
बॉलिवूड कलाकार हे प्रत्येक चित्रपटात वेगळे पात्र साकारताना दिसतात. काही कलाकार मुख्य भूमिकेत दिसतात. तर काही खलनायकाच्या भूमिकेत दिसतात. काही कलाकार तर खलनायक म्हणूनच ओळखले जाऊ लागले होते. बॉलिवूडमधील असे काही अभिनेते आहेत ज्यांच्या भूमिकांमुळे त्यांना खऱ्या आयुष्यात देखील अनेकजण खलनायक असल्याचे म्हणू लागले. एका अभिनेत्याच्या मुलीने तर त्याला पप्पा तुम्ही खूप घाणेरडे काम करता असे म्हटले होते. आता हा अभिनेता कोण आहे चला जाणून घेऊया…
आम्ही ज्या अभिनेत्याविषयी बोलत आहोत ते अभिनेते प्रेम चोप्रा आहेत. प्रेम चोप्रा यांनी हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक दशके राज्य केले. त्यांनी एकापेक्षा एक रोल केले आणि भरपूर नाव कमावले. करिअरमध्ये ते बहुतांश निगेटिव्ह रोलमुळे ओळखले जातात. पण व्हिलन बनणे इतके सोपे नसते, जितके आपल्याला वाटते. प्रेम चोप्रा यांनी अलीकडील मुलाखतीत निगेटिव्ह रोलच्या परिणामाबद्दल सांगितले. त्यांनी सांगितले की त्यांच्या खलनायकी भूमिकांचा त्यांच्या मुलीवर कसा परिणाम झाला होता. एकदा तर त्यांच्या लहान मुलीला रकिता नंदा यांना ऐकावे लागले होते. मुलीने त्यांच्याकडे तक्रारही केली होती.
निगेटिव्ह रोलमुळे मुलीला झाला होता त्रास
अरबाज खान यांच्या शोमध्ये प्रेम चोप्रा यांनी मुलगी रकिताच्या त्रासाबद्दल खुलून बोलले. ते म्हणाले की, मुलीला शाळेत लोक चिडवायचे की तुझे वडील काय काम करतात. याचा रकिता नंदावर इतका परिणाम झाला की ती वडिलांवर नाराज होती. प्रेम चोप्रा म्हणाले की, माझी मुलगी रकिता आता लेखिकाही आहे. जेव्हा ती शाळेत होती तेव्हा म्हणायची की पप्पा, सगळे मला चिडवतात. म्हणतात की तुम्ही खूप घाणेरडे रोल करता. तुम्ही घाणेरडं काम करता. हे सोडून द्या ना.
व्हिलन बनणे गरजेचे होते
प्रेम चोप्रा यांनी नंतर मुलीला समजावले की त्यांच्या करिअरसाठी निगेटिव्ह रोल गरजेचे आहेत. लोक त्यांना अशा भूमिकांमध्ये आवडतात. भरपूर प्रेम देतात. यातून त्यांचा संसार चालतो आणि मुलांना शिकवणे-लिहवणे शक्य होते. प्रेम चोप्रा यांचा जन्म १९३५ साली लाहोरमध्ये झाला. ते शिमलामध्ये लहानाचे मोठे झाले. करिअरची सुरुवात त्यांनी पत्रकारितेने केली आणि नंतर चित्रपटांमध्ये आले. करिअरमध्ये त्यांनी शहीद, उपकार, बॉबी, दो अनजाने ते क्रांती अशा चित्रपटांमध्ये काम केले आणि भरपूर नाव कमावले. सहा दशकांत त्यांनी ३८० चित्रपटांमध्ये अभिनय केला. करिअरमध्ये राजेश खन्ना यांच्यासोबतही त्यांनी खूप काम केले आणि जवळपास २० चित्रपटांमध्ये साथ दिली.