कोणी उद्ध्वस्त केला करिश्माचा संसार? संजय कपूरच्या बहिणीचा धक्कादायक खुलासा
Karisma Kapoor Love Life: 'या' महिलेने उद्ध्वस्त केलाय करिश्मा कपूर हिचा हसता - खेळता संसार? अभिनेत्रीच्या पूर्व पतीच्या बहिणीचा धक्कादायक खुलासा..., सध्या सर्वत्र करिश्माच्या खासगी आयुष्याची चर्चा...

Karisma Kapoor Love Life: अभिनेत्री करिश्मा कपूर हिने बॉलिवूडचा एक काळ गाजवला होता. प्रोफेशनल आयुष्यात करिश्मा यशाच्या शिखरावर पोहोचली पण खासगी आयुष्यात अभिनेत्री अनेक संकटांचा सामना करावा लागला… काही महिन्यांपूर्वी करिश्माचा पूर्व पती आणि उद्योजय संजय कपूर याचं निधन झालं. संजय याच्या निधनानंतर करिश्मा आणि संजय याची तिसरी पत्नी प्रिया सचदेव यांच्यामध्ये संपत्तीवरुन वाद सुरु आहेत. संजय याच्या निधनानंतर कुटुंबातील अनेक रहस्य समोर येत आहे. आता संजय कपूर याची बहीण मंदिरा हिने मोठा खुलासा केला आहे.
प्रिया सचदेव हिच्यामुळे करिश्मा हिचा हसता – खेळता संसार उद्ध्वस्त झाला… असं मोठं वक्तव्य संजय याच्या बहिणीने केलं आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत मंदिरा हिने करिश्मा आणि संजय यांच्या नात्यावर मोठं वक्तव्य करत प्रिया हिच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सध्या सर्वत्र मंदिरा हिने केलेल्या वक्तव्याची चर्चा सुरु आहे.
मंदिरा म्हणाली, ‘संजय आणि करिश्मा त्यांच्या वैवाहिक आयुष्यात आनंदी होते. दोघांमध्ये सर्वकाही सुरळीत सुरु होतं आणि कियान याचा जन्म झालेला होता. तेव्हा संजय याच्या आयुष्यात प्रिया हिची एन्ट्री झाली. दोघांची भेट विमानात झाली होती’ प्रिया हिच्यावर आरोप करत मंदिरा म्हणाली, ‘जर तुला माहिती होतं की, त्या पुरुषाला दोन मुलं आहे… त्याचा संसार सुरळीत करण्याऐवजी, तू त्याचा संसार उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करतेय… लोलोसोबत असं व्हायला नको होतं…’
संजयच्या बहिणीने सांगितलं की, त्याच्या दिवंगत वडिलांपासून ते त्याच्या संपूर्ण कुटुंबापर्यंत, सर्वजण संजय आणि प्रियाच्या नात्याविरुद्ध होते. ‘संजय याने मला पटवून दिलं… मी माझे आई – वडील, बहीण यांच्यासोबत गोवा फिरण्यासाठी गेली… माझे वडील प्रिया – संजय यांच्या विरोधात होते. वडिलांचं म्हणणं होतं, संजय प्रिया हिच्यासोबत लग्न करू शकत नाही आणि मुल देखील जन्माला घालू शकत नाही… पण असं असताना मी माझ्या भावाजी बाजू घेतली. कारण मी त्याच्यावर प्रचंड प्रेम करत होती. ‘
मंदिरा पुढे म्हणाली, ‘मी आणि करिश्मा चांगल्या मैत्रिणी होतो. पण कठीम वेळी मी करिश्माची साथ दिली नाही. त्याचा मला आजही पश्चाताप होतो. मला करिश्माच्या बाजूने उभं राहायला हवं होतं.’ असं देखील मंदिरा म्हणाली.
करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, 2003 मध्ये संजय याने करिश्मा हिच्यासोबत दुसरं लग्न केलं. पण दोघांचं नातं दोन मुलांच्या जन्मानंतर देखील फार काळ टिकलं नाही. घटस्फोटाच्या दरम्यान दोघांनी एकमेकांवर गंभीर आरोप केले. अखेर 2016 मध्ये करिश्मा आणि संजय यांनी घटस्फोटाची अधिकृत घोषणा केली. त्यानंतर 2017 मध्ये संजय याने प्रिया हिच्यासोबत तिसरं लग्न केलं. दोघांना एक मुलगा देखील आहे…
