The Kerala Story फेम अदा शर्मा का भडकली? म्हणाली, ‘लवकरच सर्व पुरावे…’

'द केरळ स्टोरी' सिनेमाची चर्चा अद्यापही जोरावर.. सिनेमातील मुख्य अभिनेत्री 'या' गोष्टीमुळे भडकली.. सध्या सर्वत्र अदा शर्मा हिची चर्चा.. असं काय म्हणाली अदा शर्मा?

The Kerala Story फेम अदा शर्मा का भडकली? म्हणाली, लवकरच सर्व पुरावे...
| Updated on: May 26, 2023 | 4:51 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्मा सध्या तिच्या ‘द केरळ स्टोरी’ सिनेमामुळे चर्चेत आहे. ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर सिनेमाचा अनेक ठिकाणी विरोध करण्यात आला. एवढंच नाही तर, काही राज्यांमध्ये सिनेमा बॅन देखील करण्यात आला होता. पण सिनेमाला झालेल्या विरोधाचा आणि रंगलेल्या वादाचा कोणताही परिणाम बॉक्स ऑफिसवर झाला नाही. सिनेमा  आज देखील बॉक्स ऑफिसवर मोठी मजल मारताना दिसत आहे. एवढंच नाही तर, सिनेमात अदा शर्मा हिने साकारलेल्या भूमिकेची देखील तुफान चर्चा रगंत आहे.. आता सिनेमाच्या कथे विरोधाता ज्यांनी आवाज उठवला होता, त्यांच्यावर अदा शर्मा हिने राग व्यक्त केला आहे.. शिवाय अभिनेत्रीने अनेकांना सडेतोड उत्तर देखील दिलं आहे. सध्या सर्वत्र ‘द केरळ स्टोरी’ आणि अदा शर्मा हिची चर्चा रंगत आहे..

‘द केरळ स्टोरी’ सिनेमाच्या सत्यतेवर उपस्थित होत असलेल्या प्रश्नांवर अदा शर्माने एका मुलाखतीत सडेतोड उत्तर दिलं आहे. अदा शर्मा म्हणाली, “निर्मात्यांकडे असलेले तथ्यात्मक पुरावे लवकरच समोर येणार आहेत. पुरावे त्यांना आधी दाखवायचे नव्हाते. कारण आधी पुरावे दाखवले असते, तर सर्वकाही फक्त प्रमोशनसाठी सुरु आहे. असा तुम्ही विचार केला असता..’

सिनेमाला झालेल्या विरोधाचा आणि रंगलेल्या वादाचा कोणताही परिणाम ‘द केरळ स्टोरी’ सिनेमाच्या बॉक्स ऑफिसवर झाला नाही आणि सिनेमाने सर्व अडचणींवर मात केली आहे.. नुकताच झालेल्या मुलाखतीत अदा म्हणाली, ‘निवडणुकीचा हा परिणाम आहे.. असं देखील अनेक जण म्हणाले. पण तिसऱ्या आठवड्यात देखील सिनेमाचं उत्तम कलेक्शन होत आहे.. अशात सिनेमा प्रोपगंडा असल्याचं अनेक जण म्हणाले.. शिवाय कमाईच्या आकड्यांना देखील फेक सांगितलं…’

ज्या मुलींच्या आयुष्यावर आधारित सिनेमा आहे, त्यांच्या संख्येबद्दल अभिनेत्री म्हणाली, ‘सुरुवातीला मला खूप तणाव वाटत होता. मी रागवायची. माणसाचं आयुष्य इकतं स्वस्त आहे का? ज्याला आपण फक्त आकड्यांमध्ये मोजतो.. ती व्यक्ती आपली नसल्यामुळे तिला आपण आकड्यांमध्ये मोजतो.. त्या आकड्यांमध्ये तुमची आई, बहीण, प्रेमिका, मैत्री असती तर मला नाही वाटत तेव्हा लोक आकड्यांबद्दल बोलले असते. मग ते ३ असो किंवा ३२…’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘द केरळ स्टोरी’ सिनेमाची चर्चा रंगत आहे..

‘द केरळ स्टोरी’ सिनेमा भारतात ५ मे रोजी प्रदर्शित झाला. सिनेमा लव्ह जिहाद, धर्मांतर आणि दहशतवादी संघटना ISIS वर आधारलेला आहे. सिनेमा बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आहे. सिनेमाने 200 कोटी रुपयांचा गल्ला ओलांडला आहे. सिनेमाने आतापर्यंत २१३ कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. सिनेमा 2023 मधील दुसरा सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला आहे.