Ananya Raj Death: झोपेतच प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीचा मृत्यू, वयाच्या 27व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Ananya Raj Death: बॉलीवूड अभिनेत्री अनन्या राजचे निधन झाले आहे. तिने अवघ्या २७ व्या वर्षी अखेरची श्वास घेतली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अनन्या राजच्या कुटुंबीयांनी गेल्या एक महिन्यापासून तिच्या मृत्यूची बातमी लपवली होती.

बॉलिवूड इंडस्ट्रीतून एक अतिशय दुःखद बातमी समोर आली आहे. उदयोन्मुख अभिनेत्री अनन्या राजचे निधन झाले आहे. तिने वयाच्या 27व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे अनन्याचा मृत्यू सुमारे एक महिनापूर्वीच झाला होता, पण तिच्या कुटुंबीयांनी ही बातमी आतापर्यंत लपवून ठेवली होती. आता तिच्या कुटुंबीयांनी अनन्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर करून तिच्या निधनाची बातमी सांगितली आहे.
मृत्यूचे कारण काय?
अनन्या राजच्या कुटुंबीयांनी तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आणि लिहिले, “आम्ही अनन्याचे कुटुंबीय आहेत. 15 जुलै रोजी सकळी अनन्याचा मृत्यू झाला आहे हे आम्ही अतिशय जड अंत:करणाने सांगत आहे. झोपेतच शांतपणे तिने अखेरचा श्वास घेतला. गेल्या एक वर्षाहून अधिक काळ ती शारीरिक आणि मानसिक समस्यांशी झुंज देत होती. या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी प्रचंड संघर्ष केला.”
बाळं, तुझी कमतरता खूप जाणवेल…
अनन्याच्या कुटुंबीयांनी पुढे लिहिले, “ती खूप मजबूत इच्छाशक्ती असलेली मुलगी होती आणि एका राणीसारखे आयुष्य जगत होती. बाळं, तुझी कमतरता खूप जाणवेल. आम्ही तुम्हा सर्वांना तिच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करण्याची विनंती करतो. या कठीण काळात आम्हीला सहकार्य करा आणि शांतता ठेवा.” कमेंट सेक्शनमध्ये चाहते अनन्याला श्रद्धांजली वाहत आहेत.
अनन्या राज कोण होती?
मुंबईत लहानाची मोठी झालेली अनन्या राज बॉलिवूडची नवी अभिनेत्री होती. तिने २०१६ मध्ये आलेल्या ‘७ ऑवर्स टू गो’ या चित्रपटाने बॉलिवूडमध्ये पाऊल टाकले. त्यानंतर ती २०१७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘द फाइनल एग्जिट’ या चित्रपटातही दिसली होती. अनन्या राज २०१९ मध्ये आलेल्या विक्रम भट्ट याचा हॉरर चित्रपट ‘घोस्ट’मध्ये देखील दिसली होती. याशिवाय अनन्याने काही वेब सिरीज आणि शॉर्ट फिल्म्समध्येही काम केले होते. तिच्या निधानाची बातमी ऐकून अनेकांना धक्का बसला आहे.