ही बॉलिवूड अभिनेत्री मुंबईत राहते चक्क 100 वर्ष जुन्या घरात; फराह खानला घर पाहून धक्काच बसला, म्हणाली “शाहरुखला इथे आमंत्रित…”

फराह खान आणि तिचा स्टार कुक दिलीप यांची जोडी एका अभिनेत्रीच्या घरी व्हीलॉग करण्यासाठी पोहोचले आहेत. मुख्य म्हणजे अभिनेत्रीचे हे घर तब्बल 100 वर्षांपेक्षाही जुने आहेत. फराह खान अभिनेत्रीचे एवढे भव्य घर पाहून अवाक् झाली.

ही बॉलिवूड अभिनेत्री मुंबईत राहते चक्क 100 वर्ष जुन्या घरात; फराह खानला घर पाहून धक्काच बसला, म्हणाली शाहरुखला इथे आमंत्रित...
diana penty house
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 28, 2025 | 1:29 PM

फराह खान आणि तिचा स्टार कुक दिलीप यांची जोडी आता भलतीच प्रसिद्ध झाली आहे. दोघेही या कुकींच्या व्हीलॉगमुळे सेलिब्रिटींच्या घराघरात पोहोचून प्रेक्षकांचे देखील मनोरंजन करत आहेत. या जोडीने मोठ्या मोठ्या सेलिब्रिटींच्या घरी हजेरी लावली. तसेच अनेकांना त्यांच्या घरी बोलावून एखादा पदार्थ बनवून घेतला आहे.

यावेळी फराह आणि तिचा कुक एका अभिनेत्रीच्या घरी पोहोचले आहेत. जिच्या घरी तिने व्हीलॉग शूट केला. जेव्हा फराह या अभिनेत्रीच्या घरी गेली तेव्हा तिला तिचं घर पाहून धक्काच बसला. कारण ही अभिनेत्री जवळपास 100 वर्ष जुन्या घरात राहत आहे. जेव्हा फराह घरात गेली तेव्हा तिला आश्चर्य वाटलं की मुंबईच्या मध्यभागी इतकं आलिशान घर कसं असू शकतं. घरातील फर्निचरपासून ते सजावटीपर्यंत जवळजवळ सर्व काही प्राचीन होतं. हे घर आहे अभिनेत्री डायना पेंटीचं.

डायना पेंटी 100 वर्षे जुन्या घरात राहते. हे घर जुन्या युरोपच्या एका सुंदर भागासारखे दिसत होते. हे घर डायनाच्या पणजोबांचे आहे. घरात उंच छत, मोठ्या खिडक्या, लाकडी पायऱ्या, मोठे दरवाजे आणि हिरवागार व्हरांडा होता, ज्यामुळे ते जुन्या वसाहती बंगल्यासारखे वाटत होते.

घर पाहून फराह खान थक्क झाली

घरात जाताना दिलीपने आश्चर्याने आजूबाजूला पाहिले आणि फराहला विचारले, “मॅडम, आपण कुठे आलो आहोत?” फराह हसली आणि म्हणाली, “हा एक मोठा बकिंगहॅम पॅलेस आहे. मी तुला लंडनला घेऊन आले आहे!” थोड्याच वेळात, डायनाने तिचे स्वागत केले. दुमजली घर पाहून फराह आश्चर्यचकित झाली. फराहने विचारले, “हे तुझं घर आहे का?” डायनाने हसून तिच्या आई आणि कुटुंबातील इतर सदस्यांकडे इशारा केला आणि म्हणाली, “मी वरच्या मजल्यावर आहे आणि कुटुंब खालच्या मजल्यावर राहते” ती पुढे म्हणाली, “आपण आईच्या घरी जात आहोत कारण आईचे स्वयंपाकघर छान आहे.”

फराह खानने अभिनेत्रीच्या 100 वर्ष जुन्या घराला भेट दिली

फराह म्हणाली, “कृपया मला घराचा फेरफटका मारायचा आहे. हे ठिकाण कोणते आहे? मला असं वाटतंय की मी काळाच्या ओघात मागे गेले आहे आणि एका वसाहती घरात पोहोचले आहे.” तिने कोरलेले लाकडी टेबल पाहिले आणि विचारले, “हे किती जुने आहे?” डायनाच्या आईने लगेच उत्तर दिले, “100 वर्षांहून अधिक जुने.” फराहला या सर्व गोष्टी पाहून फार आनंद होत होता. तिच्यासाठी हा एक वेगळा अनुभव होता.


 घराचे सौंदर्य पाहून फराह अवाक झाली.

स्वयंपाकघराकडे चालत जाताना फराह म्हणाली, “वाह! हे स्वयंपाकघर पहा, ते खूप सुंदर आहे.” मग तिने दिलीपला विचारले, “तू कधी इतके सुंदर घर पाहिले आहे का?” दिलीप हसला आणि म्हणाला, “नाही, मॅडम, कधीच नाही.” डायना पुढे म्हणाली, “बाहेर एक शेत आहे,” आणि फराह आनंदाने उत्तरली, “ते खूप सुंदर आहे! मला असे वाटते की मी वेगळ्या ठिकाणी आहे. ते मुंबईसारखे अजिबात दिसत नाही.”

फराहने तिला विचारले की, किती काळापासून हे सर्वजण या घरात राहत आहे. तेव्हा डायनाने उत्तर दिले, “माझ्या पणजोबांच्या काळापासून, मी येथे राहणारी चौथी पिढी आहे.” त्यानंतर अभिनेत्री फराहला वरच्या मजल्यावर घेऊन गेली. त्या क्षणी, फराह म्हणाली, “आम्ही अनेक मोठी घरे पाहिली आहेत, पण मुंबईच्या मध्यभागी असे घर शोधणे…” डायना हसून म्हणाली, “मला वाटते मी भाग्यवान आहे.”

फराहला शाहरूखला अभिनेत्रीच्या घरी आमंत्रित करण्याची इच्छा

डायनाचे घर पाहिल्यानंतर फराह गंमतीने म्हणाली की, “लोखंडवाला येथील डान्स स्टुडिओही इतके मोठे नाहीत. हे शाहरुख खानच्या मन्नत येथील लिव्हिंग रूमइतकेच मोठे आहे.” तसेच पुढे फराह म्हणाली “मी शाहरुखला इथे आमंत्रित करायला हवे.” डायना हसली आणि म्हणाली, “शाहरुख इथे आला तर मला खूप आवडेल!” फराह खानच्या या व्हीलॉगमुळे डायनाचे घर प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरले आहे.