Shah Rukh Khan | शाहरुख खान थेट म्हणाला, ‘बस कुत्ते भी मेरी फिल्म…’ चाहत्यांना बसला मोठा धक्का

बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान हा नेहमीच चर्चेत असतो. शाहरुख खान याचा काही दिवसांपूर्वीच पठाण हा चित्रपट रिलीज झालाय. चाहते शाहरुख खान याच्या आगामी चित्रपटाची आता आतुरतेने वाट पाहत आहेत. शाहरुख खान याचा जवान हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

Shah Rukh Khan | शाहरुख खान थेट म्हणाला, बस कुत्ते भी मेरी फिल्म... चाहत्यांना बसला मोठा धक्का
शाहरुख खान
| Updated on: Jun 13, 2023 | 4:12 PM

मुंबई : बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा नेहमीच चर्चेत असतो. शाहरुख खान याचा काही दिवसांपूर्वीच पठाण हा चित्रपट रिलीज झालाय. शाहरुख खान याच्या पठाण चित्रपटाने धमाकेदार कामगिरी बाॅक्स आॅफिसवर (Box office) केलीये. विशेष म्हणजे शाहरुख खान याच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा पठाण हाच चित्रपट ठरलाय. शाहरुख खान याने पठाण (Pathaan) चित्रपटाच्या माध्यमातून तब्बल चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. पठाण चित्रपटाने सर्वांनाच मोठा धक्का देत पहिल्याच दिवशी थेट 100 कोटींचे बाॅक्स आॅफिस कलेक्शन केले. विशेष म्हणजे फक्त भारतामधूनच नाही तर विदेशातूनही चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळाला.

शाहरुख खान याच्या पठाण चित्रपटाने धमाका केल्यानंतर त्याने लगेचच जवान चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात केली. जवान चित्रपटाच्या सेटवरील अनेक फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल झाले. विशेष म्हणजे यावेळी शाहरुख खान याचा लूक जबरदस्त असा दिसत होता. शाहरुख खान याचे चाहते त्याच्या जवान या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत.

शाहरुख खान याने नुकताच आस्क एसआरके सेशन घेतले. या सेशनमध्ये शाहरुख खान हा चाहत्यांच्या प्रश्नाला मोठ्या प्रमाणात उत्तरे देताना दिसला. पठाण चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदरच शाहरुख खान हा सोशल मीडियाच्या माध्यमातून चित्रपटाचे प्रमोशन करत होता. आताही तो पठाण चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर सोशल मीडियावर प्रमोशन करताना दिसत आहे.

आस्क एसआरके सेशनमध्ये एका चाहत्याने शाहरुख खान याच्या पठाण चित्रपटातील गाण्याचा एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये एक मांजर अत्यंत मन लावून गाणे बघताना दिसत आहे. यावर कमेंट करताना शाहरुख खान म्हणाला की, तुमच्या मांजरीला माझे खूप प्रेम द्या आणि आता फक्त काही कुत्र्यांनीच चित्रपट बघणे बाकी आहे. त्यांनी बघितला की, बस आहे मग. यावरून आता तूफान चर्चा रंगताना दिसत आहे.

आता शाहरुख खान याने केलेली ही कमेंट मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. शाहरुख खान याने पठाण चित्रपटानंतर लगेचच जवान चित्रपटानंतर डंकी चित्रपटाचे शूटिंग सुरू केले. आता डंकी चित्रपटाचे शूटिंगही पूर्ण झाल्याचे सांगितले जात आहे. आता शाहरुख खान याच्या चाहत्यांना मोठी मेजवानी भेटणार आहे. शाहरुख खान याचे एका मागून एक असे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.