडिया आणि भारत या नावाने ओळखला जातो. भारत अचानक का वेगळा झाला? असा प्रश्न देखील विष्णू विशाल याने उपस्थित केला आहे. सध्या सर्वत्र India Vs Bharat हा वाद सुरु आहे.