रणबीर कपूर याच्या वाढदिवसाच्या दिवशीच दीपिका पादुकोण देणार बाळाला जन्म, चाहतेही हैराण, योगायोग की…

अभिनेत्री दीपिका पादुकोण हिचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. विशेष म्हणजे दीपिका पादुकोणचे हे चित्रपट धमाका देखील करत आहेत. दीपिका पादुकोण हिने मोठा काळ अभिनय क्षेत्रामध्ये गाजवला आहे. दीपिका पादुकोण ही सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे.

रणबीर कपूर याच्या वाढदिवसाच्या दिवशीच दीपिका पादुकोण देणार बाळाला जन्म, चाहतेही हैराण, योगायोग की...
Deepika Padukone and Ranbir Kapoor
| Updated on: Sep 02, 2024 | 2:49 PM

अभिनेत्री दीपिका पादुकोण हिच्या घरी लवकरच बाळाचे आगमन होणार आहे. विशेष म्हणजे रणवीर सिंह आणि दीपिकाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत बाळाचे आगमन होणार असल्याचे जाहीर केले. नुकताच दीपिका पादुकोण ही मुंबईमध्ये स्पॉट झाली. त्यावेळी तिचा बेबी बंप स्पष्ट दिसत होता. दीपिका पादुकोण ही लंडनमध्ये आपल्या बाळाला जन्म देणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र, आता हे स्पष्ट झाले की, दीपिका पादुकोण ही मुंबईमध्येच आपल्या बाळाला जन्म देणार आहे. काही दिवसांपूर्वीच आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करतानाही दीपिका पादुकोण  दिसली.

दीपिका पादुकोण ही 28 सप्टेंबर 2024 रोजी बाळाला जन्म देणार आहे. डॉक्टरांकडून ती तारीख तिला देण्यात आलीये. दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांच्या लग्नाला सहा वर्ष पूर्ण झाली आहेत. रणवीर सिंह याला डेट करण्याच्या अगोदर दीपिका पादुकोण ही बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर याच्यासोबत रिलेशनमध्ये होती.

हेच नाही तर दीपिका पादुकोण आणि रणबीर कपूर हे लग्न करणार असल्याचेही सातत्याने सांगितले जात होते. मात्र, अचानक यांचे ब्रेकअप झाले. रणबीर कपूर याच्या नावाचा एक टॅटू देखील दीपिका पादुकोण हिने आपल्या मानेवर काढला होता. हैराण करणारे म्हणजे दीपिका पादुकोण हिचे बाळ 28 सप्टेंबर रोजी जगात येणार आहे.

28 सप्टेंबर रोजीच रणबीर कपूर याचा वाढदिवस आहे. म्हणजेच काय तर आपल्या एक्स बॉयफ्रेंडच्या वाढदिवसाच्या दिवशीच दीपिका बाळाला जन्म देणार आहे. यामुळेच आता विविध चर्चा या रंगताना दिसल्या. दीपिका पादुकोण आणि रणबीर कपूर यांची जोडी चाहत्यांना प्रचंड आवडत. मात्र, त्यांचे ब्रेकअप झाले.

कतरिना कैफ हिच्यामुळेच यांचे ब्रेकअप झाल्याचे सांगितले जाते. दीपिका पादुकोण हिने रणवीर सिंह याच्यासोबत लग्न केले तर दुसरीकडे रणबीर कपूर याने आलिया भट्ट हिच्यासोबत लग्न केले. आलिया आणि रणबीरचे एक मुलगी असून तिचे नाव राहा ठेवण्यात आले. राहा हिचे सोशल मीडियावर कायमच फोटो व्हायरल होताना दिसतात.