Saif Ali Khan: तुम्ही मरणार आहात! सैफने असं काय सांगितलं, ज्यामुळे काजोलने मारली घट्ट मिठी

Saif Ali Khan: अभिनेता सैफ अली खान सध्या तुफान चर्चेत आहे. अभिनेत्याने स्वतःबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. सैफ अस काय म्हणाला, ज्यामुळे काजोलने अभिनेत्याला मारली घट्ट मिठी...

Saif Ali Khan: तुम्ही मरणार आहात! सैफने असं काय सांगितलं, ज्यामुळे काजोलने मारली घट्ट मिठी
| Updated on: Oct 05, 2025 | 10:40 AM

Saif Ali Khan: अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री करीना कपूर यांना आज एक पॉवर कपल म्हणून ओळखलं जातं. पण 2025 ची सुरुवात सैफ आणि त्याच्या कुटुंबियांसाठी फार कठीण होती. जानेवारी महिन्यात सैफ याच्या घरात एक हल्लेखोराने खुसखोरी केली. घरात कोणीतरी घुसलं आहे, हे लक्षात आल्यानंतर हल्लेखोर आणि अभिनेत्याने मारहाण झाली. यामध्ये सैफ गंभीर जखमी झाला. ज्यामुळे रक्तबंबाळ अभिनेत्याला रुग्णालयात दाखल करावं लागलं. शस्त्रक्रिया केल्यानंतर सैफ याला रुग्णालायातून सोडण्यात आलं.

सैफ अली खानने ट्विंकल खन्ना आणि काजोलच्या शोमध्ये या घटनेचा उल्लेख केला आणि अपघाताच्या वेळी तैमूरने कशी प्रतिक्रिया दिली हे सांगितलं. सैफ म्हणाला, ‘हल्लेखोराने माझ्या पायावर चाकूने वार केले. मी रक्तबंबाळ होता. तेव्हा तैमूरने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला, ‘तुम्ही आता मरणार आहात का?’ तेव्हा मी त्याला म्हणालो, नाही मला काहीही झालेलं नाही..’

सैफ अली खान याचे शब्द ऐकल्यानंतर काजोल येते आणि सैफ याला घट्ट मिठी मारते… सांगायचं झालं तर, याआधी देखील सैफ अली खान याने घडलेल्या घटनेबद्दल सांगितलं होतं. ‘करीना डीनरसाठी बाहेर गेली होती… मला सकाळी काम होतं म्हणून मी घरात थांबलेलो… करीना आल्यानंतर थोड्या गप्पा झाल्या आणि आम्ही झोपलो..’

‘थोड्या वेळाने, घरकाम करणारी व्यक्ती आली आणि म्हणाली, “कोणीतरी घरात घुसलं आहे. जेहच्या खोलीत चाकू घेऊन एक माणूस होता आणि तो पैसे मागत होता.” मध्यरात्री 2 वाजले होते. मी कदाचित वेळ चुकीचा ठरवली असेल, पण उशीर झाला होता.’

‘मी घाबरलो… खाली गेलो आणि पाहिलं तर, जेहच्या बेडवर एक व्यक्ती दोन बांबू घेऊन उभा होता… खंर त्यामध्ये एक हेक्सा ब्लेड होता… त्याच्या दोन्ही हातात चाकू होते आणि त्याने मास्क घातला होता. मी त्याला मारण्याचा प्रयत्न केला. पण त्याने माझ्या पाठीवर चाकूने वार केले…’

अपघातानंतर सैफ अली खानवर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याला जवळच्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं, जिथे त्याच्या मणक्यातून 2.5 इंचाचा ब्लेड काढण्यात आला. त्याच्या मानेवर आणि खांद्यावरही जखमा होत्या, ज्यावर उपचार करण्यात आले.